Homeनागपूर न्यूजमनपाची आर्थिक परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटींचे विशेष अनुदान मनपाला द्यावे

मनपाची आर्थिक परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटींचे विशेष अनुदान मनपाला द्यावे


पिंटू झलके यांची मागणी

नागपूर,ता.२५ सप्टेंब : या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात सुरु असल्याने देशाची,राज्याची तसेच उपराजधानी नागपूरच्या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.मनपाच्या मुख्य उत्पन्नाचे स्त्रोतच आटल्याने या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर मनपाला ५०० कोटींचे विशेष अनुदान देऊन वित्तीय मदत करावी ,अशी मागणी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष् विजय(पिंटू)झलके यांनी केली.

मनपाचे उत्पन्नाचे स्त्रोत ज्यात मालमत्ता कर,पाण्याचे बिल,इतर मनोरंजन कर इत्यादी आहेत मात्र कोविडमुळे सर्वच उत्पन्नाचे स्त्रोत हे कमी झाले त्यामुळे यावर्षी शहराच्या आर्थिक उत्पन्नात गंभीर तूट निर्माण झाली आहे, याकरिता मुख्यमंत्री यांनी उपराजधानीच्या शहराकडे विशेष लक्ष् देण्याची गरज आहे. नागपूरात अनेक विकासाची कामे करायची आहेत,या शहरात आरोग्याच्या दृष्टिने नागरिकांसाठी अत्याधूनिक सेवा पुरविण्याच्या दृष्टिेने ५०० कोटी रुपयांची अतिरिक्त वित्तीय मदत,विशेष अनुदानाच्या रुपात नागपूर मनपाला दय्ावी,अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी नागपूर शहराच्या विकासात मोलाचं योगदान द्यावं,अश्‍या आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे व्हिडीयोच्या माध्यमातून पिंटू झलके यांनी सांगितले. मला खात्री आहे मुख्यमंत्री हे नागपूर शहराकडे विशेष लक्ष् देतील व ही ५०० कोटी रुपयांची विशेष अनुदानाची रक्कम नागपूर शहराला लवकरात लवकर देतील,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Latest बातम्या