

नागपूर,ता. २३ जुलै: नवनाथ दत्त्तात्रय कातकाडे या नायब तहसीलदारांनी आज बहूचर्चित साहील सैय्यद विरोधात पोलीस आयुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त,अजनी विभाग तसेच पोलीस निरीक्ष् क हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीत साहिल सैय्यद याने स्वत: तक्रार देऊन घडविलेला खोटा सापळा या प्रकरणात न्याय मिळवून देण्याकरीता ७० लाख रुपयांची मागणी केली नाही तर फसवण्याची भीती दाखवली असे नमूद केले आहे.
२० एप्रिल २०२० रोजी साहिल सैय्यद याने कातकाडे यांच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊन लाचलुचपत प्रतिबंध केंद्र नागपूर यांची दिशाभूल करुन पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अप.क्र ३१७८/२०१३ कलम ७,१३(१)(ड)सह १३(२)ला.प्र.का १९८८ यात माझ्या विरुद्ध सापळा घडवून आणला होता, असे नमूद केले आहे. साहिल सैय्यद याचे माझ्याशी त्यापूर्वी कोणतेही कार्यालयीन काम नव्हते,केवळ मैत्री होती. साहिल हा माझ्यासोबत विमानाने मुंबई येथे ता.८ एप्रिल २०१३ रोजी गेला होता.
ते तिकीट साक्ष्ी पुराव्यासाठी माझ्याकडे उपलब्ध आहे.त्यावेळी साहिल हा मला त्याच्यासोबत विधानभवनात दि. ९ एप्रिल २०१३ रोजी घेऊन गेला होता.आमची सोबतची पास देखील पुरावा म्हणून माझ्याकडे उपलब्ध आहे. साहिल याने माझ्या भावाच्या बदलीकरिता खर्चापोटी ५० हजार रु.घेतले होते आणि त्याने स्वत: त्याकरिता पत्र तयार करुन ते माझ्या भावाच्या नावाने मंत्रालयात दिले होते.त्याची प्रतसुद्धा माझ्याकडे पुरावा म्हणून उपलब्ध आहे.त्या काळात माझ्या भावाचे बदलीचे काम करीत असताना साहिल याने मला १० लाख रुपयांची मागणी केली.
साहिल याची माझ्याशी एवढीही मैत्री नव्हती आणि माझ्याकडे त्याला देण्यासाठी १० लाख रु.सुद्धा नव्हते. परिणामी ते मी त्याला दिले नाही. त्यानंतर साहिल याने माझ्या भावाच्या कामाकरिता ५० हजार पैकी ३० हजार खर्च झाले,२० हजार रुपये परत करतो असे सांगून माझ्याकडे घरी येतो असे म्हटले. तेव्हा मी त्यास २० तारखेला नागपूरला कोर्ट केस आणि मुलाच्या वाढदिवसाकरीता राहील अशी माहिती दिली तेव्हा भेटू असे सांगितले.तेव्हा त्याने माझ्या मुलाकरिता वाढदिवसाची भेट म्हणून मोबाईल घेऊन येतो असे सांगितले.मैत्री असल्याने मी शंका घेण्याचे काहीच कारण नव्हते.
दि.२० एप्रिल २०१३ रोजी साहिल सैय्यद याने मला माझ्या घराच्या जवळ अर्धा किलोमीटर दूरुन फोन केला कि माझे घर त्याला सापडत नाही,मी त्याला घ्यायला यावे अशी विनंती केली. ती त्याला येतो असे म्हटले आणि माझ्या स्कुटीने गेलो तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याच्या व्यक्तिरिक्त कोणीही नव्हते,त्याने फालतूची बडबड करुन मला माझे पैसे आणि मोबाईल दिला. मी त्याच्या कारमधून खाली उतरलो तेव्हा मला साध्या वेषातील पोलीसांनी पकडले. मी साहिलला १० लाख रुपये दिले नाही याचा राग धरुन साहिल याने मला फसविले अशी तक्रार यात नमूद करण्यात आली अाहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मात्र या कोणत्याही बाबी माझ्या विरोधातील दाखल दोषारोप पत्रात नमूद केल्या नाहीत,असा आरोप कातकडे यांनी तक्रारीत केला.
साहिल सैय्यद याने आम्ही लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूर येथे आलो असता माझ्या समाेरच अपर पोलीस अधिक्ष् क संजय पुरंदरे यांनी साहील याला मिठी मारली आणि त्यांच्यात मैत्रीचे संभाषण झाले. संजय पुरंदरे यांनी मला एकेरीत बोलून माझ्याशी गैरवर्तवणूक केली. मी अधिक्ष् क निशीत मिश्र यांची भेट करुन देण्यास विनंती केली परंतु संजय पुरंदरे यांनी मला त्यांना भेटू दिले नाही. मी पोलीसांच्या ताब्यात असताना मला वैद्यकीय तपासणीकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता साहिल व त्याच्या २५ ते ३० साथीदारांनी हातबुक्कीने मला मारहाण केली. याची तक्रार मी अजनी पोलीस ठाणे,सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी,पोलीस उपायुक्त परीमंडळ क्र.४ ,पोलीस आयुक्त कार्यालय आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूर येथे दिली मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
मी जामिनावर बाहेर आलो असता नंतर दाखल झालेल्या दोषारोप पत्रात सत्य परिस्थिती नव्हती. यानंतर मला कळले की कोणतेही ट्रक साहिल याच्या किवा त्याच्या परिवाराच्या नावावर नव्हते.त्याच्या नावावर कोणतेही गौण खनिज वाहतूक परवानाही नव्हता,जसे त्याने त्याच्या एफआयआरमध्ये लिहले होते. तरीही खोटी तक्रार करुन त्या आधारे माझ्याविरोधात खोटी कारवाई साहिल सय्यद याने केली होती.

