Homeनागपूर न्यूजआणि...तो संपादक करीत राहीला तिच्यावर आठ महिने नजरेने बलात्कार....

आणि…तो संपादक करीत राहीला तिच्यावर आठ महिने नजरेने बलात्कार….

संपादकांचा डर्टी पिक्चर (भाग-४)

नागपूर,ता. १५ सप्टेंबर: ती…एक पत्रकार..पुण्याच्या रानडे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेऊन,डोळ्यात असंख्य स्वप्ने घेऊन बाहेर पडलेली एक देखणी तरुणी.पत्रकारितेच्या क्ष्ेत्रात आपल्या परिश्रमाने,प्रामाणिकपणाने,बुद्धिमत्तेने आणि कर्तृत्वाने एक दिवस नक्कीच प्रतिष्ठेचं शिखर गाठेल असं त्या भाबडीला वाटलं. मात्र..तिच्याही दूर्देवाने नागपूरातील डर्टी पिक्चरमधील पाच ‘लिंगपिसाट ’ संपादकांपैकी एक संपादक तिच्या भाग्यात आला.

 

(छायाचित्र-गूगलवरुन साभार)

त्या संपादकाने माहिती नाही कोणते ‘पुण्य’कर्म केले होते की तो ते इतक्या जवाबदारीचं पद भूषवत होता,मालकाने त्याची क्वालिफिकेशन फक्त ‘पुरुष’असल्याची बघितली असावी..कदाचित! नोकरी मागायला ही तरुणी त्याच्या केबिनमध्ये जाताच तो तिचं देखणं रुप,रसरसित तारुण्य आणि सुडोल बांधा बघून घायाळ झाला. पत्रकारितेत तिची पात्रता काय?तिने कोणत्या श्रेणीत पत्रकारितेची पदवी घेतली आहे?ती सुवर्ण पदक विजेती आहे का?तिचा अनुभव किती?तिचं काम तिची योग्यता वृत्तपत्राला लाभदायक ठरणार आहे का?हे ‘निकष‘असे चारित्र्य नसणारे संपादक बघत नसतात,वृत्तपत्राचे धोरण हे महिलांना नोकरीवर न ठेवण्याचे असताना या संपादकाने त्या तरुणीला नोकरीवर ठेवले आणि…मग सुरु झाला त्याच्या विकृत चाळींचा खेळ!

वाचा : कसा आहे संपादकांचा ‘डर्टी पिक्चर….

वारंवार तो त्या तरुणीला केबिनमध्ये बाेलोवून बसवून ठेऊ लागला,तिचं नेमकं काय आवडतं..हे स्पष्टपणे सांगू लागला….नितंब,उरोज,बांधा यावर कटाक्ष् करु लागला…नजरेतूनच तो वारंवार तिच्या अस्तित्वावर,तिच्या आत्मसन्मानावर बलात्कार करु लागला…!ती…वयाने लहानशी मुलगी या सर्व प्रकाराने सैरभैर झाली..ती…ती कोणाचीतरी मुलगी होती..कोणाची तरी बहीण होती मात्र या चारित्र्यहिन आणि लिंगपिसाट संपादकासाठी ती फक्त एक ‘मादी’होती..रसरशित तारुण्याने भारलेली..!

‘तुला जर नोकरी टिकवायची असेल तर माझं ऐकावंच लागेल’असा दवाब तो तिच्यावर टाकू लागला,तिच्या मनात मात्र तो बेढब,जाडा धेंड भरणार कसा?ती ‘सर’म्हणून त्याला सन्मान देत होती तो स्त्री म्हणून तिचा उपभोग घेण्यास आतूर झाला होता…!

हेही वाचा : कशी भरते रविनगरच्या सुविख्यात हॉस्पीटलमध्ये ’डर्टी पिक्चरच्या ’संपादकांची बैठक!

