Homeराजकारणयुवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणा-या अल्पेश देशमुखवर कठोर करावाई करावी-अर्चना डेहनकर यांची मागणी

युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणा-या अल्पेश देशमुखवर कठोर करावाई करावी-अर्चना डेहनकर यांची मागणी

नागपूर,ता. ३ ऑगस्ट:  बडनेरा येथील माॅल मध्ये काम करून आपली व परिवाराची उपजिवीका करणा-या गरीब २४ वर्षीय युवतीला कोरोना विषाणूची भिती दाखवून तिच्या गुप्तांगातून स्वॅब टेस्ट घेण्याचे घृणित कृत्य करणारा अल्पेश देशमुख नामक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व ह्या घृणित व लज्जास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेले त्याचे सर्व वरिष्ठ अधिकार्यांवर कठोर कार्रवाई करण्यात यावी,अशी मागणी भारतीय जनता पक्ष्ाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव अर्चना डेहनकर यांनी निवेदनातून केली आहे.

ह्या राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळात एखाद्या युवती वा महिलांच्या स्वॅब टेस्ट साठी शासकीय रूग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असू नये, ही अत्यंत गंभीर व आश्चर्यकारक बाब असून ह्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारसाठी व सरकारातील आरोग्यमंत्री व अमरावती जिल्हा पालकमंत्र्यांसाठी अत्यंत शरमेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.

घडल्या प्रकाराकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक लक्ष घालून कठोरातील कठोर कार्रवाई प्रयोगशाळा तंत्रज्ञ अल्पेश देशमुख व त्याच्या जबाबदार वरिष्ठांवर करण्यात यावी, तसेच कोविड महामारीच्या समयी महिलांसाठी Standard Oprating Procedure असावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आले.

आपले हे निवेदन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस,आरोग्य मंत्री राजेश टोपे,महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव,अमरावती जिल्ह्याचे जिल्हाकधारी तसेच पोलीस अधीक्ष् क यांना सादर केले आहे.

 

 

 

Latest बातम्या