Homeनागपूर न्यूजमनपाने केले चौसष्ट सुरक्षा रक्ष् कांना निलंबित: प्रशांत पवार यांचा आंदोलनाचा इशारा

मनपाने केले चौसष्ट सुरक्षा रक्ष् कांना निलंबित: प्रशांत पवार यांचा आंदोलनाचा इशारा


‘जय जवान जय किसान’संघटनेने दिला आमरण उपोषणाचा इशारा

नागपूर,ता. ७ ऑगस्ट: महापालिका प्रशासनाने विलगीकरण केंद्रावर कार्यरत ६४ सुरक्षा रक्ष् कांना काढून टाकले असून त्यांना परत घेण्यात यावे अन्यथा मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी दिला.

मागणी मान्य न झाल्यास प्रशांत पवार यांनी या सुरक्षा रक्ष् कांच्या कुटुंबियांसह महापालिकेच्या आवारात आमरण उपोषणाचा इशारा दिला. महापालिकेत मागील ३० वर्षांपासून सुपर सिक्युरिटी, किशोर सिक्युरिटी व युनिटी सिक्युरिटी या कंपन्यांना २९० सुरक्षा रक्ष् क पुरवण्याचे काम दिले जात आहे. सुरक्षा रक्ष् कांच्या बँक खात्यांमध्ये नियमानुसार १४ हजार ८२४ रुपये जमा केले जातात. त्यानंतर त्यातील अर्धा पगार हा कपंनीच्या निरीक्ष् काच्यावतीने रोखीने परत घेतला जातो.

या संदर्भात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे १३ जुलै रोजी रितसर तक्रार संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र कारवाई करण्याऐवजी महापालिकेने १ ऑगस्टपासून या तिन्ही एजंसीमधील ६४ सुरक्षा रक्ष् कांना कामावरुन काढून टाकण्याचे अमानवीय कृत्य केले.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी अायुक्तांना भेटीची वेळ मागितली.त्यांनी उपायुक्त निर्भय जैन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पैसे परत घेणा-या एजंसीविरुद्ध काय कारवाई केली अशी विचारणा केली. मात्र त्यांनी निविदा प्रक्रिया दाखवून नवीन एजंसी नेमल्याचे सांगितले तसेच कारवाईबाबत मात्र कुठलेच उत्तर दिले नाही.ही निविदा प्रक्रिया वर्षभरापूर्वी राबविण्यात आली होती. त्यानुसार निर्णय घेतल्याचे जैन यांनी सांगितले.

जुन्याच एजंसींना वाचवण्यासाठी ६४ सुरक्षा रक्ष् कांना काढण्यात आले आणि नवीन एजंसी नेमण्यात आल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला. एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार करोना महामारीच्या काळात कोणालाही कामावरुन काढू नका असे आवाहन करत आहे दूसरीकडे खासगी कंपंन्या तर सोडा सरकारच्याच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गरिबांचा,गरजूंचा रोजगार हिरावून घेतला जात असल्याचे विदारक चित्र दिसून पडत आहे.एकीकडे त्यांना करोना योद्धा म्हणता व दूसरीकडे त्यांच्याच कुटुंबियांना देशाधडीला लावता?याबाबत बैठकीत प्रशांत पवार यांची प्रशासनासोबत या मुद्दावर चांगलीच खंडाजंगी झाली.

याप्रसंगी प्रशांत पवार यांनी मेट्रोसारखेच मनपा प्रशासनातील भ्रष्टाचार हा ‘जय जवान जय किसान’संघटना शोधून काढेल व जनतेसमोर उजागर करण्याचा इशारा दिला. बैठकीत अरुण वनकर ,कृष्णराव खंडाळे यांच्यासोबत दोन सुरक्षा रक्ष् क सहभागी झाले होते.

Latest बातम्या