Homeनागपूर न्यूजधक्कादायक!दूकानदारांची कोविड चाचणी करु नये मनपाचे आदेश!

धक्कादायक!दूकानदारांची कोविड चाचणी करु नये मनपाचे आदेश!

डॉ.सवाई,डॉ.गंटावार यांचा चमत्कारिक कारभार: मनपाच्या युपीएचसी करोना चाचणी केंद्रासमोर लागले नाटीस बोर्ड

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१९ ऑगस्ट: एकीकडे आयुक्त तुकाराम मंुढे यांच्या आदेशाविरोधात शहरातील समस्त व्यापारी वर्गाने आज आंदोलन पुकारले असून १८ ता.पर्यत शहरातील समस्त दूकानदारांनी त्यांच्या कर्मचा-यांसह, कोविडची चाचणी करुन अहवाल झोनच्या सहा.आयुक्तांकडे सादर करावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा आदेश रद्द करण्यासाठी हे आंदोलन पार पडले, मात्र दूसरीकडे मनपाचेच आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.योगेंद्र सवाई तसेच बहूचर्चित सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांनी एका आदेशान्वये अश्‍या केंद्रांवर व्यापारी किवा दूकानदारांची करोना चाचणी करण्यात येऊ नये असे मौखिक आदेश दिल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. युपीएचसी चाचणी केंद्रासमाेरील नोटीसवर मात्र ’दूकानदारांनी गर्दी’करुन नये,अशी‘ झाकमझाक’ केल्याचे शब्द झळकतात आहेत!

 

[मेहंदीबाग युपीएचसी केंद्रासमाेर लावलेला नोटीस बोर्ड]

करोना चाचणीकरीता शहरातील फक्त दूकानदारच किवा त्यांचे कर्मचारीच गर्दी करतात का?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.एकप्रकारे दूकानदारांनी मुंढेंच्या आदेशाचे पालन करण्याकरिता सरकारी लॅबमध्ये चाचणी न करता खासगी लॅबला पैसे देऊन चाचणी करावी,असाच उद्देश्‍य डॉ.सवाई व डॉ.गंटावार यांच्या मौखिक आदेशावरुन ध्वनित होत असल्याच्या संशय ‘सत्ताधीश’जवळ अनेकांनी व्यक्त केला.

खासगी लॅबकडून मिळणार ‘चंदा!’

असा तुघलकी आदेश नोटीस बोर्डावर लावून,दूकानदार व त्यांच्या कर्मचा-यांना खासगी लॅबमध्ये करोना चाचणी करण्यास हतबल करणा-या आदेशामागे दडलंय तरी काय?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार डॉ.गंटावार यांनी त्यांच्या माहितीतल्या दोन खासगी लॅब संचालकाशी याबाबत संवाद साधला. मात्र ते स्वत: मधूमेही असल्यामुळे त्यांनी अश्‍या स्वरुपाच्या करोना चाचण्या त्यांच्या पॅथोलॉजी लॅबमध्ये करण्यास नकार दिला.यावर डॉ.गंटावार यांनी त्यांना चक्क धमकावले व मी ‘फेक रुग्ण’पाठवून तपासून घेईल,खरंच तुमच्या लॅबमध्ये करोना चाचणी होत आहे की नाही?असा दम दिल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरात लाखो दूकानदार व लाखो कर्मचारी आहेत. या सर्वांना मनपाच्या किवा शासकीय लॅबमध्ये करोना चाचणी करता येणार नसल्याचे ‘बंधन’ घालून शहरातील काही खासगी लॅबमधूनच चाचणीचा अहवाल घ्यावा लागेल,असा ‘हूकूम‘पारित करणे म्हणजे कोट्यावधींच्या कमाईतून स्वत:च्या ‘चंद्याची’व्यवस्था करणे होय,अश्‍या शब्दात कॉटन मार्केट मधील एका दूकानदाराने संताप व्यक्त केला.त्यांना मेयो किवा मेडीकलमधील करोना चाचणीचा अहवाल चालणार नसल्याचे झोन अधिका-याकडून सांगण्यात आले आहे!

एका चाचणीमागे आजच्या तारखेत खासगी लॅब हे अडीच हजार रुपये उकळतात आहेत. दररोज २०० जरी चाचण्या होत असतील तर एकाच दिवसात अडीच लाखांच्या वर कमाई खासगी लॅबवाले करीत आहेत. यात मरण मात्र शहरातील सामान्य नागरिकांचे होत आहे.आता तर आयुक्तांच्या आदेशानंतर लाखो दूकानदार देखील भरडले जाणार आहेत.

विशेष म्हणजे मनपाच्या युपएचसीसाठी असा आदेश काढणारे मनपातील ‘महाभाग’हे श्रीमान भातकूलकर हे आहेत.जे अद्यापही स्टोर इंजार्च आहेत.एकेकाळी हे महापौर संदीप जोशी व माजी महापौर प्रवीण दटके यांच्या ‘प्रिय’गटातील अधिकारी होते हे विशेष!आता मात्र डॉ.गंटावार यांच्या ‘मार्गदर्शनाखाली‘आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिका-यांना निर्णय पोहोचविण्याचे कार्य चोखपणे बजावित आहेत.‘व्यापारी किवा दूकानदारांनी केंद्रावर गर्दी करु नये’याचा अर्थ त्यांची चाचणी करण्यात येऊ नये,असे मौखिक आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

उद्या गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.मनपाच्या ऑन लाईन होणा-या सर्वसाधारण सभेत व्यापा-यांवर लादण्यात आलेले आयुक्तांचे विविध तुघलकी आदेश यावर जोरदार चर्चा घडण्याची शक्यता असून सभागृहात उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. अश्‍यावेळी मनपाच्या युपीएचसी केंद्र जिथे करोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत,व्यापारी किवा दूकानदारांनी गर्दी करु नये….असा आदेश देण्यामागे काय हेतू आहे?हे देखील सभागृहात चर्चिले जावे व आधीच उधवस्त झालेल्या दूकानदार व व्यापारी वर्गाला महापौर व जनप्रतिनिधींनी न्याय देण्याची अपेक्ष्ा अनेक दूकानदारांनी व्यक्त केली.

Latest बातम्या