Homeब्रेकिंग न्यूजॲड. वंजारी यांना बहुमताने विजयी करा: अनिल देशमुख

ॲड. वंजारी यांना बहुमताने विजयी करा: अनिल देशमुख

Advertisements

नागपूर, १७ नोव्हेंबर : नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पिरिपा (कवाडे), आरपीआय (गवई गट) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड.अभिजीत वंजारी हे अतिशय मेहनती असून त्यांना पदवीधरांच्या समस्यांबद्दलची तळमळ आहे. पदवीधरांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी अॅड. वंजारी यांनाच निवडून द्या, असे आवाहन गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र विधान परिषदेत परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धाराने पदवीधर मतदार संघाचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या रोज प्रचार सभा सुरू असून बुधवारी ऊर्जा भवन सेमीनरी हिल्‍स येथे झालेल्या सभेला ना. अनिल देशमुख यांच्यासह सर्व माजी आमदार रमेश बंग, अनिस अहमद, प्रकाश गजभिये, दिनानाथ पडोळे तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष बाबासाहेब मुसर व राजाभाऊ तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. अनिल देशमुख यांनी ॲड. वंजारी यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतूक करतानाच त्यांचा दांडगा अनुभव, निवडणुकीसाठी त्यांनी केलेली तयारी आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण यांचाही उल्लेख केला.

कॉंग्रेसने अतिशय योग्य उमेदवाराला तिकीट दिले असून भाजपाला ॲड. वंजारी निश्चितपणे मात देतील आणि बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ॲड. वंजारी यांनी पक्षातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठे नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भाजपाच्या किल्याला खिंडार करून पदवीधर मतदार संघाची जागा कॉंग्रेसकडे खेचून आणेन, असा विश्वास व्यक्त केला.

Latest बातम्या