‘प्रेम’ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अमूल्य भावना आहे. सोबत काम करताना,एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत असताना कोणासाठीही प्रेमाची भावना मनात निर्माण होऊ शकते आणि ‘काही’ स्त्रीयांच्या हा निसर्ग:च स्वभाव आहे त्या ज्यांच्याशी प्रेम करतात त्याच्याशी एकनिष्ठ राहतात.आपल्या करिअरसाठी,पैसा,पद,प्रसिद्धी तसेच प्रतिष्ठेसाठी प्रेमाच्या भावनेची फसवणूक करणे त्यांना जमत नाही. या क्ष्ेत्रातील पुरुषाने मात्र ‘प्रेम’या भावनेला जणू गंगा-जमुना या वेश्‍यांच्या बाजारात नेऊन बसवले.त्याला तर इतक्या वेळा प्रेम होतं, ते ही इतक्या जणींशी ज्याचा काही हिशोबच नाही,आयुष्याच्या जोडीदाराने त्याच्या दगाबाजीने दू:खी होऊन विष शरीरात भिनवले,आजही त्या औषधांवर जिवित आहेत…जिच्यावर प्रेमाचा दावा करुन प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या प्रेमाच्या‘सावली’चा ग्रंथच ज्याने लिहला तिच्या विश्‍वासाचा खून केला… तिसरीच्याच मिठीत चिखलद-याच्या रमणीय रेसॉर्टमध्ये गवसला…तिचाही नर्वस ब्रेकडाऊन झाला..तिने आपलं घरदार,क्लिनिक विकून मुंबईचा रस्ता धरला…याच्या ‘पाचा उत्तराची सुफळ कहाणी’मात्र संपता संपेत नाही…..!

प्रेमाची भावना मनात नसताना एखाद्या पुरुषासोबत लैंगिक संबध ठेवणं हे या तरुणीच्याही तत्वात बसत नसल्यामुळे तिने वारंवार त्या संपादकाला ठामपणे शरीर संबधांसाठी नकार दिला…याचा परिणाम काय झाला? पुरुषार्थ नसणा-या त्या पुरुषाचा पुरुषार्थ दूखावला गेला..मग तो वारंवार तिच्या कामात चूका काढू लागला…इतर कर्मचा-यांसमोर अपमान करु लागला..घालून पाडून बोलू लागला..त्या लिंगपिसाट संपादकाने एका महिलेच्या अस्तित्वावर आणि आत्मविश्‍वावरच घाव घातला. ते लहानसं लेकरु नैराश्‍यात गेलं. जगाचा एवढा भिषण अनुभव करिअरच्या सुरवातीलाच तिच्या नशीबी आले..तिला वाटलं…सगळं संपलं…!शेवटी त्या ‘पुण्यकर्मी’संपादकाने तिला कामावरुन काढून टाकलं!काय चूक होती तिची? हीच ना की ती भारतासारख्या संसकृतीप्रधान देशात जिथे महिलांची देवी म्हणून पूजा केली जाते अश्‍या देशात ‘मादी’म्हणून जन्म घेतला? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहलं आहे,महिलांना समान कामाचा समान पगार व कामाच्या ठिकाणी समान सन्मानाचा हक्क आहे…खरंच या एवढ्या जवाबदार पदावर बसण्याचा या संपादकांना हक्क  आहे का?

या तरुणीची हुशारी,तिची कामप्रति प्रामाणिकता या सर्व गोष्टी दुय्यम ठरल्या ,त्या संपादकासाठी ती फक्त एक ‘शरीर’होती जे भोगायला तो लिंगपिसाट आतूर झाला होता..आणि ती भोगायला मिळत नाही बघून, पदाचा दुरुपयोग करुन, त्याने तिच्या आत्मसन्मानावरच चोट केली,का?तिला कामावरुनच अवघ्या आठ महिन्यात काढून टाकले,का? तर त्याच्याकडे संपादक पद होतं…!

त्या तरुणीने अनेक महिने नैराश्‍यावर उपचार घेतला.शेवटी हे शहरच सोडून निघून गेली.आत ती देशाच्या एका मोठ्या शहरात मिडीया क्ष्ेत्रातच सन्मानाची नोकरी करत आहे मात्र तिच्यावर झालेला हा अन्याय ती अद्याप विसरलेली नाही..जरी तिने भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला असला तरी…!

Mee Too वर दाखल करणार होती तक्रार….

