
नागपूर,ता.१४ मे: मी कोणतीही माहिती लपवली नाही,मूळात अशी कोणतीही माहिती लपवणे म्हणजे नुकसानच असेल त्यामुळे मी असं काही करण्याची गरज नाही. सध्या लॉक डाऊनमुळे न्यायालये बंद आहेत त्यामुळे राजकारण करताना आमच्यावर कोणत्या पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल आहे याचा हिशोब ठेवणे अशक्यच आहे,न्यायालय बंद असल्यामुळे भारतीय जनता पक्ष्ाच्यामिडीयाकर्मींना न्यायालयीन माहिती मिळवणे शक्य झाले नसल्याचा खुलासा भारतीय जनता पक्ष्ाचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दटके यांनी केला.
प्रविण दटके यांच्या विरोधात २००६ सालच्या फौजदारी प्रकरणात कलम १८१,१८२,२०० नुसार गुन्हा दाखल आहे.यावर नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र, होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणूकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती लपविल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला आहे.
दटके यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १२५(अ)प्रमाणे कारवाई करण्यात यावी,अशी विनंती ॲड. सतीश उके यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये केली आहे. खोटी माहिती दिल्याबद्दल आयोगाने दटके यांचा अर्ज रद्द करुन निवडणूक प्रमाणपत्र देऊ नये,अशी देखील विनंती त्यांनी अर्जात केली आहे.
यावर प्रतिक्रिया देतान दटके यांनी सांगितले की, जेव्हा मला अर्ज भरायला सांगण्यात आले तेव्हा कोव्हिड सुरु आहे,त्यामुळे विशेषत: न्यायालयेही बंद आहेत त्यामुळे अर्ज भरताना माझ्यावरील गुन्ह्यांच्या संदर्भाज जे काही ऑन लाईन,ऑफ लाईन कलमा,केसेस यांची माहिती उपलब्ध होती तीच आमच्या भारतीय जनता पक्ष्ाच्या मिडीयाकर्मीनी जमवल्या व त्या माहितीच्या अाधारावर मी अर्ज दाखल केला असल्याचे दटके यांनी सांगितले.
आणि माझ्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत हे राजकीय क्ष्ेत्रात असल्यामुळे त्याची आमच्याजवळ माहिती उपलब्ध नसते,त्या आमच्याकडे काही लिहून नसतात,त्यामुळे कोराेनाच्या काळात जी काही माहिती उपलब्ध झाली तीच अर्जात देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच अनावधनाने जे काही राहीलं असेल तर कायदेशीर जो काही मार्ग असेल,त्या मार्गाचा अवलंब करुन आम्ही समोर जाऊ आणि त्याबाबतीत जी काही माहिती असेल ती कोरोना संपल्यानंतर परत एकदा काढून आपल्या सर्व मिडीया आघाडीच्या मंडळीची चर्चा करुन कायदेशीर मार्गाचा अवलंब करु,असे त्यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
