Homeनागपूर न्यूजमनपाचा डॉक्टर कि शहरातील खंडणीबाज?

मनपाचा डॉक्टर कि शहरातील खंडणीबाज?

फक्त प्रसृती रुग्णालय आणि सोनोग्राफी मशीनवरच प्रेम का?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२४ जुलै: डॉ.प्रवीण गंटावार हे नाव आता नागपूरकरांना चांगलेच आेळखीचे झाले आहे. धंतोली येथील त्यांच्या प्रशस्त ’कोलंबिया’ रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली अनेकांची जमीन,शेती,मालमत्ता हडप करणारा एक खंडणीबाज डॉक्टर म्हणून त्यांची प्रतिमा चांगलीच रंगली असून नुकतेच शहरातील एक गुन्हेगार साहील सय्यदसोबत त्यांची ’भागीदारी’यावर देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

अश्‍या या खंडणीबाज डॉ.गंटावार यांचा अलेक्सीस रुग्णालयातील एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला असून,या व्हिडीयोमध्ये अलेक्सीसच्या व्यवस्थापकांशी गुंड साहिल सय्यद तावातावाने बोलत असताना गंटावार हे शांतपणे बसले असल्याचे दिसून पडत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या एका जवाबदार पदावरील व्यक्तीची,एका नावाजलेल्या गुंडासोबत अलेक्सीसमधील व्यवस्थपकीय कक्ष्ा तील उपस्थितीचा हा व्हिडीयो बरंच गौडबंगाल इंगित करीत आहे.

मूळात डॉ.गंटावार यांना पी.सी.पी.एन.डी.टी हा कायदा विशेष प्रिय असल्याचे सांगितले जात आहे. २००७ साली गंटावार हे जेव्हा मनपाच्या आरोग्य विभागात रुजू झाले तेव्हा ते एका ’सेकण्ड हॅण्ड मारोती कार’मध्ये आले मनपा मुख्यालयात आले होते,अशी ’आठवण’मनपाचेच कर्मचारी सांगतात. शहरातील अनेक प्रसुती रुग्णालयांवर गंटावार यांनी ’विशेष नजर’ठेवली. एक आरोग्य अधिकारी असून इतर कोणत्याही बैठकीला ते उपस्थित राहत नव्हते मात्र पी.सी.पी.एन.डी.टी कायद्याच्या अंमलबजावणीचा विषय आला तर ते अावर्जून उपस्थित राहायचे.

शहरातील प्रसृती रुग्णालयातील सोनोग्राफीचे रेकॉर्ड तपासणे हे त्यांचे प्रिय कार्य. अश्‍या रुग्णालयांना कारवाईची धमकी देणे, पदवी निरस्त करणे,पैशांची व्यवस्था करण्यास भाग पाडणे इ.अनेक प्रताप त्यांनी गेल्या १३ वर्षात मनपात रुजू असताना केलेत. त्यांच्या नावावर शहरातील अनेक नामवंत,प्रतिष्ठित डॉक्टर्स अक्ष्रश: बोटे मोडतात. मात्र प्रतिष्ठेमुळे समोर येत नाही. मनपाच्या या ‘सरकारी’ नोकरीच्या भरवश्‍यावर या आपल्या ‘कार्याप्रति निष्ठावंत’ डॉक्टराने धंतोली सारख्या प्रशस्त भागात अत्याधूनिक रुग्णालय उभारले. अनेक ठिकाणी जमीनी घेतल्या. पाच लक्झरीयस कार त्यांच्या घराची शोभा वाढवत आहेत.शहरात मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या जमिनी,बँक बॅलेंस, लॉकरमधील कोट्यावधीचे दाग दागिने हे सगळे मनपातील शासकीय नोकरीतील ’इमानदारीचे फळ’असल्याचे आता मनपातील काही कर्मचारी ‘उघडपणे ’ सांगत अाहेत.

एकेकाळी सत्ताधारी पक्ष्ातील काही मोठ्या नेत्यांचेही डॉ.गंटावार हे ‘खास’राहीले आहेत.प्रामाणिक,शिस्तप्रिय,कर्तव्य कठोर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे आयुक्त पदी रुजू झाल्यावर गंटावार हे त्यांचेही ’खास’झाले आणि सत्ताधा-यांच्या डोळ्यातील किरकिरी बनलेत!सकाळी ८.३० वा. कारवाई करण्यास निघणारे डॉ.गंटावार हे कायम डॉ.मुकुंद खुजे यांच्यासोबत निघत असल्याची माहिती आहे.‘मलाईदार’पोस्टवर असणारे डॉ.खुजे हे अद्यापही ही खूर्ची सोडायला तयार नाहीत,असे खासगीत बोलले जात आहे.मनपात ते फॉमॉसिस्ट म्हणून लागलेत मात्र नंतर त्यांच्याकडे फूड इन्सपेक्टर हे पद देण्यात आले, मूळात हे कायदेशीर पदन नाही! गेल्या कित्येक वर्षांपासून ते हे अवैद्य पद ’भूषवित’ आहेत. रुग्णालयांच्या नोंदणींचे ‘महत्वपूर्ण व अर्थपूर्ण’काम असल्यानेच ते ही खूर्ची सोडण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. डॉ.गंटावार यांचे डॉ.खुजे हे ’खास’अधिकारी असल्याचे सांगितले जाते.

