

हिस्लॉप कॉलेजच्या ‘फ्लॉवर फेस्ट’ने पुष्पप्रेमींचे मन फूलले
नागपूर,ता. १२ डिसेंबर: प्रत्येक वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या पहील्या शनिवारी व रविवारी सिव्हिल लाईन्स येथील हिस्लॉप महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सुप्रसिद्ध पुष्प प्रदर्शनीचे आयोजन केल्या जातं.पुष्प प्रदर्शनीचे हे हे १७ वे वर्ष आहे.सुरवातीला या पुष्प प्रदर्शनाची सुरवात अतिशय छोट्या प्रमाणात झाली मात्र बघता बघता या पुष्प प्रदर्शनीचा भरपूर विस्तार झाला.आज या पुष्प प्रदर्शनील हिस्लॉप महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे एकट्या शेवंतीचेच १०० प्रकार प्रदर्शित होत असतात.शेवंती ही या पुष्प प्रदर्शनीचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट असे तरी इतर ऋतूनुसार देखील सुंदर पुष्पांचे रोपटे हे देखील या पुष्प प्रदर्शनीचे वैशिष्ट ठरतं.

मॅरीगोल्ड,पेटोनिया,डायनथस आणि फ्लाक्स इ. रोपटे हे या पुष्प प्रदर्शनिचे खास वैशिष्ट आहे.या प्रदर्शनीचा उद्देश्य फक्त प्रदर्शन नसून शहरातील पुष्प प्रेमींना या निरनिराळ्या सुंदर रोपट्यांची विक्री करुन याद्वारे अर्थाजनाला देखील चालना दिली जाते.
यासोबतच याच पुष्प प्रदर्शनीचा एक प्रसिद्ध भाग असणारी ‘पॅपीलियन’ ही चित्रकला स्पर्धा होय,या वर्षी कोविड-१९ मुळे ही स्पर्धा ऑन लाईन घेण्यात आली.ही स्पर्धा ठेवण्यामागील उद्देश्य म्हणजे लहान विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंबधीची जागरुकता तर आहेच मात त्यासोबतच त्यांना निर्सर्गाच्या सौंदर्याची ओळख व्हावी म्हणून ही चित्रकला स्पर्धा दरवर्षी अायोजित केली जाते.म्हणूनच ती कोविउ-१९ चा प्रकाेप असला तरी ती ऑन लाईन घेण्यात आली,यात खंड पडू दिला नाही.या स्पर्धेत नागपूरातील विविध शाळेतील विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात,हे विशेष.या वर्षी देखील या विद्यार्थ्यांनी काढलेली पर्यावरणासंबंधीची अप्रतिम चित्रे प्रर्दशनाचे महत्व वाढवत आहेत.


या पुष्प प्रदर्शनीत वनस्पतीशास्त्र विभागातर्फे साधारण: दहा हजारच्या जवळपास पुष्प, प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे सगळं शक्य झालं, ते म्हणजे महाविद्यालयाच्या प्रशस्त जागेचा प्रभावी उपयोग,ऋतूप्रमाणे वेळेचे नियोजन आणि टिम वर्क.यांना श्रेय जातं.
पुष्प प्रदर्शनासाठी नैसेर्गिक गांडूल खत,हे देखील महाविद्यालयाच्याच परिसरात बनवलं जातं.बुरशीसारखे तंत्रज्ञान वापरुन ऑरगेनिक खतांची निर्मिती केली जाते.
हिस्लॉप महाविद्यालयातील दर वर्षी भरणारे हे पुष्प प्रदर्शन हे या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा देखील एक भाग आहे,हे विशेष!प्राध्यापक वर्ग हे देखील आपले संपूर्ण कौशल्य या निरनिराळ्या पुष्पांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आत्मसात करीत असतात.
या प्रदर्शनीतील पुष्प हे खूप नाजूक असले तरी खूप मनमोहक सुगंध दरवळणारी आहेत.आकाराने लहान असली तरी सौंदर्यामध्ये अप्रतिम आहे.या पुष्पांचे जीवनमान कमी असले तरी परंपरां खूप मोठी आहे.
या संपूर्ण यशाचे श्रेय वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.मौसमी भोवाल, प्रा.परमा मुजुममदार, डॉ.मयंक वरुण,डॉ.शिवाणी डोंगरवार,तसेच कुमारी निकीता फूले यांना जातं.

या वर्षी या प्रदर्शनचीे उद् घाटन आज शनिवार दि. १२ डिसेंबर रोजी झाले असून या वेळी डिसेंबर महिन्यातील पहीला आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी ऋतूमानानुसार योग्य नसल्याने दुस-या आठवड्यात भरवण्यात आले असल्याचे खास ‘सत्ताधीश‘कडे डॉ.मौसमी भोवाल यांनी सांगितले.या प्रदर्शनला मिळणारा पुष्प प्रेमींचा प्रतिसाद हा दर वर्षीच भव्य असा असतो.यावेळी देखील उद् घाटनापूर्वीच अनेक पुष्प प्रेमींनी सामाजिक अंतर राखता यावे म्हणून आधीच पुष्पांची खरेदी केल्याचे त्या सांगतात.पुष्प प्रदर्शनीत सर्वात जास्त मागणी ही शेवंतीच्या निरनिराळ्या प्रकारालाच असते.मात्र इतर ही शो चे रोपटे पुष्पप्रेमी खरेदी करुन घेऊन जातात.
या वेळी क्रिसमसचा सण लक्ष्ात ठेऊन प्रदर्शनीत लहानसे क्रिसमसचे झाडही येणा-या पुष्प प्रेमींसाठी सजविण्यात आले आहे.जे प्रेत्येकाच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.आज प्रदर्शनाच्या पहील्याच दिवशी महाविद्यालयीन तरुणाईच्या गर्दीने हा संपूर्ण परिसर दर वर्षीसारखाच फूलला होता.
निरनिराळ्या रंगबिरंगी,सुंदर रोपट्यांसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा जणू तरुणाईमध्ये रंगली होती,यात मध्यमवयीन जोडपे देखील मागे नव्हती.एकदंरीत दोन दिवस भरणारे हे पुष्प प्रदर्शन म्हणजे नागपूरातील पुष्प प्रेमींच्या जीवनात ‘फूलले रे क्ष् ण माझे फूलले रे….’या गाण्याचीच प्रचिती देणारे होते.उद्या रविवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा.पर्यंत पुष्प प्रेमींना या प्रदर्शनीचा आनंद घेता येईल.




आमचे चॅनल subscribe करा
