डॉ.अक्ष् य भिसीकर यांचा होप रुग्णालयावर गंभीर आरोप: काढले लाखोंचे बिल!
नागपूर,ता. ३० सप्टेंबर: न्यू नंदनवर निवासी डॉ.अक्ष् य भिसीकर यांच्या जन्मदात्रीला २२ सप्टेंबर रोजी सर्दी व खोकल्याचा त्रास सुरु झाला. कोविडची सौम्य लक्ष् णे आढळून आली,त्या ६४ वर्षाच्या होत्या.त्यांना व्हायरल न्यूमोनियाचे निदान झाले.यामुळे त्यांना होप रुग्णालयात डॉ.अक्षय यांनी भरती केले.याच रुग्णालयात त्यांचा मित्र डॉ.रोशन कोडमलवार असल्याने अक्षय यांना आपल्या आईकडे हा डॉ.मित्र चांगल्याने लक्ष् देईल अशी त्यामागील भावना होती.आईच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती मात्र २८ सप्टेंबर रोजी रात्री होप रुग्णालयातील एका तरुण असणा-या अप्रशिक्षित परिचारिकेने आईला डेरिफायलीन हे इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने लावले,त्यामुळे आईचा जीव गेला असा गंभीर आरोप डॉ.अक्षय यांनी प्रचार माध्यमांजवळ लावला!
ते स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांनी डेरिफायलिन इंजेक्शन देण्याची सूचना केली होती.हे इंजेक्शन कश्या पद्धतीने द्यायला हवे याची देखील शास्त्रशुद्ध माहिती आहे. मी इंजेक्शन आणून दिले व थोड्या वेळासाठी बाहेर पडलो.याच वेळी परिचारिकेने आईला हे इंजेक्शन पूर्णपणे पुश करुन दिले! डेरिफायलिन हे इंजेक्शन हे हळूहळू दिले जाते.हे इंजेक्शन एकदम दिल्यास याचा सरळ प्रभाव हा ह्दयावर होतो.इंजेक्शन लावल्यानंतर मी जेव्हा आईजवळ पोहोचलो तेव्हा तिने तिच्या छातीत खूप जळण होत असल्याचे सांगितले. मी तिच्या ह्दयाचे ठोके तपासले तेव्हा ते १२० ते १५० पर्यंत पाेहोचले होते व अचानक ते २०० पर्यंत पाहोचलेत! मी त्या परचारिकेला विचारले की इंजेकश्न कश्या पद्धतीने दिले तर तिने कबूल केले तिने पुश करुन दिले. यामुळेच माझ्या आईला ‘कार्डियक अरेस्ट’ झाले व तिचा मृत्यू झाला…..! होप हॉस्पीटलने आपल्या रुग्णालयात विना प्रशिक्ष् णाचा स्टाफ ठेवला असल्याचा गंभीर आरोप डॉ.अक्षय यांनी केला आहे.
त्या परिचारिकेची ट्रेनिंग अद्याप पूर्णच व्हायची असल्याचा आरोप डॉ.अक्षय यांनी केला.मंगळवारी अक्षय यांच्या आईचा जीव गेला!
डॉ. अक्षय हे तीन भाऊ-बहीण असून बहीण ही विवाहित आहे. घरी आता फक्त भाऊ आणि वडील आहेत.जिवंत जन्मदात्रीला होपमध्ये भरती केले तेव्हा तिचा मृतदेहच घेऊन जावा लागेल,अशी कल्पना देखील केली नव्हती,अशी खंत त्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली.मी मेडिकल रुग्णालयात इंटर्नशिप म्हणून काम केले आहे,त्यामुळे मला उपचार,औषधी इ.विषयी सखोल माहिती असल्याचा ते सांगतात.
आयसीयूत मॉनिटरही नाही मात्र बिल काढले लाखांचे!
डॉ.अक्षय यांनी सांगितले की होप हॉस्पीटलमध्ये साधे मॉनिटरसुद्धा नाही,आयसीयूमध्ये रुग्णांच्या ह्दयाशी संबधित हाचचाली अचूक टिपण्यास हे यंत्र अत्यावश्यक आहे मात्र हे अत्यावश्यक यंत्रच आसीयुमध्ये नदारक होते! रुग्णाला तपासण्यासाठी साधा स्टेटेस्कोप देखील या रुग्णालयात मला वेळेवर सापडला नाही. आईची ह्दयगती मोजण्यासाठी मी घरुन आणलेला ऑक्सीमीटर वापरला मात्र तरीही आईच्या मृत्यूनंतर जवळपास साढे चार लाखांचे बिल होप हॉस्पीटलने काढले. माझ्या आईचे शव देण्यास होप हॉस्पीटलने नकार दिला होता.पूर्ण पैसे भरल्याशिवाय मृतदेह मिळणार नसल्याचे या हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाने सांगितले. मी आधीच ५० हजार रुपये अनामत रक्कम भरली आहे. आणखी लाखो रुपये माझ्यासारखा सामान्य माणूस कूठून भरणार आहे?
