फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजएलईडी दिव्यांच्या बिलांवर करोनाबाधित मनपा अभियंताला स्वाक्ष् रीची घाई

एलईडी दिव्यांच्या बिलांवर करोनाबाधित मनपा अभियंताला स्वाक्ष् रीची घाई

Advertisements

मनपाच्या विद्युत विभागात असाही प्रताप

नागपूर,ता. ६ डिसेंबर: जागतिक महामारी कोविड-१९च्या संदर्भात जागतिक किवा आरसीएमआरची मार्गदर्शक तत्वे कोणतीही असली तरी नागपूर महानगरपालिकेच्या एकंदरित कारभारावर ती लागू होत नाही! भाजपची एकहाती सत्ता असणा-या मनपातील कारभार गेल्या १४ वर्षांपासून जसा सुरु आहेत तसाचा अर्निबंधपणे कोविड-१९च्या काळातही ‘भयमुक्त’कसा सुरु आहे याचे आणखी एक उदाहरण मनपाच्या विद्युत विभागातील एका करोनाबाधित प्रभारी कार्यकारी अभियंताचा ‘कर्तव्यदक्ष् कार्यभार’होय.

हे अधिकारी महाशय करोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅर्म होम’ अंतर्गत कार्य करीत आहे.कार्यालयातून बिलांवर स्वाक्ष् री करण्यासाठी फाईल्स व देयके यांच्यावर स्वाक्ष् री करीत आहेत.विशेष म्हणजे त्या सर्व फाईल्स मग मनपाच्या वित्त विभागात जात आहेत,परिणामी विद्युत विभागासोबतच वित्त विभागाच्या कर्मचा-यांचे देखील धाबे दणाणले आहेत.

घरुन बिलांवर स्वाक्ष् री करीत असल्याबाबतची कोणतीही कल्पना या अभियंतांनी मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाला दिली नाही.विभागातील इतर कर्मचा-यांनीच ही माहिती सामान्य प्रशासन विभागाला दिली,परंतू सामान्य प्रशासनाकडे त्याची नोंद ही नाही!या प्रकारामुळे विभागात कार्यरत तीस कर्मचा-यांसह बिले जात असलेल्या लेखा विभागातही भीतीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाने हे कार्यकारी अभियंता करोनाबाधित असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

मनपातील या विद्युत कार्यकारी अभियंताला अचानक ताप भरला.यानंतर ते करोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले.त्यामुळे त्यांनी घरुनच कामास सुरवात केली. २२ नोव्हेंबरला त्यांनी ही माहिती आरोग्य विभागाला दिली.सध्या ते गृहविलगीकरणाच आहेत.विभागातील अनेकांनी त्यांना रजा घेण्याची विनंती केली मात्र त्यांनी अट्टहासाने ‘वर्क फ्रॉम होम’चा ‘गैरफायदा’ घेत घरुनच कामाला सुरवात केली.त्यामुळे कार्यालयातून अनेक फाईल्स व बिले त्यांच्या स्वाक्ष् रीसाठी त्यांच्या घरी पोहोचल्यात.यात एलईडी दिवे व इतर कामासंदर्भातील बिलांचा समावेश आहे,हे विशेष!

विभागातील बिले एका लिपिकाने विभागा प्रमुखाच्या घरी नेऊन दिली.त्यावर स्वाक्ष् री करुन अभियंत्यांनी ती कार्यालयात पाठवली.यानंतर त्या बिलांच्या फाईल्स मनपातीलच लेखा व वित्त विभागाकडे सादर झाल्या!यामुळे इतरांमध्येही फाईल्सच्या माध्यमातून करोना संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली.

बाधित अभियंत्यांनी या काळात दुस-या कोणालाही तात्पुरता कार्यभार सोपवला नाही. विभागातील एका अभियंत्यास काम लांबू नये म्हणून काही फाइल्स बघण्यास सांगितले.परंतु, बिलांच्या फाईल्सवर स्वाक्ष् री करण्याची मनाई करण्यात आली!नियमानुसार बिलांच्या फाईल्सवर तात्पुरते काम बघण्यास सांगण्यात आलेला अधिकारी स्वाक्ष् री करु शकत नसला तरी या फाईल्स एवढ्या तातडीने करोनाबाधित अभियंत्यांच्या घरी पाठवण्याची देखील मनपा प्रशासनाला काय घाई होती?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.
महत्वाचे म्हणजे,हा सर्व प्रकार मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाला माहिती असतानासुद्धा विभागाने त्या अभियंत्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र किवा करोनाबाधित असल्याची माहिती लपवून ठेवली!केवळ विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनाच ही बाब माहिती असल्याने मनपात परत करोनासंसर्ग वाढण्यासाठी त्या ‘जवाबदार’व सुशिक्ष्ति अभियंत्यांचा अट्टहास कारणीभूत ठरु शकतो,असे आता खासगीत बोलले जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात मनपात ४५०च्या वर कर्मचारी व अधिकारी हे करोनाबाधित झाले होते.ज्या मनपावर नागपूर शहराचे पालकत्व आहे,तेच पूर्णपणे ‘बिमारु’ होऊन ठप्प झाले होते.यातील अनेकांचा दूर्देवी मृत्यू ही झाला.तरीदेखील बाधित अभियंताला घरुन बिलांवर स्वाक्ष् री करण्याची कोणती घाई नडली होती,याबाबत आता चर्चेस पेव फूटले आहे.

नागपूर महानगरपालिका म्हणजे प्रशासन व पदाधिकारींसाठी फक्त ‘दूधारु गाय’असल्याचे खासगीत बोलले जाते.परिणामी अगदी करोनासारखी जागतिक महामारी ही जरी मनपातील अधिकारी किवा पदाधिकारी यांना झाली तरी या ‘दूधारु गाईच्या दोहनाचा लोभ’कोणालाही सूटत नाही,असे संतापाने आता बोलले जात आहे!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या