
गंटावार दामपत्यांला पाठीशी घालणारे मुंढे यांच्या प्रामाणिकपणावर शंका!
नागपूर,ता. २ जुलै: नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण गंटावार व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांच्या विरोधात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना संपूर्ण कागदोपत्री पुरावे सोपवून देखील आयुक्त हे, गंटावार दामपत्याला पाठीशी घालत आहे.कालच या दामपत्याविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार तसेच उतपन्नापेक्ष्ा अधिक संपत्ती जमा करण्याविरोधात गुन्हा दाखल झाला,तरीदेखील आयुक्त हे शांत बसले आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंटावार दामपत्याला त्वरीत निलंबित करण्याचे आदेश न दिल्यास रस्त्यावर मोठे जनआंदोलन करण्यात येईल,असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी सत्ता पक्ष् नेते दयाशंकर तिवारी यांनी आज गुरुवार दि. २ जुलै रोजी मनपा मुख्यालयात घेतलेल्या पत्र-परिषदेत दिला.
याप्रसंगी सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव,स्थायी समिती अध्यक्ष् विजय झलके,प्रतोद दिव्या धुरडे, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दयाशंकर तिवारी म्हणाले,की १४ फेब्रुवारी वेलेंटाईनच्या दिवशी माहिती अधिकार कार्यकर्ते मदन थूल यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे डॉ.गंटावार दामपत्या विरोधात अनेक पुरावे जमा केले. मात्र सभागृहात आयुक्तांनी त्यांचे स्पष्टीकरण सादर करताना सांगितले,थूल यांना ९ मार्च रोजी मनपात बोलावले हाेते मात्र ते चंद्रपूरला होते. यानंतर लॉक डाऊन सुरु झाला आणि ते येऊ शकले नाहीत. दूर्देवाने थूल हे आता हयातीत नाही,ते जर जिवंत असते तर आयुक्तांच्या स्पष्टीकरणात किती सत्यता आहे?हे तपासून बघता आले असते.
तरीही प्रश्न उरतोच आयुक्त कार्यालयात डॉ.गंटावार दामपत्याविरोधात सगळे पुरावे उपलब्ध असतानाही आयुक्त कारवाई का करीत नाही?आयुक्त आणि डॉ.गंटावार यांची काही साठगाठ आहे का?डॉ.शीलू गंटावार यांच्यावर देखील गंभीर आरोप असून गैरहजर राहून देखील त्यांनी मनपाचा पगार उचलला.महापौरांनी हजेरी पुस्तिका जब्त करण्याचा आदेश दिला असता फक्त एकाच वर्षाचे हजेरी पुस्तक प्राप्त झाले.
आम्ही तीन मुद्दांवर डॉ.गंटावार दामपत्याविरोधात कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली ते म्हणजे,नागपूर मनपामध्ये २१ मार्च २०१६ रोजी समिती विभागाच्या निर्देश क्र.१६८ अन्वये मनपामध्ये कार्यरत कोणत्याही वैद्यकीय अधिका-याला खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही तसेच त्यांना व्यवसाय रोध भत्ता लागू करण्यात आला.मात्र डॉ.गंटावार हे खासगी रुग्णालय चालवित आहेत.दुसरा मुद्दा होता, महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा १९४९ अंतर्गत कलम ५ अन्वये शासकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी हे स्वत:चा वैयक्तिक दवाखाना चालवू शकत नाही मात्र डॉ.गंटावार हे धंतोली येथे प्रशस्त असे ‘काेलंबिया’ नर्सिंग होम चालवित आहेत,जे नियमात बसत नाही. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक आणि शिस्त व अपील नियम १९७९ च्या नियम ५ अंतर्गत शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती ही कोणत्याही राजकीय संघटनेत पदाधिकारी नाही बनू शकत तसेच कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग ही घेऊ शकत नाही मात्र डॉ.शीलू गंटावार या कश्याप्रकारे मध्यप्रदेशात काँग्रेस पक्ष्ाच्या संपूर्ण कार्यकारीणीशी जुळल्या आहेत याचे संपूर्ण पुरावे छायाचित्रांसह आयुक्तांकडे साेपविण्यात आले आहे.तरी देखील आयुक्त हे धृतराष्ट्र बनत असतील तर याच अर्थ आम्ही काय घ्यावा?भ्रष्टाचारसारख्या गंभीर गुन्हयाखाली पोलीस ठाण्यात नोंद झाली असताना सुद्धा आयुक्त हे जर का ‘मौन राग’आलापणार असतील तर, आम्ही आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करु आणि याचे जवाबदार फक्त आयुक्त असतील,असा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना संदीप जाधव म्हणाले,की सभागृहात ६० नगरसेवकांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा केली.सर्वांनी डॉ. गंटावार यांच्याप्रति पराकोटीचा रोष व्यक्त करीत त्यांच्या एकूणच कार्यभाराविषयी प्रश्न उपस्थित केले. दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या कारभाराविरोधात सगळे पुरावे आयुक्तांकडे सादर केले. महापौर संदीप जोशी यांनी देखील तात्काळ प्रभावाने त्या दोघांच्याही निलंबनाचे आदेश पारित केले. २६ जून नंतर आज २ जुलै झाली तरी अद्याप मुंढे यांनी कोणतीही कारवाई केली नाही.कालच या दामपत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तरी आयुक्त त्यांना का पाठीशी घालत आहे?या संपूर्ण भ्रष्टाचारात आयुक्तांची काही मिलीभगत आहे का?असा सवाल संदीप जाधव यांनी केला.
