Homeब्रेकिंग न्यूज एनयुजे महाराष्ट्रची वर्तमानपत्रांना आर्थिक सहायतेची भूमिका

 एनयुजे महाराष्ट्रची वर्तमानपत्रांना आर्थिक सहायतेची भूमिका

 

 

 

 

 

 

सरकारच्या आदेशाला हरताळ फासून कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार्‍यांना काळ्या यादीत टाकावे 

आर्थिक सहायता ही छोट्या, मध्यम दैनिक,साप्ताहिकांना द्यावी, सरकारी यादीवर नसलेलेही यात असावेत

नागपूर,ता. ४ जुलै:  खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री  प्रकाश जावडेकर यांच्याकडे नोंदणीकृत वर्तमानपत्रांसाठी १ ते ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली ,त्याबद्दल त्यांचे एनयुजे महाराष्ट्रने आभार मानले आहे. वर्तमानपत्र आर्थिक सहायतेबाबत नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रची भूमिका ठाम असून, ज्यांनी आपल्या वर्तमानपत्रातील लोकशाहीचा सच्चा पाईक, चौथा स्तंभ असणार्‍या कर्मचाऱ्यांवर कोरोना संकटाच्या निमित्ताने अनेक प्रकारे अन्याय केले आहेत अशांना काळ्या यादीत टाकावे यांना कोणत्याही प्रकारची सरकारी मदत करु नये असे मत एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.

तसेच भांडवलदारी आणि प्रसार माध्यमांचे नाव वापरून आपले वैयक्तिक फायदे आजवर करून घेतले आहेत अशांची सर्वप्रथम चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत करदेकर यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाचे निमित्ताने आर्थिक संकटातील प्रसार माध्यमांना बळकटी देण्यासाठी सर्व प्रकारच्या सहायतेची तातडीने गरज असल्याचे निवेदन सर्वात आधी एनयुजे महाराष्ट्रने .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र राज्य सरकारला दिले होते अशी माहिती कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी दिली.

एनयुजे इंडियाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी तसेच सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठवले.

एनयुजेची आग्रहाची भूमिका आहे आर्थिक मदत न्याय्य असावी. असे स्पष्ट मत एनयुजे इंडियाचे ज्येष्ठ नेते व एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमार यांनी व्यक्त केले.

१)पत्रकार व इतर कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकणे
२)राजीनामा देण्यास जबरदस्ती करणे
३)आपल्या वर्तमानपत्राच्या आवृत्या बंद करणे
४)हक्काचे पगार न देणे
५)पगारात कपात करणे
असे अनेक प्रचंड अन्याय कारक प्रकार करुन सरकारच्या आदेशाला हरताळ फासले आहेत. या सगळ्यांना काळ्या यादीत टाकावे.
आर्थिक सहायता ही छोट्या, मध्यम दैनिक,साप्ताहिकांना द्यावी, सरकारी यादीवर नसलेलेही यात असावेत. अशी महत्वपूर्ण भूमिका एनयुजेएमने जाहीर केलेल्या निवेदनात दिली असल्याचे प्रवक्ते संदिप टक्के यांनी दिली

 अखेर जय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा एक महिन्यांचा पगार झाला-

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे व्यवस्थापनाकडून आमचा पगार आज-उद्या होईल, पुढच्या हप्त्यात होईल, असे वारंवार सांगितले जात होते. थकीत पगार वेळेत न आल्यामुळे सर्वच कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते, परंतु दिनांक १ जुलै रोजी, फेब्रूवारीचा व मार्च महिन्याचा पगार कंपनीने केला आहे, थोडासा दिलासा मिळाला मात्र पण उरलेले चार महिन्यांचे पगार कंपनीने लवकरात लवकर करावे ही व्यवस्थापनेकडे मागणी असेल.
पगार नियमित व लवकर मिळावा या साठी कामगार आयुक्तांकडे वारंवार पत्रव्यवहार करून  कर्मचा-याना नँशनल युनियन जर्नालिस्ट महाराष्ट्र (एनयुजेएम) अध्यक्षा शीतल करदेकर व सह आयुक्त क्षीरसागर यानी मदत केली यासाठी जय महाराष्ट्राच्या कर्मचा-यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

Latest बातम्या