Homeब्रेकिंग न्यूजस्वत:मास्क शिवून मोफत वाटप करीत आहे जि.प.प्राथ.शाळेतील शिक्षिका

स्वत:मास्क शिवून मोफत वाटप करीत आहे जि.प.प्राथ.शाळेतील शिक्षिका

सोनेगाव निपानी शाळेतील सुजाता भानसे यांचे कौतूकास्पद कार्य

नागपूर,२३ एप्रिल:  देशात कोविड 19 अर्थात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाँकडाऊन घोषित झाले आहे अशात घराच्या बाहेर निघणे जोखीमपूर्ण आहे. अशा परीस्थितीत समाजसेवा करणे अतिशय कठिण बाब आहे. अशा कठीण परिस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका देवदूत बनून लोकांची मदत करीत आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी लोकांना सजग करण्याचे काम सुध्दा शिक्षिका करीत आहे तसेच स्वतः घरी उपलब्ध असलेल्या कापडापासून स्वतः मास्क शिवून वितरण करत आहे.

जिल्हा परिषद शिक्षिका शाळा सोनेगाव निपानी, केंद्र वाडी, नागपूर येथील प्राथमिक शिक्षिका  सुजाता भानसे स्वतः घरी मास्क शिवून गरजू व गरीब आवश्यकता असलेल्या लोकांना घरी जाऊन सोशल डिस्टंस पाळून मास्कचे वितरण केले आहे. शासकीय आदेशाचे पालन करीत सर्वांना प्रत्येक वेळी मास्क लावण्यास विनंती करीत आहे. त्यामुळे स्वतःचे व इतरांचे प्राण संकटातून आपण वाचवू शकणार आहोत.

स्वतः च्या जिवाची पर्वा न करता प्राथमिक शिक्षिका गरीब वस्तीत जाऊन मास्क वाटत करीत आहेत .सर्वांना कोरोना वायरस पासून बचाव करण्यासाठी लाँकडाउनचे पालन करणे का आवश्यक आहे. स्वतः चे या रोगापासून बचाव करण्यासाठी रोज सकाळी उठून व्यायाम करावे, दिवसभर भरपूर पाणी प्यावे, कुठल्याही अफवांना बळी पडू नये तसेच डोकं दुखणे, सर्दी, खोकला, ताप,पोटासंबंधी समस्या, श्वसनासंबंधीत समस्या निर्माण झाल्यास ,उल्टी,पचनासंबंधी समस्या लक्षात येताच डाँक्टरांशी संपर्क साधावा.

तसेच साबनाणे वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टेंस पाळणे का जरूरी आहे हे समजावून सांगत आहे व जनजागृती करीत आहे. , सध्याच्या परिस्थितीत मास्क हा जीवनाचा अभिन्न अंग बनलेले आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका सुजाता भानसे यांनी ५००  ते १,०००   च्या जवळपास मास्क स्वतः घरी तयार करून गरजू लोकांना वाटप केले.तसेच किराणा दूकानात येणाऱ्या ग्राहकांना सुध्दा निशुल्क मास्क दिले, अन्नधान्याची मदत केली.

 

Latest बातम्या