२०१७ साली ’मी टू’ही मोहीम जगभरात गाजली.यात महिलांवर लैंगिक तसेच इतर स्वरुपाचे अत्याचार करणा-या पुरुषांची नावे उघडपणे हॅशटॅगवरुन जगभरातील महीला या उघडपणे व धाडसाने नोंदवू लागली..मग ते क्ष्ेत्र चित्रपट क्ष्ेत्र असो,क्रिडा असो किव राजकारण असो. या तरुणीनेही धाडस करुन या लिंगपिसाट संपादकाचे नाव व वर्तन त्यात नोंदवण्याची पूर्ण मानसिक तयारी केली होती मात्र तिला कोणीतरी चुकीचा सल्ला दिला की या हॅश टॅगवर फक्त सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या अत्याचारी नोंद करता येते…आणि ती थांबली!मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे अत्याचाराला वाचा कितीही काळानंतरही फोडता येते…कारण न्याय हा प्रत्येक भारतीयाचा संवैधानिक अधिकार आहे.या तरुणीला त्यात मांडायचे होते हा बेडर,हरामखोर संपादक हा कितीदा कितीवेळ तिला केबिनमध्ये बसूवन तिच्या वक्ष् स्थळाचे निरिक्ष् ण करीत बसायचा…तिला हे कपडे घाल,तुला असे कपडे चांगले दिसतील…असे सांगून, तोंडातून लार टपकवत तिच्यावर नजरेनेच बलात्कार करायचा….!

का म्हणून सहन करावा एखाद्या महिलेने संपादकांचा असा मानसिक,भावनिक बलात्कार???या डर्टी पिक्चरमधल्या पाचही संपादकांची वृत्ती ही ‘अमानवीय’‘अशोभनीय अाणि पदाचा दुरुपयोग करणारीच आहे.ज्या महिलांचा या संबधांना होकार आहे त्यांनी खुशाल या संपादकांसोबत चिखलदरा गाठावं मात्र ज्या नकार देतात त्यांचे करिअर कोणत्या अधिकाराने हे संपादक म्हणून घेणारे चारित्र्यहीन पुरुष संपवतात?

दूर्देवाने या शहरातील काही लेखिका,निवेदिका यांचीही नावे या संपादकांसोबतच्या ‘मधूर’संबंधांमुळे चविने चर्चिली जाते. यांच्या वृत्तपत्रात नावं, लेखण आणि स्तंभ झळकायला,त्या लेखिका व निवेदिका यांनी या संपादकांसोबत स्वत:हून ‘नातं’जोडलं,यात कोणालाही आक्ष्ेप नाही.प्रत्येकाचं एक खासगी आयुष्य असतं ,व त्यांच्या खासगी आयुष्याचा ‘सत्ताधीश‘सन्मानच करतो मात्र ज्या महिला,तरुणी या नात्याला नकार देतात त्यांच्या आत्मसन्मानावर घाव घालण्याचा आणि वृत्तपत्र क्ष्ेत्रातून त्यांचं करिअरच नष्ट करण्याचा अधिकार नागपूरातील या धेंड्यांना कोणी दिला?हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो…!

किती काळ…किती दशके…या चारित्र्यहीन,खंडणीबहाद्दर,भ्रष्टाचारी ,लिंगपिसाट संपादकांच्या माफिया टोळीचे भीमपराक्रम, नागपूरच्या महिलांनी सहन करावी? या तरुणीसारखेच अश्‍या अनेक तरुणी आहेत ज्यांचे करिअर या पाच संपादकांनी आपल्या हेकेखोर,तत्वशून्य,मुल्यहीन वर्तवणूकीने भ्रष्ट आणि नष्ट केले,अनेक तरुणी यांनी हा अत्याचार,हा अन्याय मुकाट्याने सहन केला कारण कुटुंबाची प्रतिष्ठा आणि स्वत:चे करिअर याचा त्यांनी विचार केला आणि गप्प बसल्या त्यामुळे या संपादकांचे अधिकच फावले..त्यांच्या गप्प बसण्यामुळेच या धेंड्यांची हिमंत वाढली.माध्यमांमध्ये असल्यामुळे आणि मोठमोठ्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असल्यामुळे कोणीही त्यांच्या विरोधात उघडपणे विरोधाची भूमिका घेतलीच नाही त्यामुळे यांचे फावले आणि हे धेंडे अधिकाधिक अद्य:पतनात गर्त झालेत..!

