Homeनागपूर न्यूजया पेशंटला मेडीकलच्या डॉक्टरांनी ऑक्सीजन काढून मारले!

या पेशंटला मेडीकलच्या डॉक्टरांनी ऑक्सीजन काढून मारले!

Advertisements
Advertisements


मृतकाच्या नातेवाईकांचा आरोप!नातेवाईकांना बाहेर काढून ऑक्सीजन काढल्याचा दावा

नागपूर,ता. १२ सप्टेंबर: सध्या शहरात करोनामुळे होणा-या मृत्यूंमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दाटले आहे. आपल्या कुटुंबातला आप्त-स्वकीय हा शासकीय असो किवा खासगी,रुग्णालयात एकदा गेल्यावर जिवंत परत येणार की नाही,ही धास्ती प्रत्येकाच्या मनाला आता पोखरत आहे.अश्‍यातच आज शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या १० वा. रेल्वेमधून निवृत्ती स्वीकारलेल्या ५८ वर्षीय किशोर गणपत रगडे नावाचे रामेश्‍वरी येथील गृहस्थ यांचा मेडीकलमध्ये मृत्यू झाला.यावेळी येथील डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर पाठवून रुग्णाची ऑक्सीजन नळी काढून टाकण्याचा आरोप नातेवाईकांनी ‘सत्ताधीश’कडे केला.

पत्नी अनिता रगडे तसेच त्यांची मुले रोहीत व चेतन रगडे यांनी हा आरोप केला. रात्रीच्या दहा पर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होती असे त्यांचे म्हणने आहे. परवा रात्री १ वाजता त्यांना मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते. काल ही त्यांचे कुटुंबिय त्यांच्याशी भेटले असताना ‘आता बरे वाटत असल्याचे’ त्यांनी कुटुंबियांना सांगितले. घरीच त्यांना सर्दी व खोकल्याचा त्रास होता मात्र त्यांचा करोना चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

मात्र आज रात्री दहा वाजता मेडीकल प्रशासनातील एका डॉक्टरने व त्यांच्यासोबतच्या स्टाफने रुग्णाजवळ बसलेल्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले आणि…रुग्णाचा ऑक्सीजन सिलेंडर काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. कुटुंबियांना लगेच ते मृत्यू पावले असल्याची माहिती देण्यात आली यासोबतच ते करोना पॉझिटीव्ह असल्याचेही सांगितले गेले.

यावर कुटुंबियांनी मेडीकल प्रशासनाला रगडे यांचा करोना पॉझिटीव्ह चाचणीचा अहवाल मागितला असता प्रशासनाकडून तो त्यांना देण्यात आला नाही.याच वेळी एका ज्येष्ठ नागरिकाला त्याचे कुटुंबिय हे मेडीकलमध्ये उपचारासाठी घेऊन आले असता त्यांना मेडीकल प्रशासनाने रगडे कुटुंबियांसमोरच खाटा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून परत पाठविल्याची धक्कादायक माहिती माध्यम जगतातील स्नेहा ढोमाची भोगे हिने ‘सत्ताधीश’ला सांगितली.

रुग्ण न्यूमोनियाने दगावला-प्रशासनाचा दावा
या घटनेबाबत ‘सत्ताधीश’ने मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांच्याशी संवाद साधला असता हा रुग्ण न्यूमोनियाने दगावल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. करोना पॉझिटीव्ह असल्याने न्यूमोनिया असणा-या रुग्णांच्या दगावण्याचे प्रमाण हे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. आधी जरी रुग्णाची करोना चाचणी ही निगेटीव्ह आली असली तरी मेडीकलमधील चाचणी रुग्ण हा पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले.कारण ॲण्टीजन चाचणीचे निदान हे ४० ते ५० टक्के बरोबर असते,आरटी-पीसीआर चाचणीचे प्रमाण हे ६० ते ७० टक्के बरोबर असते तरी मधील ३० टक्के प्रमाण हे साशंकच असल्याचे ते मान्य करतात.

याशिवाय कोणत्याही रुग्णालयात जिवंत रुग्णाचे ऑक्सीजन सिलेंडर काढण्याची घटना घडूच शकत नसल्याचा दावा त्यांनी केला.
मेडीकलमध्ये ऑक्सीजनचा कोणताही तुडवडा नाही.ऑक्सीजनचा पुरेसा साठा रुग्णालयात उपलब्ध आहे आणि आधी पण होता फक्त एका पाईप लाईनमध्ये खराबी आल्याने रुग्णांची संख्या ही मर्यादित करण्यात आली होती,असे ते म्हणाले.

Latest बातम्या