Homeनागपूर न्यूजप्रमोड मानमोडे शिवसेना महानगरप्रमुख पदी विराजमान

प्रमोड मानमोडे शिवसेना महानगरप्रमुख पदी विराजमान

शिवसेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या घोषित

नागपूर,ता. २९ ऑक्टोबर: मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर शहराच्या पदाधिका-यांच्या नियुकत्यांचा आदेश अखेर निघाला.नुकतेच शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेले निर्मल अर्बन बँकेचे संचालक प्रमोद मानमोडे यांची महानगरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगर संघटक पदी मंगेश काशीकर यांची नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे नागपूर शहर दक्ष्णि व दक्षिण-पश्‍चिम मतदार संघाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

किशोर पराते यांच्याकडे पश्‍चिम व मध्यचा पदभार,विशाल बरबटे यांच्याकडे उत्तर व पूर्व मतदार संघाच पदभार देण्यात आला आहे.
शहरप्रमुख पदी दिपक कापसे यांची नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे मध्य,दक्षिण तसेच दक्षिण-पश्‍चिम मतदार संघ सोपवण्यात आला आहे. नितीन तिवारी यांच्याकडे उत्तर,पूर्व व पश्‍चिम मतदार संघाचा कार्यभार देण्यात आला.

उपमहानगर प्रमुख पदी बंडू तलवेकर यांची नियुक्ती झाली असूून त्यांच्याकडे उत्तर मतदार संघाची जवाबदारी सोपवण्यात आली असून गुड्डू रहांगडले यांच्याकडे पूर्व तर दिगंबर ठाकरे यांच्याकडे पश्‍चिम मतदार संघ सोपवण्यात आला.

सहसंपर्क प्रमुख पदी सतीश हरडे यांची नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे उत्तर तसेच दक्षिण-पश्‍चिम मतदार संघ सोपवण्यात आला असून शेखर सावरबांधे यांच्याकडे पूर्व तसेच पश्‍चिम तर शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांच्याकडे मध्य व दक्षिण मतदार संघाची जवाबदारी देण्यात आली.

Latest बातम्या