Homeनागपूर न्यूजतेरी भी चूप...मेरी भी चूप: मुंढेंची फडणवीसांच्या बैठकीत उपस्थितीचे कवित्व

तेरी भी चूप…मेरी भी चूप: मुंढेंची फडणवीसांच्या बैठकीत उपस्थितीचे कवित्व

महापौरांच्या बैठकींना मात्र मुंढे अनुपस्थित:ज्येष्ठ भाजप नेत्यांनी धरले धारेवर

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १७ ऑगस्ट: महापौर संदीप जोशी यांनी शहरातील वाढत्या करोना संक्रमणाच्या संदर्भात एक नव्हे तर दोनवेळा मनपा मुख्यालयातील कोविड वॉर रूममध्ये शहरातील सर्व आमदार तसेच जनप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती मात्र महानगरपालिकेतील प्रशासनाचे प्रमुख, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हेच या दोन्ही बैठकींना अनुपस्थित राहीले!आज कोणतीही पूर्व सूचना नसताना माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव संदर्भात घेतलेल्या बैठकीत आयुक्तांची ‘गपगुमान‘उपस्थिती मात्र आज मनपात चर्चेचा विषय ठरली.

फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी संपूर्ण पाच वर्ष विराजमान होते,आताही राजकीय पटलावरील दृष्य कधीही बदलू शकते,अशीच चर्चा आहे त्यामुळे पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यास उगाच वैर नको,अशी भावना निर्माण झाल्याने मुंढे यांनी बैठकीत उपस्थिती दर्शवली,असे सांगण्यात येत आहे.

याशिवाय कोविड-१९ च्या संदर्भात एपॅडेमिक अधिका-यांचे प्रमुख या नात्याने फडणवीस यांनी करोनासंदर्भात हा आढावा घेतल्याने मुंढे यांच्यावर जबावदेही आणि बैठकीला उपस्थित राहण्याचे उत्तरदायित्व असल्याने ते या बैठकीला स्वत:मधला ’मी’बाजूला सारुन उपस्थित राहीले असल्याची देखील चर्चा मनपात आज रंगली होती.सचिव पातळीवर एपॅडेमिकबाबीवर फडणवीस यांची नेमणूक झाली आहे,ते जर मनावर घेतील किवा केंद्रिय मंत्री नितिन गडकरी हे जर मनावर घेतील तर…मुंढे यांचे आसन डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही,अशीही कुजबूज मनपाच्या कर्मचारी वर्गामध्येही ऐकू आली.

महापौर संदीप जोशी यांनी दोन वेळा बोलावलेल्या करोना संदर्भातील बैठकीला दांडी मारुन मुंढेंनी नागपूरकर जनतेला हाच संदेश दिला होता ‘मी म्हणजे मीच’मला इतरांच्या सल्ल्याची,मार्गदर्शनाची गरज नाही!’राज्यातील किवा अगदी दिल्लीतील आयएएस लॉबीप्रतिच मुंढे यांचे ‘छूपे’उत्तरदायित्व असावे म्हणूनच महापौरांची बैठक ते इतक्या ’लाईटली’ घेऊ शकतात किंबहूना घेतात,असे देखील एक मत आज ऐकू आले.आयएएस म्हणून त्यांना वेगळा परिपाक निर्माण करण्याचा म्हणूनच मोह होतो.सत्ताधा-यांच्या पाया धरण्यापेक्षा, समजूत घालण्यापेक्षा वरिष्ठ आयएएस लॉबीला खूश ठेवणे त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर असल्याची देखील दबक्या आवाजात चर्चा होती.

बैठकीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे मुंढेवर तोंडसूख:फडणवीसांनी घेतले सांभाळून
आजच्या काेविड संबधीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपमधील एका ज्येष्ठ नगरसेवकांनी चांगलीच आगपाखड केल्याची माहिती आहे. एका ज्येष्ठ नगरसेविकेनी तर मुंढे हे कसे आणि किती ‘संधीसाधू’आहेत,याचे विश्‍लेषणच मांडले. ’रेटून खोटे बोलणारे’असे बिरुदही त्यांनी मुंढेंना लावून टाकले.प्रत्येक बैठकीत ते शपथेवर खोटे बालू शकतात,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.मग ती बैठक फडणवीस यांची असो,महापौरांची असो, विभागीय आयुक्तांची असो किवा जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्तांची असो, कोणत्याही बैठकीत मुंढे यांचा राज्यातील सत्ताबळाच्या जोरावर ’मीपणा’ काही सूटत नाही!

मुंढे यांच्यामधील ‘उपजत’ सुप्रिम भावना आजच्या बैठकीत देखील बळावली होती. मात्र भाजपच्या सत्ताधा-यांनी त्यांच्या विषयी खडे बोल सुनावले. फडणवीस मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत ‘मंद मंद’मुस्कारते रहे…!एक शब्द देखील ते मुंढेंना बोलेले नाही किवा आरोप-प्रत्यारोपाबाबत विचारले देखील नाही…! मुंढे यांची सत्ताधा-यांसोबत वागण्याची पद्धत ही किती व कशी दूर्देवी आहे,याचा पाढाच बैठकीत वाचला गेला. मी जे करतो,तेच योग्य,इतरांच्या सल्ल्याची गरज नाही,असाच अर्हिभाव मुंढेंचा कसा असतो,याचे सविस्तर वर्णन त्या ज्येष्ठ नेत्याने आजच्या बैठकीत केले.

तेरी भी चूप..मेरी भी चूप….!
मुंढे यांच्या एकंदरित कार्यशैलीवर होणारे प्रहार फडणवीस यांनी शांतपणे एेकून घेतले. उलट त्यांनी मुंढे यांची अनेकदा पाठराखणच केली. मोठे नेत्यांचे हे लक्ष् णच आहे की ते विरोधकांप्रतिही मोठ्या मनाने वागत असतात,असे एका नगरसेवकाचे मत होते.मात्र…गेल्या १३ वर्षांच्या भाजप सत्ताधा-यांचा एकंदरित कारभार याची ‘खडा न खडा’माहिती मुंढे यांनी पुराव्यांनिशी गोळा करुन ठेवली असल्यानेच ते एवढे बिंदास असतात,अशी देखील चर्चा मनपात दबक्या आवाजात सुरु होती. हा सर्व खेळ ’तेरी भी चूप और मेरी भी चूप’चा आहे,असे मत एका वरिष्ठ मनपा अधिका-याने खाजगीत व्यक्त केले.

Latest बातम्या