Homeराजकारणकोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या गृहभेटी व संपर्क अभियान

कोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या गृहभेटी व संपर्क अभियान

Advertisements
विजयासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन

नागपूर, ता. १८ ऑक्टोबर २०२६:  भारतीय जनता पक्ष-महायुतीचे विधानपरिषद उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने प्रचाराची दिशा, संघटनात्मक समन्वय आणि महायुतीच्या विजयासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली.
या संवादादरम्यान ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महायुतीची विकासाभिमुख भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच उमेदवाराच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असून, परस्पर समन्वय आणि संघटनात्मक ताकदीच्या बळावर विजयाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संदीप जाधव, मोहिनी रामटेके, प्रभाकर येवले, सुधीर जांभूळकर, गणेश कानतोडे , शिवनाथजी पांडे, गोपी कुमरे, पवन किरपाने, उमेश बुटे , खेमराज पारधी, राजेश हाथीबेड, सोनू मिश्रा, चंदू सदावरते, नगरसेवक किरण मणपिया, अमित पांडे, संजय तरारे, पप्पू वासवानी, देवानंद सातपुते, रविंद्र डोंगरे, सुनील गवाळे, ओमप्रकाश इंगळे, आणि संजय शेंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी समन्वयाने काम करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात सहभागी होऊन सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
………………………………………..

Latest बातम्या