कारवाईसाठी जाताना गंटावार यांना नेहमीच डॉ.खुजे हे सोबत लागतात. बघता बघता डॉ.खुजे हे देखील ‘गर्भ श्रीमंतांच्या’यादीत आले असल्याची चर्चा आहे.हेच आहेत प्रामाणिक मुंढेंचे प्रामाणिक सिपाही!त्यांच्याकडे रुग्णालयांना फक्त नोंदणीसाठी कोरे अर्ज पाठविणे आणि ते जमा करुन घेणे एवढेच काम आहे.मात्र याच नोकरीत त्यांनी अनेक रुग्णालयांच्या अनेक अवैध कामांना वैद्य करण्याची ’किमया’कशी-कशी साधली याचा सुरस कथा मनपात चांगल्याच रंगतात.मूळात त्यांना रुग्णालयांना स्वत:भेटी देण्याचाही अधिकारी नसताना ते मात्र शहरातील नामवंत रुग्णालयांना पंतप्रधान मोदी हे जसे विदेशात भेटी देतात त्याप्रमाणे ’प्रतिष्ठापूर्वक’ भेटी ही देतात!

प्रामाणिक मुंढे यांच्या प्रशासनातील हे झारीतील शुक्राचार्य यांनी शहरातील अनेक रुग्णालयांना,प्रतिष्ठित डॉक्टर्सना वेठीस धरुन कोट्यावधींचे गौडबंगाल केले असल्याची चर्चा मुंढे यांच्या कानावर येऊन देखील त्यांच्या आरोग्य विभागातील हेच ’भ्रष्ट योद्धे’नागपूरकर जनतेच्या आरोग्याची काळजी गेल्या अनेक वर्षांपासून कसे वाहत आहेत?हे चित्र नागरिक बघतच आहेत.

साहील सय्यद हा सत्ताधा-यांचा रडारवर आला ते एका ऑडीयो क्लिपमुळे,यात डॉ.गंटावार यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे महापौर संदीप जोशी व भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांना ’हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षडयंत्र रचण्याचे तो एका पंटरला सांगत आहे.ही ऑडियो क्लिीप व्हायरल होताच,साहील सय्यदमागील ‘शनि साढेसाती’ जणू सुरु झाली. परिणाणी विरोधकांच्या टार्गेटवर असणारे गंटावार हे आणखी गोत्यात आले. गंटावार व साहिल सय्यदचे किती ’सौख्य’होते हे या व्हीडीयो क्लिपमधून स्पष्ट होत आहे ज्यात डॉ.गंटावार हे अलेक्सीसच्या व्यवस्थपकांशी ’साहिल सोबत तडजोड ’करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. या व्हिडीयोमध्ये सुरवातीचा आवाजही डॉ.गंटावारांचा आहे ज्यात साहील याने पाच-सहा वेळा अलेक्सीसविरोधात तक्रार केल्याचे ते सांगत आहेत. मूळात मुंढे यांच्या आर्शिवादााने डॉ.गंटावार हे सहायक वैद्यकीय अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतरच या सर्व तक्रारींचा पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे.

व्हीडीयोमध्ये साहिल सय्यद पांढरे शुभ्र वस्त्र धारण करुन अलेक्सीसच्या व्यवस्थपकांशी हुज्जत घालताना दिसत आहे.त्यांना नानाप्रकारे धमकावत आहे. एवढेच नव्हे तर पी.सी.पी.एन.डी.टी.कायदा काय आहे?हे त्यांनाच समजून घ्या म्हणून सांगत आहे!काहीही करुन,कसेही करुन अलेक्सीसच्या व्यवस्थापकांना आपल्या दडपणाखाली आणून आपले ‘ईप्सित’साध्य करुन घेण्याची केविलवाणी धडपड साहिल याची या व्हिडीयोमधून दिसून पडत आहे. दयाशंकर तिवारी यांनी आज पत्र परिषदेत सांगितल्याप्रमाणे ही सगळी धडपड अलेक्सीस रुग्णालयाच्या मागे असणा-या कोट्यावधीची जमिन हडपण्यासाठी होती!

मात्र येथे गंटावार आणि साहिल यांचा डाव उलटा पडला. अलेक्सीसचे व्यवस्थापक कोणत्याही प्रकारच्या धमकावणीला बधले नाहीत,शेवटी ७ जुलैला गंटावार याने आपल्या अधिकार पदाचा गैरवापर करुन अलेक्सीसमधील सर्व सोनोग्राफी मशीन व रेडीयोलॉजी मशीन सीलबंद केली!या विरोधात अलेक्सीसने केलेल्या तक्रारीचा तपास गुन्हे शाखाकडे सोपविण्यात आला आहे तर आजच न्यायलयाने अलेक्सीसवर करण्यात आलेल्या मनपाच्या कारवाईला गुंड साहीलसोबत डॉ.गंटावार यांनी ’मिलीभगत करुन ’हेतूपुरस्सर,स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन केलेली कारवाई’ घाेषित केली.

दयाशंकर तिवारी यांनी आजच्या पत्र परिषदेत आयुक्त तुकाराम मुंढे यांचे डोळे गंटावार बाबत न्यायालीयन दणक्यानंतरही नसेल उघडणार असतील,व ते गंटावार आताही निलंबित करणार नसतील तर ते आंधळे आणि बहीरे असल्याचा आरोप केला एवढेच नव्हे तर गंटावार यांच्या प्रत्येक दृष्कृत्यात व अपराधिक गुन्ह्याला मुंढे यांचा ‘आर्शिवादच’प्राप्त असल्याचा समजण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

(अलेक्सीसच्या व्यवसथापकांसोबत गंटावार व साहील याचा व्हायरल झालेला व्हिडीयो)

Latest बातम्या