Homeनागपूर न्यूजॲड. वंजारींच्‍या विजयाची खात्री: ना. प्रफुल्‍ल पटेल

ॲड. वंजारींच्‍या विजयाची खात्री: ना. प्रफुल्‍ल पटेल

गोंदियात झालेल्‍या सभेला लावली उपस्‍थिती

नागपूर, २९ नोव्‍हेबर: राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते, संसद सदस्‍य ना. प्रफुल्‍ल पटेल यांनी गोंदिया येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांच्‍या प्रचार सभेला उपस्‍थिती लावली. त्‍यांनी यावेळी ॲड. वंजारी हे पदवीधर मतदार संघातून नक्‍कीच निवडून येतील अशी खात्री व्‍यक्‍त केली.

गोंदिया स्थित वैभव लॉनमध्‍ये महाराष्ट्र विधान परिषदेच्‍या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांच्‍या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या सभेला विधानसभा अध्‍यक्ष नाना पटोलले, आमदार सहसराम कोरोटे यांच्‍यासह अनेक वरिष्‍ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.
प्रफुल्‍ल पटेल यांनी ॲड. वंजारी यांच्‍या समर्थनार्थ विदर्भातील सर्व संघटना आणि नेते एकत्र आल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. ॲड.वंजारी यांनी प्रचाराचा जो धडाका लावला आहे तो बघता त्‍यांचा विजय निश्‍चित आहे, असे ते यावेळी म्‍हणाले.

शिक्षक समन्वय समितीचे जाहीर समर्थन
अॅड.अभिजीत वंजारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्य.स्तर) आयइडीएसएस या संघटनाने नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत अॅड. वंजारी यांना समर्थन जाहीर केले.

बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुआ, संघटनेचे अध्यक्ष विनोद नाकाडे, सचिव सतिश वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे , गिरीश पांडव , विशाल मुत्तेमवार , नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, किशोर गजभिये, दिनेश तराळे, वासुदेवराव ढोके, सुनील पाटील, विणा बेलगे, विश्वेश्वर अहिरकर, राम कावडकर , शत्रुघ्‍न चंदेल, मामा राऊत, संजय गभणे, राजेश रहाटे, मच्छिंद्र सावळे, श्रीवंत शेंडे, बंडू कबडे यांची उपस्‍थिती होती.

Latest बातम्या