Advertisements

Advertisements

Advertisements

Advertisements

ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा रोहित पवारांना सवाल
१७ नोव्हेंबर २०२६: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत VSR Ventures चे मालक आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे छायाचित्र दाखवून संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझा रोहित पवारांना सरळ प्रश्न आहे की, कोणत्याही कार्यक्रमातील एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ दाखवून एखाद्या व्यक्तीवर संशय व्यक्त करणे अथवा आरोप करणे कितपत योग्य आहे?
जर केवळ छायाचित्रांच्या आधारे संशय निर्माण करणे हा राजकारणाचा निकष असेल, तर हाच निकष रोहित पवारांनी आपल्या आजोबा शरद पवार यांच्या संदर्भातही लावला आहे काय?
शरद पवार यांच्याबाबत टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम यांच्या संदर्भातील आरोप वेळोवेळी राजकीय चर्चेत आले आहेत. तसेच अब्दुल करीम तेलगी प्रकरणाच्या संदर्भातही विविध आरोप आणि छायाचित्रांचे उल्लेख झाले आहेत. मात्र, या आरोपांचा आणि छायाचित्रांचा आधार घेत शरद पवार यांना कधी दोषी ठरविणे बाबत बोलले आहेत काय? हा प्रश्न रोहित पवारांनी स्वतःलाच विचारला पाहिजे.
केवळ छायाचित्र म्हणजे गुन्ह्याचा पुरावा किंवा गुन्हेगारांना वाचविणे सिद्ध करता येत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकास, जनहित आणि जबाबदारीचे राजकारण महत्त्वाचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी संशयाचे वातावरण निर्माण करणे, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे दाखवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे आणि त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी बाब नाही.
रोहित पवारांनी प्रसिद्धीलोलुपता आणि प्रसिद्धीपिसाट राजकारणापासून स्वतःला दूर ठेवावे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ती छायाचित्रांच्या राजकारणापेक्षा सत्य, पुरावे आणि विकासाच्या राजकारणाला महत्त्व देते.
महाराष्ट्राची जनता अशा बेजबाबदार राजकारणाला भविष्यात योग्य उत्तर देईल, याची जाणीव रोहित पवारांनी ठेवावी,असा इशारा ही धर्मपाल मेश्राम यांनी दिला.
………………………………………….
Advertisements
