
संपूर्ण परिसर प्रतिबंधित करण्याची दिली धमकी!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर, ता. ८ ऑगस्ट: संपूर्ण शहरात करोनाचे रुग्ण वाढले असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र याचे किती गांर्भीर्य आहे याचे उदाहरण पहायचे असल्यास बजाज नगर येथील भागात राहणा-या एका तरुणीचा व्हॉटस ॲप चॅट बघितल्यास याची प्रचिती येते. सौम्य लक्ष् णे आढळल्याने या तरुणीने खासगी लॅबमध्ये करोनाची चाचणी करुन घेतली,त्यात पॉझिटीव्ह आल्याने ती शासकीय रुग्णालयात पाच दिवस उपचार घेऊन घरी आली,मात्र पॉझिटीव्ह आल्याचे कळताच, लक्ष्मीनगर झोनला तिने पॉझिटीव्ह आल्याची माहिती कळवली आणि….येथूनच तिच्या मनस्तापाला सुरवात झाली,या झोनचा सफाई कर्मचारी अमोल शंभरकर याने तिच्या व्हाॅटस ॲपवर गूड मार्निंग,गूड नाईट,तब्येत कशी आहे इ. अवंातर मॅसेजेस पाठविण्यास सुरुवात केली!
सुरवातीला या तरुणीने त्याच्या मॅसेजेसकडे दूर्लक्ष् केले मात्र त्यानंतर त्याने चक्क धमक्या देणे सुरु केले. आताच्या आता करोनाची रिपोर्ट व्हाॅटस ॲप वर पाठवा, मला ती माहिती अपडेट करायची आहे, सहकार्य नाही केले तर संपूर्ण परिसरच सील करुन टाकेल…..!
या तरुणीकडे तिचाच निगेटीव्ह अहवाल आला नसताना ती तो अहवाल या सफाई कर्मचा-याला कशी पाठवू शकली असते,मूळात ती स्वत: तिच्या उपचारामध्ये व्यस्त असताना,या सफाई कर्मचा-याने तिला उगाचच दिलेला मनस्ताप हा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एकंदरित ‘शिस्तप्रिय’कारभारावरच शंका उपस्थित करणारा आहे. मूळात मनपाचा सफाई कर्मचा-याकडे,सेनिटाईस करणा-या कर्मचा-याकडे झोनमधील बाधितांचे रेकॉड ठेवण्याची देखील मुंढेंनी त्यांच्यावर सोपवली आहे का?असा प्रश्न उपस्थित होतो.
या तरुणीचे आई-वडील हे वृद्ध आहेत, तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर तिच्या वडीलांनीच लक्ष्मी नगर झोन कार्यालयात माहिती देऊन त्यांचा फ्लॅट सेनिटाईझ करण्यास कळवले असता हा सफाई कामगार त्यांच्या फ्लॅटमध्ये आला होता. मात्र यानंतर त्याने तरुणीला मोबाईलवर वेगळाच त्रास देण्यास सुरवात केली. दिवसांतून १० वेळा त्याने फोन करुन या तरुणीला अक्ष् र श: हैरान केले.तरुणीने दूर्लक्ष् केल्याने ’कॉपरेट करा नाही तर संपूर्ण परिसर २८ दिवस सील करील!’अशी धमकी दिली. पुन्हा हाच प्रश्न निर्माण होतो मुंढे यांनी सफाई कर्मचा-यांनाच परिसर सील करण्याचे अधिकारही बहाल केलेत का?
विशेष म्हणजे घरात स्वॅबचे सॅम्पल घेण्यास खासगी लॅबमधील जी मुलगी आली होती,तिला तरुणीची आई पैसे देत असताना हा सफाई कर्मचारी तेथेच उपस्थित राहून सातत्याने त्या पैशांकडेच बघत होता!या तरुणीला मनपाच्या सफाई कर्मचारीच्या या वर्तवणूकीतून भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. शेवटी मनपातील एका नातेवाईक अधिका-याचे नाव या तरुणीने त्या सफाई कर्मचा-याला सांगितले की या पुढे मला जास्त त्रास दिल्यास मी त्या अधिका-यांना तुझे नाव सांगेल!
एकीकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे डॉ.प्रवीण गंटावार याच्यासारख्या भ्रष्ट आणि गुन्हेगार आरोग्य अधिका-याला महापौरांच्या आदेशानंतर देखील निलंबित न करता त्याच्या पाठीशी उभे राहून त्याच्या पुर्नवसनाचे प्रयत्न करीत आहे,हे नागपूरकर जनता पाहतच आहे,परिणामी आरोग्य विभागातील हे कर्मचारी कोविड-१९ या महामारीचा आपापल्यापरिने कश्या प्रकारे फायदा घेत आहे व आपल्या सर्वोच्च अधिका-याचा आदर्श, आपल्या वर्तवणूकीतून सिद्ध करीत आहे,याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. आपला बॉसच जर भ्रष्टाचारी व गुुन्हेगा-यांना पाठीशी घालतोय तर आपले कोण काय बिघडवणार?असा संदेश आता आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांमध्ये डॉ.गंटावार प्रकरणामुळे गेला असल्याचे सांगितले जात आहे.
मागील सभागृहात भाजपचे आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांनी ’प्रशासनात एकच नव्हे तर अनेक मुंढे आहेत’असा झणझणीत आरोप केला होता, त्याची प्रचिती या अश्या घटनांवरुन सिद्ध होते. सध्या सरकार नावाची व्यवस्था या ॲपिडेमिक एक्टच्या नावाखाली हतबल करुन ठेवण्यात आली तर दूसरीकडे ज्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही एक घेणे-देणे नाही अश्या निगरगट्ट कातडीच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचा-यांवर जनतेच्या हाल-अपेष्ठा सोपवून देण्यात आल्याचे दूर्देवी चित्र उमटले आहे.
बजाज नगरमधील ही तरुणी उच्च विद्याभूषित आहे ती तिच्या परिने कोणत्याही समस्येचा सामना करु शकते मात्र हाच सफाई कर्मचारी गरीब वस्त्यांमध्ये सेनिटाईझच्या कामासाठी गेल्यास तेथील तरुणींवर कशा प्रकारे ’डोळा’ठेवित असावा?असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. परिणामी महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेऊन अमित शंभरकर नावाच्या या सफाई कर्मचा-याची तातडीने हकालपट्टी करावी,अशी मागणी या तरुणीने खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली आहे.

आमचे चॅनल subscribe करा