लॉक डाऊनमध्ये ही डॉ.शीलू गंटावार मध्यप्रदेशात?
याप्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी डॉ.शीलू गंटावार यांच्या विरोधातील सर्व पुरावे माध्यमांना दाखवित,हे सर्व पुरावे त्यांच्याच फेसबूकवरुन घेण्यात आले असून कोणत्याही तिस-या व्यक्तिने हे पुरावे दिले नसल्याचे सांगितले.डॉ.शीलू गंटावार यांनी माहेर व सासरचे आडनाव याव्यतिरिक्त तिसरेच आडनाव आपल्या राजकीय कारकीर्दीसाठी ठेवले व आपली जातच बदलली असा घणाघाती आरोप दयाशंकर तिवारी यांनी केला. माहेरचे आडनाव चिमूरकर,सासरचे आडनाव गंटावार तर राजकीय पोळी शेकण्यासाठी तिसरे आडनाव डॉ.शीलू यांनी ‘पंधराम’असे ठेवले!मध्यप्रदेशच्या भैसेदेही येथून त्यांनी काँग्रेसचे तिकीट मागितले होते.बैतूल येथे दवाखाना थाटला होता. एवढेच नव्हे तर दर शुक्रवारी त्या दवाखान्यात त्या बसत होत्या. या दवाखान्याच्या पाटीचाही फोटो आम्ही त्यांच्या फेसबूकवरुनच घेतला असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.काँग्रेस पक्ष्ात त्या कोणकोणत्या पदावर होत्या,हे देखील त्यांनी आपल्या फेसबूकवरील प्रोफाईलमध्येच नमूद केले आहे.
एवढेच नव्हे तर लॉक डाऊनच्या काळात जिथे सामान्य माणूस,मजूर वर्ग आपापल्या कुटुंबियांसाठी झूरत होता,रडत होता,त्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात डॉ.शीलू या मध्यप्रदेशात गेल्या,तेथील सतपूडा पर्वत रांगेचे फोटो फेसबूकवर अपलोड करुन साहित्यिक अंदाजमध्ये ‘निसर्गाने जणू हिरवी चादर धरणीवर पांघरली आहे’असे शब्द पोस्ट केले आहे.यावर तरी आयुक्त काही स्पष्टीकरण देणार आहे किवा मागणार आहेत का? नेमका आयुक्तांवर कोणाचा दवाब आहे? दवाब असेल तर जनतेला त्यांनी स्पष्टकरण द्यावे,अशी मागणी त्यांनी केली.