मात्र येत्या २०२०-२१ च्या शैक्ष् णिक सत्रात नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद महाविद्यालयातून पत्रकारितेच्या क्ष्ेत्रात असेच खरे आणि भाबडे स्वप्न घेऊन नागपूरच्या काही वृत्तपत्रातील या संपादकांच्या केबिनमध्ये नोकरीसाठी जाण्यापूर्वीच ‘सत्ताधीश‘चा हा त्या विद्यार्थ्यांना या लेखमालेतून सावधगिरीचा इशारा आहे…सावध रहा..रात्र वै-याची आहे….!

काय आहे नीलगिरि प्रकरण जाणून घ्या, येथे क्लिक करा

‘सत्ताधीश’ची भूमिका….
नीलगिरीवर अमाप विश्‍वास असणा-या एका संपादकाने ‘सत्ताधीश‘च्या डर्टी पिक्चर या मोहीमेवर टिका करताना,सत्ताधीशच्या संपादिका या असंतुष्ट पत्रकार आहेत त्यांना कोणत्याही मोठ्या वृत्तपत्रात काम मिळाले नसल्यामुळे त्यांनी संपादकांच्या बदनामीचे हे कारस्थान रचल्याचे सांगितले.जाहीराती मिळवण्यासाठी असे लेख व्हायरल करीत असून त्यांचे पोटर्ल वाचते तरी कोण?अशी अक्कल पाझळली. ‘सत्ताधीश’हे स्पष्ट करुन इच्छिते ‘सत्ताधीश’च्या संपादिका यांनी याच शहरातील अनेक मोठ्या वृत्तपत्रात अनेक वर्ष नोकरी केली आहे.त्यामुळे त्यांचा हा आरोप निराधार ठरतो,दुसरे संवग लोकप्रियतेसाठी ‘सत्ताधीश’पत्रकारिता करीत नाही तर पत्रकारिता या पवित्र मानल्या जाणा-या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर या संपादिकेची अतुट निष्ठा आहे त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता आपणच करावी लागते या न्यायाप्रमाणे आपल्याच क्ष्ेत्रातील ’नग्न सत्य’समोर आणने हा या संपादिकेला आपला अधिकार आणि कर्तव्य वाटत असल्यामुळे त्यांनी या मालिकांचे वार्ताकंन प्रसिद्ध केले आहे.तिसरी गोष्ट ,जाहीराती मिळवण्यासाठी कोणी आपलेच मंदिर बाजारात बसवत नाही,सत्ताधीशच्या संपादिका या केंद्रिय सेवेतून निवृत्त झालेल्या एका मोठ्या अधिका-याची उच्च विद्याभूषित कन्या असल्यामुळे ‘पैसा’ हा त्यांच्यासाठी खूप शुल्लक भौतिक मुद्दा ठरतो,पत्रकारितेतून त्यांचे घर चालत नाही,या संपादकांचे घर तर लाखोंच्या पगारातूनही नाही चालले म्हणूनच ‘उर्जावान’मंत्र्याचे तसेच शहरातील एका मोठ्या बिल्डरचे लाखो रुपये खाण्यापर्यंत यांची मजल गेली, त्यामुळे स्वत: भ्रष्ट असणा-या माणसांनी इतरांचे चारित्र्यहनन करु नये,हा शहाणजोग सल्ला. असंतुष्ट पत्रकार विषयी बोलायचे झाल्यास ज्यांना स्वत:ला पत्रकारितेचे ध्येयच कळले नाही त्यांनी इतरांना असंतुष्ट बोलू नये. स्वत: संतुष्ट होऊन आणि आणि संतुष्टिची ढेकर घेऊन घरी बसलात हीच सदगुरुची कृपा समजावी.

