Homeनागपूर न्यूज२५ मिनिटात होणार सीताबर्डी ते खापरी प्रवास: नागपूर मेट्रोला 'सीएमआरएस'ची मंजुरी

२५ मिनिटात होणार सीताबर्डी ते खापरी प्रवास: नागपूर मेट्रोला ‘सीएमआरएस’ची मंजुरी

 

ताशी ८० किमी वेगाने धावणार मेट्रो, ‘सीबीटीसी’ने होणार मेट्रोचे संचालन

नागपूर, २२ नोव्हेंबर २०१९: वर्धा मार्गावर रिच-१ (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी) ताशी ८० किमी वेगाने धावण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तची (सीएमआरएस) मंजुरी नागपूर मेट्रोला मिळाली आहे. त्यामुळे आता ‘रेल्वे बोर्ड’ आणि ‘सीएमआरएस’च्या मंजुरीनंतर लवकरच सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी दरम्यान ताशी ८० किमी वेगाने नागपूर मेट्रो धावणार आहे. तेव्हा आता सीताबर्डी ते खापरी दरम्यान प्रवास करतांना केवळ २५ मिनिटाचा वेळ प्रवाश्याना लागणार आहे. सध्या या प्रवासाला ४५ मिनिटाचा कालावधी लागतो.

नुकतेच काही दिवसापूर्वी सीएमआरएस अधिकाऱ्यांचा दोन दिवसायी दौरा झाला असून या दौऱ्यात सर्व उपकरणांची तपासणी ‘सीएमआरएस’तर्फे करण्यात आली होती. सर्व निकषांवर झालेल्या तपासणीनंतर ‘सीएमआरएस’ दिलेली मंजुरी नागपूर मेट्रोसाठी आणखी एक उपलब्धी आहे, या धर्तीवर नागरिकांसाठी लवकरच ८० किमी वेगाने प्रवासी सेवा सुरु करण्यात येणार आहे.

‘सीएमआरएस’ने दिलेल्या मंजुरीत मल्टिपल ट्रेनसाठी ताशी ८० किमी वेग आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोलची (सीबीटीसी) परवानगी महा मेट्रोला दिली आहे. कम्युनिकेशन्स-बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) एक रेल्वे सिग्नलिंग सिस्टम आहे. ट्रेनचे ट्रॅफिक मॅनेजमेंट (दोन ट्रेन मधिल संवाद), पायाभूत सुविधा नियंत्रणासाठी ट्रेन आणि ट्रॅक उपकरणांमधील संवाद कायम ठेवते. ‘सीएमआरएस’च्या मंजुरीनंतर आता मेट्रोच्या प्रवासी सेवेचे संपूर्ण संचालन हे कम्युनिकेशन बेस्ड असणार आहे.

उल्लेखनीय आहे की..मेट्रोचे संचालन करण्यासाठी आवश्यक सर्व तपासण्या जसे ट्रेनमधिल उपकरणांचे परीक्षण, स्टेशनवरील प्रवाश्यांसाठी सोयी सुविधा, ट्रॅक & केबलिंगचे निरीक्षण आता पूर्ण झाल्या आहे. या सर्व तपासण्या रेल्वे बोर्ड, रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त(सीएमआरएस)तर्फे करण्यात आल्या आहेत, आणि या सर्वांची मंजुरी देखील महा मेट्रोला मिळालेली आहे.

Latest बातम्या