Homeनागपूर न्यूजजनक कुमार गर्ग आणि पथक यांचा २ दिवसीय दौरा पूर्ण:मेट्रो रेल प्रकल्पाच्या...

जनक कुमार गर्ग आणि पथक यांचा २ दिवसीय दौरा पूर्ण:मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण

Advertisements
Advertisements

नागपूर १५: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस)  जनक कुमार गर्ग आणि पथक यांचे २ दिवसीय दौरा आज पूर्ण झाला असून . गर्ग यांनी ऑरेंज लाईन अंतर्गत असलेल्या सिताबर्डी मेट्रो स्टेशनची पाहणी त्यांनी आज केली. प्रवाश्यांकरता करण्यात असलेल्या विविध सुविधांचे त्यांनी निरीक्षण केले.

या व्यतिरिक्त गर्ग यांनी इंस्टीटयुट ऑफ इंजीनियर्स ते सीताबर्डी मेट्रो स्टेशन दरम्यान ट्रॉलीने निरीक्षण केले तसेच सिताबर्डी मेट्रो स्टेशन येथील सुरक्षा आणि सोयी सुविधा आढावा  गर्ग यांनी घेतला. पाहणी दरम्यान महा मेट्रो द्वारे करण्यात आलेल्या उपाय योजनांची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. या पाहणी दरम्यान महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प)  महेश कुमार आणि संचालक (रोलिंग स्टॉक)  सुनील माथुर,कार्यकारी संचालक(रिच-३) . अरुण कुमार,कार्यकारी संचालक (ट्रॅक)  नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक (ईलेव्कट्रीकल) गिरधारी पौनिकर, महाव्यवस्थापक (ओ अँड एम) . सुधाकर उराडे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Latest बातम्या