‘सत्ताधीश’चा सावध पवित्रा-
‘सत्ताधीश’ने डर्टी पिक्चर अंतर्गत या पाचही मोठ्या धेंड्यांचे चारित्र उघड केल्याने नागपूरातील अनेक सहकारी पत्रकार,ज्येष्ठ पत्रकार,वकील मित्र,डॉक्टर्स,लेखक,साहित्यिक,कलाकार जगत इ.अनेकांकडून काळजी घेण्याचे फोन आले. शहरातील एका सुप्रसिद्ध समाजसेवीने ’शहरात पंधरा साला बाद किसी मे सच लिखने की धमक दिखी’अश्‍या शब्दात प्रोत्साहन दिले.शहरातील अनेक संस्था व संघटना यांचे या मुद्यावर ज्वलंत आंदोलन उभारण्याची विचारणा झाली. याच पुरोगामी महाराष्ट्रात दाभोळकरसारखी घटना घडली,देशात कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे ही बलिदान या देशाने बघितले.त्यामुळे कुटुंबिय,सहकारी व अनेक क्ष्ेत्रातील शुभचिंतक व हितचिंतकाच्या काळजीमुळे ‘सत्ताधीश’ने आज सत्र न्यायालयातील एका ज्येष्ठ वकीलाकडे या पाचही संपादकांच्या नावासह जीवाला धोका असल्याचे एफिडेविट फाईल करुन ठेवले आहे.सत्तेच्या या दलालांना ’सत्ताधीश’घाबरत नाही मात्र या खंडणीबाज,रेती माफिया,भू-माफिया यांच्या वर्तृळात कायम वावरणा-या या पाचही मोठ्या धेंड्यांना पाच-पन्नास हजार देऊन एखाद्याचा अपघात घडवून आणने सहज साध्य आहे, त्यामुळे सत्ताधीशच्या संपादिकेच्या केसाला जरी धक्का बसला तरी ही पाच नावे माध्यमांसमोर आणण्याची तजवीज आधीच करण्यात आली आहे.या धेंड्यांची मजल तर न्याय देखील मॅनेज करुन ठेवता येण्याची सांगण्यापर्यंत गेली असली तरी ‘सत्ताधीश’या डर्टी पिक्चरचा ‘अंतिम’ भाग कधीही प्रसिद्ध करणार नाही या भूमिकेत आहे.जोपर्यंत ही बदनाम,बदमाश,हा आजी-माजी संपादकांचा माफिया या पदावर विराजमान आहे तोपर्यंत डर्टी पिक्चरचे भाग प्रसारित होत राहतील,अत्च्यूत गोडबोले यांचाच शब्दात सांगावयाचे झाल्यास…’बदला नाही तर..नष्ट व्हाल!’

हिंदी साहित्य आणि पत्रकारितेमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना प्रामुख्याने समोर आणनारे सर्वेश्‍वर दयाल सक्सेना यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ’शब्दो के जलते कोयलो की आँच,अभी तो तेज होनी शुरु हुई है,उसकी दमक,आत्मा तक तराश देेनेवाली अपनी मुस्कान पर..मुझे लेख लेने दो’.

आजच चिनच्या विषाणूशास्त्रज्ञ डॉ.ली-मेंग यान यांनी करोनाची निर्मिती ही चिनी प्रयोगशाळेतच झाल्याची व त्याचे शास्त्रीय पुरावे देण्याची तयारी दाखवली.’लूज वूमेन’या ब्रिटीश चर्चात्मक कार्यक्रमात अज्ञात स्थळावरुन त्या सहभागी झाल्याची बातमी माध्यमात झळकली. दीर्घकाळापासून करोनाव्हायरसचा अभ्यास करणा-या डॉ.ली या ‘हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मध्ये कार्यरत होत्या. अनेक धमक्या मिळत असून ही सत्य सागांयचे धाडस यासाठी केले कारण तसे केले नसते तर पश्‍चातापाची वेळ आली असती असे त्या म्हणाल्या. भले ही त्या त्यांच्या देशासाठी देशद्रोही ठरल्या मात्र या भू-तळावरील अखिल मानव जातीसाठी त्या एक प्रामाणिक ‘माणूस’ठरल्या,यात दूमत नाही.

‘सत्ताधीश ‘ला ही या पाचही संपादकांसोबत कोणतेही वैयक्तिक वैर नाही मात्र ज्याप्रमाणे त्यांनी या आदरणीय पदाचा दुरुपयोग केला ते बघून या शहरात कोणीतरी त्यांच्या माफियाबाजीविरोधात,परिणामांना न घाबरता आवाज उठवणे हे गरजेचे होते. अर्थात या पैकी एका संपादकाचे नागपूरातील एका मंत्र्यांनी ज्या पद्धतीने पुर्नवसन करुन पून्हा खूर्चीची उब दिली ते बघून अनेक बुद्धिजीवींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे ५ ही संपादक सन्मानाने घरी बसे पर्यंत ‘सत्ताधीश’चा हा न्याय-अन्यायाचा लढा अविरत सुरुच राहील,तुर्तास एवढेच.

Latest बातम्या