Homeसांस्कृतिक / मनोरंजनश्री आग्याराम देवी मंदिरात ‘अश्‍विन’नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून

श्री आग्याराम देवी मंदिरात ‘अश्‍विन’नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून

नागपूर,ता.९ ऑक्टोबर २०२६: श्री आग्याराम देवी मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नसून असे देवस्थान आहे जिथे इतिहास,संस्कृती आणि आस्था जिवंत स्वरुपात वास्तव्यास असते.हे मंदिर आपल्या अद्धितीय वैशिष्ठे आणि गही-या धार्मिक पंरपरेतून भाविकांसाठी एक महत्वपूर्ण केंद्र बनले असल्याचे मंदिराचे सचिव महेशकुमार हरगोविंदजी गाेयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपूरातील अति पुरातन व भोंसलेकालीन नगरदेवी म्हणून प्रख्यात असलेल्या श्री आग्यारम देवी मंदिर ट्रस्टतर्फे पंरपरागत अश्‍विन नवरात्रीची सुरवात येत्या ११ ऑक्टोबरपासून होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.२० ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सवाची सांगता होईल.यंदा देखील भाविकांच्या दर्शन व सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिर ट्रस्टतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली असल्याचे गोयल यांनी सांगितले.
प्रसाद वितरण,देवीचे दर्शन,पूजन व आरतीच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन यंदाही मंदिर ट्रस्टतर्फे विशेष नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.यात दर्शन व्यवस्था,अखंड मनोकामना ज्योत,पुजा व प्रसाद वितरण व्यवस्था,पादत्राणे व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था,स्वागत व्यवस्था इत्यादी साठी विशेष समितींचे गठन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलन सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत दुपारी ३.३० ते ५ वाजे पर्यंत राहील.नवमी हवन पुजन सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान होईल.कन्याभोजन १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता होईल.घटविसर्जन १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ५ वा.दरम्यान मंदिर प्रांगणात होईल.महाप्रसादाचे आयोजन २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान संपंन्न होईल.
या नवरात्री महोत्सवात दररोज सकाळी १० वाजता तसेच रात्री ८ वाजता देवीची आरती होईल.नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे.दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अायोजन करण्यात आले आहे.मोठ्या संख्येने भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे अावाहन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीजाशंकर अग्रवाल,उपाध्यक्ष माजी आमदार गिरीश व्यास,सचिव महेशकुमार गोयल,कोषाध्यक्ष सुरेश तिवारी,सदस्य विनोद आष्टीकर,हरिओम बद्रीप्रसाद अग्रवाल,रामचंद्र पिल्लारे,विकास पेटकर तसेच आयोजन समितीने केले आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडियो sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)

Latest बातम्या