होप रुग्णालयाने दावा फेटाळला-
मृतकाच्या नातेवाईकांनी केलेले आरोप हे पूर्णपणे निराधार असल्याचे होप हॉस्पीटलचे अधिक्ष् क डॉ.मुरली यांनी सांगितले. मृतकाचा मुलगा डॉ.अक्षय आमच्याकडे कामाला होता मात्र त्याचा रेकॉर्ड हा खराब होता. तो दारु पिऊन कर्तव्यावर यायचा त्याचा मित्र डॉ. रोशन कोलमडवार याला देखील आम्ही याच कारणावरुन कामावरुन काढले असल्याचे ते एका हिंदी दैनिकाच्या वार्ताहराजवळ म्हणाले.
वृत्तपत्रावर दावा ठोकणार-
एका हिंदी दैनिकाने डॉ. मुरली यांचा हा दावा आज दैनिकात प्रसिद्ध केला मात्र तो तद्दन खोटा असल्याचे डॉ.अक्षय यांनी सांगितले. मी कधीही होप रुग्णालयात कामावर नव्हतो. असे जर आहे तर माझा नोकरीचा रेकॉर्ड,कागदपत्रे,पगाराच्या स्लीप इ. त्यांनी सादर कराव्या. माझा मित्र हा तिथे कार्यरत होता,मी नव्हे तरी देखील नागपूरातील एका हिंदी दैनिकाने माझे मत न घेता किवा कोणत्याही
प्रकारची शहनिशा न करता खोटे वृत्त छापून माझी बदनामी केली,मला व माझ्या कुटुंबियांना एवढ्या दू:खाच्या काळात मन:स्ताप दिला. आम्ही आता मृतकाची विधी करावी की दैनिकाला खुलासे देत फिरावे?असा संताप त्यांनी व्यक्त केला. या दैनिकाने खुलासा किवा माफीनामा न छापल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे डॉ. अक्षय यांनी सांगितले.लवकरच या विषयावर प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेणार असल्याचे ते म्हणाले.
रुग्णांना लृटणा-या हॉस्पीटलचे स्टिंग कधी?
करोनामुळे त्रस्त असणा-या नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करणे,शासकीय निर्देशानुसार तपासणीचे पैसे न घेता अतिरिक्त शुल्क उकळणे,असले प्रकार करणारे खासगी रुग्णालय विरोधात आकस्मिक भेटीची गुप्त मोहिम राबविली जाईल,तसेच खासगी करोना तपासणी लॅब,खासगी प्लाझ्मा लॅबवरही करडी नजर ठेवली जाईल असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता.मात्र अद्याप तरी नागपूरकर सर्वसामान्य जनतेला अश्या स्टिंगची आणि प्रभावी कारवाईचा कोणताही दिलासा मिळाला नसल्याचा संताप देखील यावेळी रुग्णालयाबाहेर व्यक्त केला जात होता.
नागरिकांच्या तक्रारींसाठी पोलिस विभागाचा टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हॉट्स ॲप क्रमांक ९८२३३००१०० येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. या क्रमांकावर मृतकाचे यजमान किशोर गजानन भिसीकर यांनी संपर्क साधला असता एका महिलेने फोन उचलला. किशोर गजानन भिसीकर यांनी होप हॉस्पीटलने पूर्ण पैसे भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिल्याने हॉस्पीटल विरोधात तक्रार देण्यास पाचपावली पोलीस ठाण्यात गेलो असता तेथील पोलीस ठाणेदार किशोर नगरारे यांनी हॉस्पीटल विरोधात तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याची माहिती दिली. आम्ही सुशिक्ष्ति असताना आमच्यासोबत पोलिस ठाण्यात असा व्यवहार होत असेल तर गोरगरीबांचे काय होत असेल?असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी माध्यमांमध्ये आमची व्यथा व्हायरल झाल्यानेच मृतदेह, पैसे न भरता कुटुंबियांना सोपविण्यात आला,मात्र न्यायाची लढाई आमची अद्याप बाकी आहे,गृहमंत्र्यांनी त्यांच्या विभागातील पोलीसकर्मींना कोविड रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी अर्ध्या रात्रीही नोंदवण्याचे आदेश द्यावे,अशी आशा त्यांनी त्या महिलेकडे व्यक्त केले.या महिलेने त्यांची तक्रार गृहमंत्र्यांच्या कानावर घालते असे आश्वासन दिले,भिसीकर कुटुंबिय हे आता गृहमंत्र्यांकडून मिळणा-या न्यायाच्या प्रतिक्ष्ेत आहेत.
(किशोर गजानन भिसीकर यांचा फोन क्रमांक- ९३७०३५४०३६)
(व्हिडीयो सौजन्य: सुदर्शन बागडे)

आमचे चॅनल subscribe करा