
नागपूर,ता.१० ऑगस्ट: एकाच ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या मनपातील अनेक अभियंत्यांच्या जंबो बदल्या सोमवारी आयुक्त् तुकाराम मुंढे यांनी केल्या. या बदल्यांमुळे मनपात एकच खळबळ उडाली आहे. या बदल्यांमध्ये १२ उपअभियंत्यांचा समावेश असून, यातील काहींकडे कार्यकारी अभियंत्यांचा अतिरीक्त प्रभारही होता. तो काढून टाकत दुसऱ्या अभियंत्यांकडे देण्यात आला.
उपअभियंता रवींद्र बुधाडे यांच्याकडील झोन क्र. ६ चा कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार काढून झोन क्र. ५ चे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढूलकर यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले. उपअभियंता एस.आर.गजभिये याच्याकडील कार्यकारी अभियंता पदाचा पदभार काढून तो झोन क्र.४ चे उपअभियंता यु.व्ही. धनविजय यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. या बदल्यांमध्ये २१ कनिष्ठ अभियंत्यांचीही अंतर्गत विभागनिहाय बदल्या करण्यात आल्या. अनेक वर्ष झोन व एकाच विभागात कार्यरत असलेल्या अनेकांना वेगळया ठिकाणी हलविण्यात आले आहे. यासोबतच ३३ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. मनपात एवढया मोठया प्रमाणात अभियंत्यांच्या प्रथमच बदल्या करण्यात आल्या आहेत.

आमचे चॅनल subscribe करा