
अनेक नेत्यांची सभेला उपस्थिती
नागपूर,१५ नोव्हेंबर : ॲड. अभिजीत वंजारी यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असून त्यामाध्यमातून ते विद्यार्थी घडवत आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी स्काॅलरशीपसारखे अनेक उपक्रम त्यांनी रावबले असून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. कॉंग्रेसने एक उमदा आणि मेहनती उमेदवार विधान परिषदेसाठी दिला असून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या, असे आवाहन दुग्धविकास मंत्री व वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पिरिपा पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांनी धडाक्यात प्रचाराला प्रारंभ केला असून रविवारी कुसूमताई वानखेडे सभागृहात झालेल्या सभेला दुग्धविकास मंत्री व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह मंचावर उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार राजू पारवे, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे, किशोर गजभिये, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, गिरीश पांडव, गेव्ह आवारी, सुरेश भोयर, उमाकांत अग्निहोत्री, बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे, तानाजी वानवे, इशाद अली,प्रज्ञा बळवाईक, हुकुमचंद आमधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सुनील केदार म्हणाले की, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पदवीधर मतदार नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे ॲड. वंजारी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांना या निवडणूकीत विजयी करून महाविकास आघाडीचा उमेदवार विधानपरिषदेवर देण्याचा आपण प्रण करूया, असे सुनील केदार म्हणाले.
कार्यक्रमाला नगरसेवक रश्मी धुर्वे, उज्ज्वला बनकर, रमेश पुणेकर, फिरोज खान, मनोज गावंडे, हरीश गोलवंसे, विवेक निकोसे, पंकज लोणारे, सयदा बेगम, यांच्यासह यावेळी डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, राजेश कुंभलकर, अण्णाजी राऊत,फिरोज खान, संदेश सिंगलकर, हेमराज शेंडे, संजय सरायकर, घनश्याम मांगे, विणा बेलगे, रवी पाटील, रश्मी बर्वे, मनोहर कुंभारे, भारती पाटील, नेमावली मोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानपरिषदेत गेल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रश्नांना गती देण्याचे काम करील: ॲड. अभिजीत वंजारी
विधानपरिषदेत गेल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रश्नांना गती देण्याचे काम करील आणि आपला विश्वास सार्थक ठरवील, असे म्हणत यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. ॲड.. अभिजीत वंजारी यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी कार्यकत्यांवर विश्वास दर्शवत कॉंग्रेसला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले.

आमचे चॅनल subscribe करा