

नागपूर, ११ मार्च: संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना या विषाणूची दहशत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात देखील दाखल झाली आहे. नागपूरात आतापर्यंत १० कोरोना विषाणू संशयित आढळले असून त्यांना शासकीय मेयो व मेडिकल रुग्णालयातील सुसज्ज वॉर्डात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोनाला घेऊन आरोग्य विभाग हा तत्पर आहे. कोरोना संसर्गित संशयास्पद रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाची निर्मिती करण्यात आली असून या वॉर्डात ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वॉर्डात २४/७ अशी सेवा पुरवण्यात येत आहे. डॉक्टर्स यांच्यासोबत परिचरिकांची विशेष चमू देखील सुसज्ज ठेवण्यात आली आहे. ‘C आणि ‘D’ वर्गाच्या स्टाफला देखील विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूरमध्ये देखील कोरोनाच्या चाचण्या संबंधी यंत्रणा उभारण्यात आली आहे,आता कोरोनाच्या चाचणी साठी सॅम्पल पुण्याला पाठवण्याची गरज नाही.
नागपुरातील १० कोरोना संशयितांपैकी ७ बधित संशयितांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून ३ रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत.आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हे अहवाल प्राप्त होतील.

कोरोनाला घेऊन नागपूरकरांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर्सनी केले आहे. फक्त खबरदारी घेण्याची गरज असून गर्दीची ठिकाणे सहसा टाळावी असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना विषाणूला घेऊन नागपूरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मेयो आणि मेडिकल मध्ये विशेष वॉर्ड निर्माण करण्यात आले असून आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. नागपूरात आतापर्यंत १० कोरोना संशयितांना या दोन्ही रुग्णालयांच्या सुसज्ज वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण नागपूरात!
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल,तीन दिवसांपूर्वी अमेरिकेहुन आला होता नागपूरात.तपासणी अहवालात कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह असल्याचं निदान.डॉक्टर्स यांनी नागरिकांना गर्दीची ठिकाणे टाळावी, शेक हॅन्ड करू नये, मास्क चा उपयोग करावा व वारंवार हात स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