यानंतर ७ फेब्रुवारी २०२० रोजी सकळी ११ ते १२ वाजता दरम्यान साहिल सय्यद हा मी कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी कार्यालय मौदा येथे माझ्या टेबलवर आला,त्याने मला माझ्या कार्यालयातील दोन राजस्व अपील प्रकरणांबाबत विचारणा केली.माझ्याकडे राजस्व अपील प्रकरणांची कामे नाहीत असे मी त्यास सांगितले.त्यानंतर त्याने मला २०१३ च्या प्रकरणाची आठवण काढत म्हणाला की ’साहब, जो कूछ उस वक्त हूआ अनजाने मे हूआ जाने दो,अभी मेरे पहचानवाले कोर्ट मे बहोत लाेग है,अभी अपना मॅटर निपटा सकते है,नितीन तेलगोटे साहब को मै बावणकुळे या फडणवीस साहब से बात कराता हू,और मै खुद भी बात करुंगा, डबले वकील सब देख लेंगे,अभी इतना बडा बजाज का केस उनके पास है,अपना केस तो उसके सामने मामुली है,डबले वकील साहब किसी भी वकील को खडा करके सब…’वगैरे सेट हो जायेगा लेकीन पैसे देने होंगे.७० लाख रुपये होगा,नही तो बेमतलब मे मौका होते हूये फँसने समान होगा’.
यावर मी त्यास काहीही उत्तर दिले नाही,कारण मी जामिनावर बाहेर आहे आणि मी साहिलचे विरोधात तक्रार करायला गेलो तर त्याची खूप ओळख असल्याने यापूर्वी केलेल्या तक्रारीप्रमाणे तो पुन्हा खोटी तक्रार करुन मला त्रास देईल या भीतीपोटी मी चूप बसलो आहे…!
मी हिम्मत करुन पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे दाखल अप.क्र.३१७८/२०११३ याबाबत साहिल सय्यदने केलेला हा प्रकार याबाबत ही तक्रार देत आहे.
(अस्वीकरण:- उपरोक्त बातमीत काही राजकीय नेत्यांची व ज्येष्ठ वकीलांची नावे आली असली तरी ती फक्त वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘सत्ताधीश’ या माहितीचे समर्थन करीत नाही किवा विरोध ही करत नाही.तक्रार सिद्ध करण्याची जवाबदारी ‘सत्ताधीश’ची नाही.याबाबत कोणत्याही कायदेशीर जवाबदारीला ‘सत्ताधीश’उत्तरदायी राहणार नाही.केवळ वाचकांच्या माहितीसाठी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जी नावे बातमीत प्रसिद्ध झाली त्यांची देखील बाजू त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाल्यास ताबडतोब प्रसिद्ध केली जाईल)




आमचे चॅनल subscribe करा
