Homeनागपूर न्यूजमहिला आयोगासमोर मुंढे यांची साक्ष्: आरोप निराधार असल्याचा उच्चार

महिला आयोगासमोर मुंढे यांची साक्ष्: आरोप निराधार असल्याचा उच्चार

नागपूर,ता. ७ ऑगस्ट: मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्युल सुनावणी पार पडली. या सुनावणीत नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप हे निराधार असल्याचे सांगितले तर पीडिताने नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड कंपनीच्या सचिव भानुप्रिया ठाकूर यांनी पुरावे असल्याचा दावा केला.

सूत्रानुसार नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयातून रेखा शर्मा यांनी मुंढे आणि ठाकूर यांची बाजू व्हर्च्युअली ऐकून घेतली. यावेळी आयुक्त मुंढे यांनी सांगितले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. तर ठाकूर यांनी सांगितले की, त्यांनी लावलेले आरोप खरे आहेत. त्याचे पुरावेही त्यांच्याजवळ आहेत.

महिला आयेग्याच्या अध्यक्षा ठाकूर यांनी पुरावे सादर करण्यास सांगितले.पुराव्यांची तपासणी केल्यानंतरच महिला आयोग आपला अंतिम निर्णय जाहीर करेल. महिला आयोगाने मुंढे यांच्यावर लागलेल्या आरोपांबाबत राज्य सरकारला अवगत केले आहे.

जून महिन्यात भानुप्रिया ठाकूर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे लिखित तक्रार केली होती. त्या तक्रारीत त्यांनी आयुक्त मुंढे यांच्यावर विविध आरोप केले होते. ठाकूर यांना मुंढे यांनी मातृत्व रजेपासून वंचित ठेवले.स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बैठकीच्या विषयपत्रिकेत मुंढे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकार बहाल करण्यात आल्याचा विषय समाविष्ट करण्यासाठी त्यांचा त्या गरोदर असताना

मानसिक छळवाद करण्यात आला.नागपूरपासून शंभर किलोमीटर दूरुन त्यांना आपल्या नवजात बालकाला सोडून यावे लागत होते मात्र त्यांंच्या हक्काची मार्तृत्व रजा मुंढे यांनी मंजूर केली नाही,त्यांना राजीनामा देण्यासाठी किवा मातृत्व रजेचे कोणतेही लाभ त्यांना मिळणार नाही या अटीवर नोकरी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला.विषय पत्रिकेत मुंढे यांच्या मुख्य कार्यकारी पदाचा विषय समाविष्ट करण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री फोन केला जात होता. मनपा अधिकारी तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचा-यांसमोर मुंढे हे वारंवार कक्ष्ात बोलावू अपमानित करीत होते. एवढेच नव्हे तर मुंढे यांच्या कक्षा समोर त्यांना त्यांची भेट घेण्यासाठी आपल्या नवजात तान्हूल्यासोबत साढे तीन तास बसवून ठेवण्यात आले होते.याशिवाय मुंढे यांनी ठाकूर यांना नैसर्गिक मातृत्व लाभापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप या आरोपपत्रात करण्यात आले आहेत.

या तक्रारीच्या आधारावर राष्ट्रीय महिला आयोगातर्फे जुलैच्या शेवटी आयुक्त मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती व व्हर्च्युल सुनावणीद्वारे आपले म्हणने सादर करण्यास सांगण्यात आले होते. भानुप्रिया ठाकूर यांनी स्मार्ट सिटीचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांना देखील तक्ररीची प्रत पाठविली होती.

Latest बातम्या