फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहाशिवआघाडी नव्हे तर राजकीय अनैतिक संबंधाचे उत्तम उदाहरण : आ.कृष्णा खोपडे

महाशिवआघाडी नव्हे तर राजकीय अनैतिक संबंधाचे उत्तम उदाहरण : आ.कृष्णा खोपडे

Advertisements

नागपूर : अखेर जनमताच्या विरोधात जाऊन, जनादेशाचा अपमान करीत सत्तेच्या लोभापायी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाचा चुराडा करीत शेवटी सत्ता काबीज करण्यात जास्त रस दाखविला. गल्लीत वाघाची डरकाळी फोडून गोंधळ घालणारी शिवसेना दिल्लीत मात्र सोनिया गांधी समोर मुजरा करताना दिसली. बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनाच्या शेवटपर्यंत कधीच सत्तेचे राजकारण न करता हिंदुत्वाचा भगवा नेहमी उंचावत ठेवला. आता मात्र ‘भगवा आतंकवाद‘ या शब्दाच्या अविष्कार करणाऱ्या कॉंग्रेसची गळाभेट घेतांना लाज कां वाटत नाही? हिंदुत्वाचा आदर्श सोडत शिवसेनेने सत्ता मिळविणे, हाच एक उद्देश समोर ठेवला अशी जोरदार टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली

शिवसेनेच्या “मातोश्री” आता सोनिया गांधी 

एकेकाळी “मातोश्री” ने अनेक राजकारणी नेत्यांना नियंत्रणात ठेवणारी शिवसेना आता खुद पवार व सोनियाच्या नियंत्रणात दिसले. त्यामुळे सोनिया गांधीच आता शिवसेनेच्या “मातोश्री” झाल्या की काय ? अशी चर्चा सुद्धा सोशल मिडीयावर होताना दिसते. रिमोटने सरकार चालविणाऱ्या ठाकरे परिवाराने खुद आपल्या हातातील रिमोट आता सोनिया गांधी व शरद पवार यांच्या हाती दिला. वाघाच्या भूमिकेत असलेली शिवसेना आता रंग बदलणाऱ्या सरड्याच्या भूमिकेत दिसली.असेही ते म्हणाले.

नेहमीच विरोधाभासी व दोन वेगवेगळ्या टोकाचे राजकारण करणारे पक्ष कधीच एकत्र येऊ शकत नाही, आले तरी हे राजकीय अनैतिक संबंधाचे उत्तम उदाहरण असून जास्त काळ टिकण्यासारखे नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत सेना दिल्लीत लोटांगण घालताना दिसली, परंतु सोनिया गांधी व शरद पवार यांनी मिळून शेवटी शिवसेनेला ‘पप्पू’ केले कि काय ? कॉंग्रेसच्या तटस्थ भूमिकेनंतर ‘धोबी का कुत्ता, न घर का न घाट का’ अशी अवस्था शिवसेनेची झाल्याचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या