Homeनागपूर न्यूज...आणि मुंढे म्हणाले निगेटीव्ह बातम्या करा माझे फॅन्स वाढतात!

…आणि मुंढे म्हणाले निगेटीव्ह बातम्या करा माझे फॅन्स वाढतात!

नागपूर,ता. ९ ऑगस्ट: लोकप्रिय सनदी अधिकारी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतेच एका माध्यम प्रतिनिधीजवळ आपली भावना व्यक्त करताना ’तुम्ही पॉझिटीव्हपेक्ष्ा माझी निगेटीव्ह बातमी करा यामुळे माझे फॅन्स वाढतात!’असे म्हटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहातील एका यू-ट्यूब पोर्टलचा चॅनल हेड याला उठसूट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे बाईट्स घेण्यात अत्यंतिक रस आहे. अगदी करोनाच्या सुरवातीच्या काळापासून हा चॅनल हेड मुंढे यांच्या दारातच ठाण मांडून असतो. मुंढे यांचा खासमखास स्वीय सचिव प्रमोद हिवसे यांच्याशी देखील या चॅनल हेडने चांगली मैत्री जमवली. करोनासंबधेची कोणताही प्रश्‍न तयार करायचा व लगेच मुंढे यांच्यासमोर बाईटसाठी मोबाईल धरायचा.ती बाईट लगेच पोर्टलचा लोगो लावून यू-ट्यूबवर व्हायरल करायचा,हीच ‘दर्जेदार पत्रकारिता’ सातत्याने सुरु आहे.
मुंढे यांनी देखील माध्यमकर्मी म्हणून त्याला बरेच सहकार्य केले. वेळोवेळी या चॅनेल हेडला बाईट्स दिल्या.मात्र नुकतेच एका चॅनलचा प्रतिनिधी यांनी मुंढे यांची बाई,ट शहरातील क्लब कधी सुर करणार आहात यावर घेण्यासाठी गेले असता, त्या यू-ट्यूब पोर्टलच्या चॅनल हेडवरच मुंढे यांनी या चॅनल हेडकडे चांगलेच तोंडसुख घेतले व त्याला योग्य प्रश्‍नही विचारता येत नसल्याचे हसून सांगितले!

तसेच‘ मला माझ्या विषयी निगेटीव्ह बातम्या आवडतात यामुळे माझे फॅन्स वाढत असल्याचे’ शब्दही उच्चारले.आजपर्यंत नाशिक,सोलापूर,मुंबई येथे हेच घडले. लोकांना माझ्याविषयी निगेटीव्ह बोललेले आवडत नाही आणि सोशल मिडीयावर तेच रिएक्ट होत असल्याचे उत्साहात सांगितले! अशी माहिती ’सत्ताधीश’ला मिळाली.

करोनासारख्या भीषण महामारीच्या काळात प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांना कोणत्या विषयाचे गांर्भीय अधिक वाटत आहे,हे यावरुन ठलकपणे अधोरेखित होतय.दूसरीकडे मुंढे नागपूरात रुजू झाल्यापासून मिडीयाने विशेषत: त्या यू-ट्यूब पोर्टलच्या चॅनल हेडने मुंढे यांचे शेकडो व्हिडीयोज यू-ट्यूबवर टाकून त्यांना पराकोटीची प्रसिद्धी देण्यात भर घातली मात्र मुंढे यांनी शेवटी त्यालाच योग्य प्रश्‍न विचारता येत नसल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले!

यावरुन तरी मुंढे यांच्यासारख्या सनदी अधिकारी यांच्या किती मागे धावावे?याचे भान नागपूरातील मिडीयाकर्मींनी ठेवल्यास,असा पानउतारा होण्यापासून तरी ते वाचू शकतील.

Latest बातम्या