
डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती, विधान परिषद या पदावर नुकतीच पुनर्नियुक्ती झाली तसेच दि.१२ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने पुण्यातील पत्रकारांच्या बरोबर एक वेबिनार घेण्यात आला. त्या वेबिनार मध्ये बोलताना त्यांनी उपसभापती पद हे मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे सांगितले . या पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्की करेन असे सर्वाना आश्वासित केले.
या वेबिनार विविध दैनिकांचे संपादक सहभागी झाले होते.यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यामध्ये एक विशेष व्यासपीठ तयार करावे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने प्रयत्न करावा, दीड लाखांच्या आतील देयके देखील ही आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे विशेष पथकामार्फत तपासली जात नाहीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होते अशा प्रकारची तक्रार झाल्या.
पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य जवळच्या जिल्हयातील सारख्या स्वरुपातील प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने पुण्यामध्ये विधान भवनचे एक कार्यालय असावे. त्यामुळे भारतीय लोकशाहीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना विधान भवनाच्या कामकाजा संदर्भात अभ्यास व कामांचा पाठपुरावा सोपा होईल अशी चर्चा झाली.
हक्कभंग या आयुधाचा वापर योग्य प्रकारे व प्रभावीपणे कसा करता येईल, लॉक डाउनच्या कालावधीमध्ये अनेकांचे रोजगार गेले व अनेकांना विज बिल मोठ्या प्रमाणे वाढून आले आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) देण्यात येणार असल्याबाबत बातम्या येत आहेत. विद्यार्थ्यांना ह्या परिक्षेबाबत कोणतेच ज्ञान नाही अशा प्रकारच्या प्रश्नांवर उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी लक्ष घालावे अशा अपेक्षा पत्रकारांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या प्रश्नांवर उत्तर देत असताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या प्रश्नासंदर्भात विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा