Homeनागपूर न्यूजनागपूरात बाधितांनी ओलांडला ६०० चा टप्पा: आज ३० रुग्ण पॉझिटीव्ह: रुग्णसंख्या...

नागपूरात बाधितांनी ओलांडला ६०० चा टप्पा: आज ३० रुग्ण पॉझिटीव्ह: रुग्णसंख्या ६१३

सारीच्या दोन रुग्णांनाही कोरोनाची लागण: ४०९ बाधितांनी केली कोरानावर मात

नागपूर,ता.३ जून: नागपूरात आज बुधवार दि. ३ जून रोजी आणखी ३० पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. शहरात आता बाधितांची एकूण संख्या ही ६१३ झाली असून,बाधितांच्या संख्येने आज ६०० चा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असून दोनच आठवड्यात आधी ५०० व यानंतर ६०० ची संख्या काेरोना संसर्गाने गाठली.

मोमीनपूरा येथील ५,बांगलादेश मधून ६ तर हंसापूरी येथील एका खाजगी प्रयोगशाळेतील एका इसमाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आढळला. भानखेडा १,टिमकी ३,शांतीनगर १ गांधीबाग १ तसेच अकोला येथील नागपूरात उपचार घेणा-या २ रुग्णांचा देखील अहवाल आज पॉझिटीव्ह निघाला आहे. सारीच्या दोन रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आज समाेर आले असून यातील एक अकोला व एक चंद्रपूर येथील रुग्ण आहेत.

मेयोच्या प्रयोगशाळेतून आज १४ संशयितांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले.मेडीकल ९ संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह निघाले.
आज आणखी ५ बाधितांनी कोरोनावर मात केली असून बरे होऊन सुखरुप घरी जाणा-यां बाधितांची संख्या ही आता ४०९ वर पोहोचली असून नागपूरातच नव्हे तर इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनावर मात करणा-यांची टक्केवारी ही ४० टक्क्यांच्या पुढे असल्याचे भारतीय वैधकयी संशोधन परिषदेने(आरसीएमआर)ने नुकतेच घोषित केले आहे.

बजाज नगरमध्ये आणखी ५ कोरोनाबाधित?
आज सायंकाळी बजाजनगर येथे आणखी ५ कोरोनाबाधित आढळ्याची चर्चा एेकू आली.काल धंतोली येथील एका खाजगी रुग्णालयातील परिचारिका ही कोरोना बाधित आढळली. ती बजाजनगर येथील रहीवाशी होती. मेडीकलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात ही परिचारिका आली होती.पुढे या वृद्धाचा मृत्यू झाला. या परिचारिकेलाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने या परिचारिकेच्या संपर्कात आलेले एकूण ६९ लोकांना याच खाजगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.मात्र बजाजनगर येथे परिचारिकेच्या संपर्कातील आणखी ५ लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याच्या माहितीला अद्याप कोणताही अधिकृत दूजोरा ‘सत्ताधीश’ला मिळाला नाही.

Latest बातम्या