
जालन्याच्या घटनांनी पुन्हा काळवंडला चौथा स्तंभ:नागपूरातही काय घडले ९ मार्चला?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २९ ऑगस्ट : पाच वर्षांपूर्वी २०१५ मध्ये पुरोगामी महाराष्ट्राच्या जालन्यात घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण जालना शहर ढवळून निघाले होते. एका वृत्तपत्राच्या संपादक विरोधात तेथील एका मुलींच्या वसतीगृहातील मुलींनी पोलीस ठाण्यात विनय भंगाची तक्रार नोंदवली होती.या प्रकरणात त्या संपादकाला अटक देखील झाली होती मात्र १२ दिवसांनी त्याला न्यायालयातून जामिन मिळाला.यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत तो संपादक निर्दोष सुटला. त्याच्यासोबतच त्या वसतीगृहातील अधिक्ष्किा हिच्याविरोधात देखील वसतीगृहातील मुलींनी तक्रार नोंदवली होती,तिने या प्रकरणात सपशेल त्या संपादकाची बाजू उचलून धरली होती.मात्र हे प्रकरण जालन्यात चांगलच गाजलं होतं.रात्री-अपरात्री मुलींच्या वसतीगृहात एका वृत्तपत्राच्या संपादकाला येण्याची परवानगी देणे,याचा अर्थ २१ साव्या शतकातील तिस-या दशकाकडे वाटचाल करणा-या सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही.अनेक दिवस जालन्यात ज्या वृत्तपत्राने या घटनेची मोठी बातमी छापली तेच वृत्तपत्र पुढे या संपादकाने चक्क विकत घेतले,हे आणखी एक विशेष!
जालन्यातीलच आणखी एका वृत्तपत्राच्या संपादकाविरुद्ध आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल झाली होती, फार मोठ्या आर्थिक व्यवहारात त्या संपादाकाला अटक देखील झाली होती.सात वर्षांपूर्वी गुन्हेगार पार्श्वभूमीचा हा संपादक देखील चक्क पत्रकारितेच्या क्षेत्रातच मग उतरला.या संपादकावर संशयास्पद आर्थिक व्यवहारातूनच जीवघेणा हल्ला देखील झाला होता.
हा जुना मुद्दा आज पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे,लोकशाहीचा चौथ्या स्तंभात समाजातील कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांनी घूसखोरी केली आहे,हे आता ठलकपणे निर्दशनास येतं.‘जो कुठेच चालत नाही तो पत्रकारितेत आरामात चालतो’‘गुन्हेगारांसाठी पत्रकारिता आता एक सोयीचा व्यवसायच कसा झाला आहे’ या अश्या मानसिकतेवर नुकतेच जालन्यातील एका साप्ताहिकाने त्या संपादकांच्या नावांसह वृत्त छापले आणि जालन्याच्या पत्रकारितेच्या जगतात मोठा हलकल्लोळ माजला. या दोन्ही संपादंकानी या साप्ताहिकाच्या संपदाकांविरोधात आता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.मात्र तरीही प्रश्न उरतोच,या देशात वकीलांना,व्यवसायिकांना,प्रत्येक क्ष्ेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांना आचारसंहिता (कोड ऑफ कन्डंक्ट) आहे,मग पत्रकारितेसाठी का नाही?प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया अश्या या घटनांची कितपत गांर्भीयाने दखल घेताना दिसतेय?
या दोन्ही संपादकांच्या विरोधात नुकतेच तेथील प्रदुषण मंडळाच्या महिला प्रमुखाने देखील पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार नोंदवली आहे. वेळी-अवेळी हे दोन्ही संपादक त्यांच्या कक्ष्ात येऊन प्रदुषणाबाबत माहिती मागत असल्याचे सांगितले जात आहे. या महिला अधिकारीला धमकावणे,रात्री-अपरात्री फोन करणे इ.आरोप त्यांनी आरोप पत्रात केले आहे. मूळात एखाद्या सरकारी विभागामध्ये एखाद्या अधिका-याकडून एखाद्या बातमीसाठी माहिती घेण्यासाठी वारंवार जाणे हे संपादकांचे काम आहे का?की त्या वृत्तपत्रातील बातमीदाराचे आहे?याही प्रश्नावर बराच खलल जालन्यात झाला.
नागपूरातही संपादकांचा ‘डर्टी पिक्चर…’
भ्रष्ट आणि चारित्र्यहीन संपादकांच्या यादीत नागपूरातील देखील काही संपादकांचा उल्लेख दूर्देवाने आवर्जून करावा लागतो.या संपादकांनी देखील आपल्या पदाचा गैरवापर करुन भरपूर ‘माया’कमावली,शराब आणि शबाबचा आनंद लृटला,ज्यांच्यावर त्यांनी डूग धरला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला,ज्यांच्यावर त्यांचे प्रेम होते त्यांना पात्रता नसताना केवळ संपादकांची चाटूकारिता या ’एकाच निकषावर’ वरती बढती देत गेले,कार्यालयातील ज्या महिला कर्मचारींनी ‘बाईपणाच्या क्वालिफिकेशनवर ’त्यांची खास ‘मर्जी’राखली त्यांना देखील पगार आणि पदाची ‘मनसोक्त’ खैरात वाटल्याची अनेक उदाहरणे आहेत.जी नागपूरच्या पत्रकार जगतात ‘चवीचवीने’चर्चिली जातात.