पोर्णिमा भिलावे यांना गंटावार समर्थकाची धमकी!-
माहिती अधिकार कार्यकर्त्या पोर्णिमा मंगेश भिलावे यांना डॉ.गंटावार विरोधात माहिती मागविल्यामुळे दिलीपकुमार तोटा नावाच्या व्यक्तिने धमकी दिली.एवढेच नव्हे तर पोर्णिमा यांनी सुनील बुरेतवार यांच्या विरोधात माहिती मागविली असता त्यांना पुन्हा धमकी देण्यात आली,पैश्यांची लालूच देण्यात आली.या विरोधात पोर्णिमा यांनी कोराडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. गंटावार व बुरेतवार यांचे काही लागेबंधे आहेत का?असा सवाल उपस्थित करीत शहरातील दिवंगंत ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे यांनी देखील २०१२ साली काेलंबिया रुग्णालयाविरोधात आंदोलन केले होते.वाडीभस्मे नावाची महिला रुग्ण कोलंबियात भरती होती.याचे १५ लाखांचे बिल डॉ.गंटावार यांनी काढले. एवढेच नव्हे तर उर्वरित ४ लाख ४१ हजार रुपयांचे बिल जमा करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईंकावर दवाब आणला. हे पैसे जमा होताच,२० मिनिटांनी नातेवाईकांना सांगण्यात आले त्यांचा रुग्ण दगावला आहे,मृतदेह घेऊन जावा!
२०१५ साली मनपाच्या रुग्णालयातील अनेक रुग्ण डॉ.गंटावारांनी आपल्या खासगी कोलंबिया रुग्णालयात परस्पर पळवले.एवढेच नव्हे तर या रुग्णाचेंही बोगस बिल मनपाच्या औषधी प्रशासन विभागाला पाठवले. याविरोधात औषधी प्रशासन विभागाचे अति.आयुक्त नि.प.भांडारकर यांच्याकडे चौकशी आली असता त्यांनी डॉ.गंटावार यांनी औषधांची खोटी बिले सादर केल्याचा अहवाल दिला व फसवणूक केल्यामुळे कायद्याच्या उल्लंघनातून गुन्हा दाखल करण्याची सिफारश केली होती.गिरधर दुताडकर नावाच्या रुग्णाला ७ ऑक्टोबर २०१० रोजी सुटी झाली असताना डॉ.गंटावारांनी आपल्या अहवालात त्यांना १२ ऑक्टोबर पर्यंत औषधे पुरविण्यात आल्याची माहिती दिली होती!ई-एम सेट नावाची गोळी २५६ देण्यात आल्याचे अहवाल लिहले मात्र प्रत्यक्ष्ात ही गोळी फक्त ५० नगच रुग्णालयात उपलब्ध होत्या.
डॉ.गंटावार हे मानसिकरित्याच गुन्हेगार असून ते २००७ पासून सातत्याने गुन्हेगारी करीत आहे,असा आरोप दयाशंकर तिवारी यांनी केला.अश्या भयंकर गुन्हेगाराला प्रामाणिक अधिकारी म्हणून मिरविणारे आयुक्त तुकाराम मुंढे पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावर देखील शंका उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.
ऑडीयो क्लिप सार्वजनिक करण्याची वेळ येऊ देऊ नका-
रसिकप्रेमी व स्त्रीलंपट डॉ. प्रविण गंटावार यांनी गांधी नगर रुग्णालयात जी रसिकता दाखवली,जो कुंटणखाना चालविला त्याची ही ऑडीयो क्लीप पत्र-परिषद घेऊन सार्वजनिक करण्याची वेळ आयुक्तांनी आमच्यावर येऊ देऊ नये.आमच्यासारख्या संस्कारक्ष् म व्यक्तिंना या गोष्टीचा उलट तात्रच होईल. त्यामुळे आयुक्तांना आमची कळकळीची विनंती आहे,त्यांनी डॉ.गंटावार दामपत्यावर त्वरीत निलंबनाची कारवाई करावी. त्यांचे शंभर अपराध पोटात घालायला आम्ही काही भगवान श्रीकृष्ण नाहीत.
जरीपटका येथे निरीक्ष् ण दौ-यात मुंढे यांनी पत्रकार राजू कुशवाहा यांना पाेलीसांकरवी जवळ बोलावून दम दिला. मनपा मुख्यालयापासून कुशवाहा हे त्यांच्या मागे बातमीकरीता जात असल्याचे मुंढेंना त्यांच्या ‘खास’सहका-याने सांगितले. बातमी मिळवणे हा पत्रकाराचा लोकशाहीने बहाल केलेला संवैधानिक अधिकार आहे मात्र नियमात कारभार करणारे मुंढे यांना एखाद्या पत्रकाराचा संवैधानिक अधिकारच मान्य नाही. आयुक्त कार्यालयातून जे मिळेल,जेवढे लिखित मिळेल,तेवढेच छापा!असा दम मुंढेंनी या पत्रकाराला दिला असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी पत्र परिषदेत दिली.

आमचे चॅनल subscribe करा