
एम्ब्यूलेंसमध्ये टाकून कुठे घेऊन गेले प्रशासनालाही माहिती नाही!
नागपूर,ता. १६ सप्टेंबर: या शहरात कोणासोबत काय घडेल याचा आता काही नेमच राहीला नाही.एका रडवेल्या आवाजात फोन येतो की मेयोमधून आज बुधवार दि. १६ सप्टेंबरच्या सायंकाळी ५.३० वा.पासून त्यांची ६७ वर्षीय बहीणच गायब झाली आहे! कोणीही नातेवाईक जवळ उपस्थित नसताना पुनम कनोजिया यांना मेयो प्रशाानातील कर्मचा-यांनी एम्ब्यूलेंसमध्ये टाकून रामनगरच्या मनपा रुग्णालयात शिफ्ट केल्याची माहिती नातेवाईकांना दिली मात्र मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात त्यांच्या बहीणीचा शोधच लागला नाही!
नेहमीप्रमाणे आपल्या बहीणीला बघायला गेले असता कनोजिया कुटुंबियांना मेयो प्रशानाने आज जबरदस्त हादरा दिला. त्यांच्या बहीणीला मनपाच्या रुग्णालयात हलविले असल्याची माहिती दिली,आपल्या बहीणीला बघण्यासाठी दिपक कनाेजिया हे रामनगरच्या मनपा रुग्णालयात गेले असता तेथे त्यांना बहीण सापडलीच नाही! संपूर्ण रजिस्टर त्यांनी हजारदा चाळून बघितलं मात्र पुनम कनोजिया या आज सायंकाळी ५.३० वा.या रुग्णालयात भरती झाल्याची नोंदच नव्हती.
दिपक कनोजिया हे पुन्हा धावपळ करत मेयोमध्ये आले. मेयोमध्ये संपूर्ण वॉर्ड डोळ्यात अश्रू घेऊन मनाची घालमेल लपवित पालथे घातले मात्र पुनम या कुठेच गवसल्या नाहीत.यानंतर त्यांनी खामला गाठले, शहरातील अनेक रुग्णालयात बहीणीचा शोध घेतला मात्र गेल्या सहा तासांपासूनची त्यांची धावपळ ही निरर्थक ठरली,अखेर त्यांनी नुकतीच आजारी बहीण हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले असल्याची माहिती आहे.
तुम्हाला कल्पना नसेल… या पेशंटला मेडीकलच्या डॉक्टरांनी ऑक्सीजन काढून मारले !
गेल्या महिन्यात १५ ऑगस्ट राेजी सदर येथील निवासी पुनम कनोजिया यांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता,त्यांची करोना चाचणी ही पॉझिटीव्ह आली होती मात्र चांगल्या उपचाराने त्या ब-या झाल्या. आज सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी होणार होती मात्र कोणीही नातेवाईक जवळ हजर नसताना त्यांना एका एम्ब्यूलेंसमध्ये टाकण्यात आले व नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना मनपाच्या रामनगरच्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आल्याचे कळवण्यात आले. मेयो मधील एका चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी यांनी कनोजिया यांना ही माहिती दिली की त्यांनी स्वत: पुनम कनोजिया यांना एम्ब्यूलेंसमध्ये बसवले….!
मग अखेर बहीण गेली कुठे?महत्वाचे म्हणजे रुग्णाला भरती करताना सर्व कागदपत्रांवर नातेवाईकांची सही घेतली जाते मात्र वयोवृद्ध रुग्णाला कुटुंबियांपैकी कोणीही जवळ नसताना आणि त्यांना शिफ्ट करीत असल्याची कोणतीही माहिती कुटुंबियांना न कळवता,कोणत्याही कागदपत्रावर नातेवाईकांची सही नसताना, एम्ब्यूलेंसमध्ये टाकून कुठे सोडण्यात आले?हा प्रश्न आता कुटुंबियांना छळतोय.गेल्या सहा तासांपासून कनोजिया कुटुंबिय हे रडवेल्या अवस्थेत संपूर्ण नागपूरात आपल्या बहीणीचा शोध घेत आहे.ठिकठिकाणच्या रुग्णालयातील रजिस्टरमध्ये बहीणीचे नाव शोधत आहे,मेयो प्रशासनाच्या अश्या भोंगळ कारभारामुळे शहरातील एका कुटुंबाला इतकी पराकोटीची वेदना सहन करावी लागत आहे.
आणि…तो संपादक करीत राहीला तिच्यावर आठ महिने नजरेने बलात्कार…
त्यांची बहीण सुखरुप आहे की नाही?या पेक्ष्ा ही जास्त मेयो प्रशासनाच्या या अश्या अमानवीय कृत्यामुळे त्या आता जिवंत सापडतील की नाही?हा प्रश्न आता त्यांना छळतोय. त्यांच्या हरवलेल्या बहीणीचा शोध त्यांना एकट्याला घेणे शक्य नसल्याचे लक्ष्ात येताच त्यांनी पोलीसांची मदत घेण्याचा निश्चय केला.
मात्र प्रश्न तरीही अनुत्तरीत राहतो,या शहरातील सामान्य नागरिकांनी करोना महामारीच्या काळात असा काय गुन्हा केला आहे की या शहरातले प्रशासन आणि पवित्र समजल्या जाणारे वैद्यकीय प्रशासन हे त्यांच्या व त्यांच्या आप्त-स्वकीयांच्या जीवावर असे उठलेत….?
वृत्त लिहेपर्यंत पुनम कनोजिया यांचा शोध लागला नव्हता.

आमचे चॅनल subscribe करा