


नागपूर, 28 नोव्हेंबर :
विदर्भातील दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी ‘मदर डेअरी’ला निमंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचा सकारात्मक परिणाम आज दिसत आहे. पूर्वी विदर्भात सरकारी आणि सहकारी दूध योजना बंद असताना शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर २० ते २५ रुपये अधिक दर मिळू लागला आहे, असे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मदर डेअरीच्या माध्यमातून सुरुवातीला दररोज १० लाख लिटर दूध संकलनाचे ठेवलेले उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले असून, आता हे संकलन ५० लाख लिटरपर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘अॅग्रोव्हिजन २०२६’ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दुष्काळी परिस्थितीत पशुसंवर्धन आणि चारा नियोजन’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला दुध उत्पादक महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी यावेळी उत्कृष्ट दूध उत्पादक सभासद विजेत्या आणि मराठव-हाड दूधसम्राझींचा सत्कार करण्यात आला.
मेळघाटातील कुपोषण आणि गरिबीची समस्या दूर करण्यासाठी दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला जात आहे. तेथे दूध संकलन वाढवून पुढील दोन वर्षांत दररोज १० हजार लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन आहे. तसेच पुढील तीन वर्षांत दरवर्षी एक कोटी रुपयांचे दूध विक्री करणाऱ्या १०० महिला उद्योजिका तयार करण्याचा मानस असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दुग्धोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. या माध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवता येईल आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त व समृद्ध बनवता येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

स्वत:वर विश्वास ठेवा – डेअरी उद्योजिका श्रद्धा धवनढो रमले
बारा वर्षापासून दुध व्यवसाय करत असलेल्या डेअरी उद्योजिका श्रद्धा धवन ढोरमले यांनी यशोगाथा सांगितली. दोन म्हशीपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता 80 म्हशी असून दोन मजली गोठा आहे. सोबतच बायोगॅसपासून वीज निर्मिती प्रकल्प, गांडळूखत प्रकल्प देखील सुरू केला आहे. ग्रामीण भागातील तरुणींनी कोणतेही काम कमी न लेखता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जावे, असे आवाहनही श्रद्धा धवन यांनी केले.
………
बुटीबोरीमध्ये उभारणार पशुखाद्य प्रकल्प
बुटीबोरी येथे ५०० एकर क्षेत्रावर पशुखाद्य प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. नागपुरात दुग्धजन्य पदार्थ, संत्रा बर्फी आणि ‘धारा’ तेलाच्या उत्पादन प्रकल्पांनाही चालना दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले.
…….
नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संत्रा बर्फीसाठी विशेष स्टॉल उभारण्यात येणार आहे. दर्जेदार संत्र्यांची देशातील प्रमुख सुपरमार्केटमध्ये विक्री करण्याचे नियोजन असून, आकाराने लहान असलेल्या संत्र्यांपासून ज्यूस निर्मिती केली जाणार आहे. संत्र्याचे मूल्यवर्धन करून उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीचा खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सॅटेलाइट आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या वापरात ५० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अधिक किफायतशीर आणि फायदेशीर होऊ शकते, असेही ते म्हणाले.
याशिवाय विदर्भात १०० बायोगॅस प्रकल्प उभारण्याची योजना असून, इथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी)वर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक हजार शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात ‘स्मार्ट व्हिलेज’ उभारण्याची घोषणाही गडकरी यांनी केली.
दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास विदर्भातील शेतीला नवी दिशा मिळू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या क्षेत्रांमध्ये एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नितीन गडकरी: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दुग्धोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक असून, यातूनच शेतकरी कर्जमुक्त व समृद्ध होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ॲग्रोव्हिजन’मधील भाषणात व्यक्त केला.
पूर्वी विदर्भात सरकारी व सहकारी दूध योजना बंद असताना ‘मदर डेअरी’ला निमंत्रित केल्यामुळे आज शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर २० ते २५ रुपये अधिक दर मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला १० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले असून, आता ते ५० लाख लिटरपर्यंत नेण्याचा संकल्प आहे; तसेच बुटीबोरी येथे ५०० एकरवर पशुखाद्य प्रकल्प आणि नागपुरात दुग्धजन्य पदार्थ, संत्रा बर्फी व ‘धारा’ तेलाच्या प्रकल्पांना चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळघाटातील कुपोषण आणि गरिबी दूर करण्यासाठी तेथे दूध संकलन वाढवून दोन वर्षांत १० हजार लिटरचे उद्दिष्ट गाठण्यावर भर दिला जात असून, पुढील तीन वर्षांत वर्षाला १ कोटी रुपयांचे दूध विकणाऱ्या १०० महिला तयार करण्याचा मानस गडकरी यांनी बोलून दाखवला. याशिवाय, नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संत्रा बर्फीसाठी विशेष स्टॉल, चांगल्या संत्र्यांची देशातील सुपरमार्केटमध्ये विक्री, तर लहान संत्र्यांपासून ज्यूस निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतीतील खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी ‘एआय’ (AI), सॅटेलाइट आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून, त्यातून पाणी, खते आणि औषधांमध्ये ५० टक्के बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात १०० बायोगॅस प्रकल्प, इथेनॉल व सीबीजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे लोकार्पण तसेच पहिल्या टप्प्यात १,००० शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात ‘स्मार्ट व्हिलेज’ उभारण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली.


आमचे चॅनल subscribe करा