Advertisements

Advertisements

Advertisements

नागपूर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे माजी उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शहीद गोवारी स्मारकस्थळी पुष्प अर्पण करून २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या ११४ गोवारी समाजबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी शहीद बांधवांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या बलिदानाप्रती आदरभाव व्यक्त केला.
२० नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गोवारी समाजातील हजारो नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मात्र, तत्कालीन सरकारमधील कोणताही मंत्री आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी पुढे आला नाही. आपल्या मागण्यांबाबत सरकारच्या प्रतिनिधींची प्रतीक्षा करत गोवारी समाजाचे बांधव आणि नागरिक बराच काळ ताटकळत बसले होते.
अखेर आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी रस्ता सोडण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी समाजबांधवांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी घटना म्हणून स्मरणात आहे.
शहीद गोवारी बांधवांचे बलिदान, त्यांचा संघर्ष आणि न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी दिलेला लढा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या त्यागाला विनम्र अभिवादन करून ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी आपल्या श्रद्धेच्या व आदरभावनेच्या भावना व्यक्त केल्या.
…………………..
Advertisements
