फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी नागपुरकरांच्या इम्युन मजबुतीकरिता प्रयत्न करणारे नागपुर ठरणार...

कोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी नागपुरकरांच्या इम्युन मजबुतीकरिता प्रयत्न करणारे नागपुर ठरणार राज्यातले पहिले शहर

Advertisements

(अतिथीस्तंभ)

कोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी नागपुरकरांच्या इम्युन मजबुतीकरिता प्रयत्न करणारे नागपुर ठरणार राज्यातले पहिले शहर

नागपुरातील सेवाव्रती होमिओपैथी डॉ. हनवंते यांचा पुढाकार…

आजार कोणताही असो, आजाराशी लढा देते, ती रोग प्रतिकारक शक्ती…अर्थात इम्युन सिस्टीम….ही शक्ती ज्याची मजबुत, तोच ठरतो सुदृढ आरोग्याचा धनी….कोविड 19 या आजारात, याच रोगप्रतिकारक शक्तीची भूमिका महत्वपुर्ण ठरत आहे….त्यामुळेच इम्युन शक्ती वाढवा, असा सल्ला सातत्याने दिला जातोय….हीच रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्याकरिता आयुष मंत्रालय सातत्याने सल्ला देत आहे…. आयुर्वेदीक काढा आणि होमिओपैथीतील काही विशिष्ट औषधं इम्युन मजबुतीसाठी रामबाण ठरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होमिओपैथी डॉक्टरांनी पुढे येऊन कोविड युद्धात योध्याची भूमिका करावी, असे आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत नागपुरातील सेवाव्रती होमीओपैथ डॉ सागर हनवंते यांनी इम्युन मजबुत करणारी होमिओ औषधे नागपुरकरांनी घ्यावीत, आणि आपल्या शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी मदत करावी, याकरिता मोहीम आरंभली आहे.

या मोहिमेबद्दल माहिती देताना डॉ हनवंते म्हणाले, मुळात होमिओ कोणताही साईड इफेक्ट न देणारी आणि सुरक्षित आहेत. आर्सेनिक 30 हे होमिओ औषध इम्युनला मजबुती देणारे आहे. फक्त पहिल्यांदा होमिओ डॉक्टरांशी मसलत करुन आपल्या आरोग्याकरिता नेमके कोणते कॉम्बिनेशन अधिक हितावह आहे, याची माहिती घेऊन हे औषध घेणे गरजेचे आहे.

कोरोना वायरसचे आक्रमण आपल्यावर होणारच नाही, याकरिता फिजिकल डिस्टंसिंग पाळणे, हात स्वच्छ धुणे, मास्क आणि सैनिटाईजरचा वापर करणे, इ. बाबी अंमलात आणाव्याच लागतील. मात्र होमिओ औषधांचा इम्युन मजबुतीकरिता सकारात्मक परिणाम होतो. आयुष मंत्रालयानेंही ही बाब स्पष्ट केली आहे.

त्यामुळेच देशाचा मध्यबिंदु असणार नागपुर कोविड 19 या आजाराला बळी पडु नये, याकरिता नागपुरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने या होमिओ औषधांचा अधिकाधिक प्रचार, प्रसार आणि त्याची उपलब्धता या हेतुने समाजाच्या मदतीने जनजागरण केले जात आहे. अशा प्रकारचे जनजागरण करणारे नागपुर हे राज्यातील आणि कदाचित देशातीलही पहिलेच शहर असावे, अशी माहितीही त्यांनी दिली.

या जनजागरण अभियानात नागरिकांनी, संस्थांनी, सेवाव्रतींनी आपला हातभार लावावा. आपण, आपले कुटुंबिय, शेजारी मित्रपरिवार, प्रत्येक जण कोरोनाशी युद्धाकरिता इम्युन या घटाकाच्या बाबतीत कसा मजबुत होईल, याकरिता जागरुक व्हावे व प्रयत्न करावा, असे आवाहनही डॉ सागर हनवंते यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या