पत्रकार जगताने एक काळ असा ही बघितला आहे जेव्हा ही संपादक मंडळी आपल्या कर्तृत्वाने पत्रकार घडवित होती. २०१८ पर्यंत जे ज्येष्ठ पत्रकार निवृत्त झालेत त्यांचा उल्लेख अर्वाजून करता येईल.यात एखाद-दोन नावे घेता येणारच नाही,ही संख्या सन्मानजनक अशी आहे.या संपादकानी प्रतिभेला किंमत दिली,चाटूकारितेला नाही. वैयक्तिक हेवेदावे जोपासले नाहीत.या संपादकांनी आपली निष्ठा कायम आपल्या मालकाप्रति किवा संस्थेप्रतिच राखली. कार्यालयातील सुंदर स्त्रिया या त्यांच्यासाठी ‘सावज’कधीही राहील्या नाहीत तर जवाबदारी होत्या.त्यांची पत्रकारिता ही समाजाभिमूख होती,यात जात-पात,वर्ग,लिंगभेदाला जागा नव्हती.
या ज्येष्ठांनी कधीही ‘चिखलदरा रेस्ट हाऊस’गाजवले नाही!कार्यस्थळ हे त्यांच्यासाठी कायम पवित्र स्थळ राहीले,नागपूरातील काही संपादकांनी मात्र कार्यस्थळातील काही स्त्रियांनाच अपवित्र करण्यासाठी चिखलदरा गाठले. या कृत्यासाठी त्यांनी काही महिलांच्या नव-यांचा ‘जोड्याजोड्याने’रेड हेण्ड पकडल्या गेल्याने चांगलाच मार देखील खालला,मूल्याधिष्ठित पत्रकारिता,तत्वनिष्ठ पत्रकारिता इ.सगळी शब्दे,नागपूरातील या काही संपादकांनी बासनात गूूंडाळून ठेवली व मालकाला अंधारात ठेऊन आपल्या तुंबड्या भरुन घेतल्या….!पदाची मगरुरी एवढी की आपल्याच सहका-यांना तुच्छतेची वागणूक देखील दिली…!
९ मार्चला नेमके काय घडले होते….?
नागपूरातील पत्रकार जगतात वर्धा रोडवरील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक ‘न भूतो न भविष्यती‘असे एक महानाट्य ९ मार्च रोजी घडले,अगदी कोविडच्या काळात!जेव्हा वृत्तपत्रांचे मालक हे वृत्तपत्र सुरळीत चालवण्यासाठी मेताकूटीला आले होते तेव्हा या पंचतारांकित हॉटेलमध्ये ’कोटीच्या कोटी उड्डाणे’काही संपादकांसोबत झाली.शहरातील एका ख्यातनाम बिल्डरने याची तक्रार शहरातील एका मोठ्या नेत्याकडे केली आणि या संपादकांच्या कुंडलीतील सर्व ग्रहच पालटले! जसा या संपादकांच्या क्रूर आणि मगरुर स्वभावाचा अनुभव अनेक कार्यालयीन पत्रकार व कर्मचा-यांनी घेतला,तसाच अनुभव जणू कुंडलीतील काही क्रूर ग्रहांचा या संपादकांना आला!
त्या मोठ्या नेत्याने चक्क या संपादकांच्या कोटीच्या कोटी उड्डाणाची माहिती मालकापर्यंतच पोहोचवली आणि…’.मालकाच्या जीवावर बाईजी उदार’झालेल्या काही संपादकांची, मालकाने गच्छंती केली….!काहींची अद्याप व्हायची असल्यानेच या शहरातील काही संपादकांचा ’डर्टी पिक्चर’ अद्याप पूर्ण झाला नसून ’पिक्चर अभी बाकी है दोस्त’म्हणत नागपूरातील पत्रकारीतेच्या जगतात ९ मार्च रोजी नेमके काय घडले होते?याचीच चर्चा होत आहे.
फेसबूक पोस्टद्वारे दुबळे समर्थन…
सोशल मिडीया हा आजच्या काळात सर्वात प्रभावी माध्यम मानला जातो,याच माध्यमाद्वारे नुकतेच एका माजी संपादकांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची गाथा त्यांच्या अनेक ‘चाहत्यांकडून’व्हायरल करुन घेतली.एवढेच नव्हे तर एका ‘संपादक भक्ताने’त्यांचे समर्थन करताना नागपूरातील काही गुणी पत्रकारांचे वर्णन ’कारकून पत्रकार’म्हणून केले आणि प्रामाणिक पत्रकारांमध्ये चांगलाच संताप उमटला.एका मोठ्या वृत्तपत्राच्या पत्रकाराने याला सडेतोड उत्तर देखील दिले आहे.मात्र पद गेल्यावरही एवढे मोठे पद भूषवणारी ही माणसे....कोणत्या लायकीची होती….हे या निमित्ताने इतरांना ही कळले…!

आमचे चॅनल subscribe करा