
नागपूर,ता. ६ जुलै: महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मागील ग्रहणानंतरचे षडाष्टक योग सुटता सुटत नसून त्यांच्या या योगात आज आणखी एका तक्रारीची भर पडली. मुंढे याना राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाचे प्रमुख अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांच्याकडून महिला आयोगाने खुलासा मागितला आहे. येत्या ५ दिवसात मुंढे यांना आयोगापुढे खुलासा सादर करायचा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष्ा रेखा शर्मा यांनी ही नोटीस बजावली आहे.
नागपूर शहरात सध्या महापौर,सत्तापक्ष् ,मुंढे व डॉ.गंटावार यांचीच चर्चा रंगली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या(एनएसएससीडीसीएल)कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकुर यांनी कंपनीचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांना त्यांचा होत असणारा सातत्याने मानसिक छळ,अपमानास्पद वागणूक, आत्मसन्मानावर केले जाणारे प्रहार,हक्काची मातृत्व रजा नाकारणे,कंपनीच्या बैठकीतील विषय पत्रिकेत मुंढे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्याचा विषय समाविष्ट करण्यासाठी पराकोटीचा दवाब आणने,वेळी अवेळी फोन करुन केबिनमध्ये बाेलावणे, मनपा तसेच स्मार्ट सिटीच्या इतर अधिकारी व कर्मचा-यांसमोर पानउतारा करणे,इ. अश्या अनेक तक्रारी ठाकुर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्या आहेत.एवढेच नव्हे तर ठाकुर यांना त्यांच्या तीन महिन्याच्या बाळापासून दूर राहण्यास मुंढे यांनी भाग पाडले.
राष्ट्रीय महिला आयोगाने ठाकुर यांच्या तक्रारीची गांर्भीयाने नोंद घेत मुंढे यांना ५ दिवसात खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. आता आयुक्त यावर काय उत्तर सादर करतात,याकडे नागपूरकर जनतेचे व माध्यमांचे लक्ष् लागले आहे.
मनपातील आरोग्य विभागातील काही महिला वैद्यकीय अधिकारी या देखील मुंढे यांच्या केबिनमधून रडत बाहेर पडल्याची चर्चा देखील मनपात चांगलीच रंगली होती. मुंढे यांची एकंदरित महिलांप्रतिची असंवेदनशील वागणूक याचे देखील अनेक किस्से मनपात खासगीतील चर्चेचा विषय असतो.
नुकत्याच पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभागृहात भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी मुंढे यांच्यावर शरसंधान साधताना मुंढे हे मनपातील महिला अधिकारी यांच्यासोबत ‘कमरेखालची’भाषा बोलत असल्याचा घणाघाती आरोप केला होता,याची सभागृहातील नोंदीत कायमची नोंद झाली. सभागृहात येणा-या पुढील पिढीसाठी अश्या नोंदी योग्य नसल्याचे देखील ते म्हणाले.
मनपातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्यासारख्या भ्रष्ट,चारित्र्यहीन,उर्मट अधिका-याला पाठीशी घालणा-या मुंढे यांच्यावर दयाशंकर तिवारी यांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. याच डॉ.गंटावार यांनी मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील एका खोलीचा कसा कुंटणखाना केला,याची धक्कादायक माहिती देखील दयाशकंर तिवारी यांनी सभागृहात सादर केल्याने अनेकांना धक्का बसला होता.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही हे सर्व आरोप ऐकले होते मात्र उत्तर सादर करताना त्यांनी डॉ.गंटावार दामपत्याला पाठीशी घालत,न्यायालयाने गंटावार प्रकरणी स्टे दिल्याचे सांगत अंग झटकून घेतले होते.
आतापर्यंत नागपूर-मुंबई-बारामती,बीड,मराठवाडा,नाशिक शहरापुरती मर्यादित असणारी मुंढे-सत्तापक्ष्ाची लढाई ही आता चक्क दिल्लीपर्यंत पोहोचली असून राष्ट्रीय महिला आयोगाने भानुप्रिया ठाकुर या कंपनी सचिवाच्या मार्मिक पत्राला अतिशय गंभीरपणे घेऊन मुंढे यांना नोटीस बजावली असून पाच दिवसात खुलासा मागितला आहे.

आमचे चॅनल subscribe करा