
लढा विज बिलाचा व स्वतंत्र विदर्भाचा: करोना काळातील विज बिल सरकारने भरावे
नागपूर,ता. ६ डिसेंबर: करोना काळात तसेही सामान्य जनता ही ४ महिने घरीच बसून होती,कोणतेही काम धंदा,उद्योग सुरु नव्हते,अश्या कठीण काळात सामान्य जनतेपक कश्याप्रकारक दोन वेळची जेवणाची व जगण्याची भ्रांत भागवली,याची कल्पनाही न केलेली बरी,अश्या वेळी राज्य सरकारच्या महावितरण विभागाने याच सामान्य जनतेवर १० पट जास्त बिज बिलांचा अधिभार लादला,ज्यांना ७०० रु.विज बिल येत होते त्यांना ४ हजारच्या वर विज बिल पाठवण्यात आले.ते ही एक नव्हे तर तीन महीन्यांचे एकसाथ बिले पाठवली,वरुन विज बिल न भरल्यास विजेचे कनेक्शन कापण्याची धमकी ही दिली.
एकीकडे जनतेवर करोनासारख्या मानवनिर्मित संकटाचा सामना करण्याची वेळ आली,दुसरीकडे अतिवृष्टि,पीकांवरील कीडीमुळे विदर्भाचा शेतकरी हा हवालदिल झाला.मात्र विदर्भ विराेधी ठाकरे सरकारने विदर्भात शेतक-यांचे एवढे प्रचंड नुकसान झाले असताना ९९९३ कोटींपैंकी फक्त ७ कोटी विदर्भाला देऊन १० हजार कोटींच्या पॅकेजमध्ये विदर्भाची जागा पुन्हा एकदा दाखवून दिली!
परिणामी अश्या या विदर्भविरोधी सरकारच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे उद्या ७ डिसेंबर रोजी १०० ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी गांधी पुतळ्याला साकडे घातले जाईल.ठाकरे सरकारने करोना काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे तसेच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला समर्थन द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार अाहे.अशी माहिती पत्र परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, यांनी दिली.
यानंतरही सरकारने विज बिल माफ नाही केले तर ४ जानेवारीला उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला.या घेराव आंदोलनात विदर्भातून हजारो विज ग्राहक व विदर्भवादी उपस्थित राहतील असे त्यांनी सांगितले.
उद्या ७ डिसेंबर रोजी विदर्भ आंदोलन समितीतर्फे दुपारी १२ ते ४ दरम्यान व्हेरायटी चौकातील गांधी पुतळा येथे ठिय्या आंदोलन होईल.पत्रपरिषदेत विष्णुजी आष्टीकर, मुकेश मासुरकर, सूनिता येरणे, रेखा निमजे, गुलाबराव धांडे, प्रशांत मुळे, ज्योती खांडेकर यावेळी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा