Homeनागपूर न्यूजबायोचारमुळे जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढण्यास मदत होते अॅग्रोव्हिजन – 2026 मध्‍ये ‘बायोचार’...

बायोचारमुळे जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढण्यास मदत होते अॅग्रोव्हिजन – 2026 मध्‍ये ‘बायोचार’ वर विशेष कार्यशाळा

Advertisements
Advertisements
Advertisements

नागपूर, २८ नोव्हेंबर :

महाराष्ट्रातील जमिनींमध्ये घटत चाललेला सेंद्रिय कर्ब आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी अवशेषांपासून तयार होणारा ‘बायोचार’ अर्थात ‘ब्लॅक गोल्ड’ जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रभावी ठरू शकतो, असे तज्ज्ञांनी कार्यशाळेत सांगितले.
राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या पटांगणावर सुरू असलेल्‍या अॅग्रोव्हिजन – 2026 च्‍या दुस-या दिवशी ‘बायोचार व सेंद्रिय घटकांद्वारे जमिनीतील कर्ब सुधारणा’ या विशेष कार्यशाळा पार पडला. यात सीआयसीआरचे शास्‍त्रज्ञ डॉ. ए. मनिकंदन, संजीवनी ॲग्रो मशिनरीतर्फे संजय क्षिरसागर, सहयोगी अधिष्‍ठाता कृषी महाविद्यालय नागपूरचे डॉ. प्रकाश कडू, संजय अप्तुरकर यांचा सहभाग होता.
डॉ. प्रकाश कडू यांनी जमिनीची सुपीकता, जलधारणा क्षमता आणि सूक्ष्मजीवांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. ए. मनिकंदन यांनी गेल्या दहा वर्षांत राज्यातील १६ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील विविध जमिनींच्या तपासणीत सरासरी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याचे सांगितले.
संजय क्षिरसागर यांनी शेतीतील कचऱ्याचे रूपांतर बायोचारमध्ये करून उत्पादन वाढविणे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व ‘इम्युनिटी पॉवर’ सुधारणे तसेच कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याबाबत माहिती दिली.
तर संजय अप्तुरकर यांनी मान्सूनचा प्रवास, दुष्काळाची कारणे आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले. हवामानशास्त्रीय, जलशास्त्रीय आणि कृषी दुष्काळाचा एकत्रित परिणाम आर्थिक व सामाजिक जीवनावर होत असून, त्यामुळे स्थलांतर वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. राहुल वडस्कर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सी. डी. मायी यांनी केले.

Advertisements

Latest बातम्या