फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबंडखोर उमेदवार सतीश होले निलंबित

बंडखोर उमेदवार सतीश होले निलंबित

Advertisements

नागपूर: विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा फटका सर्वच पक्षांना बसला आहे. सत्ताधारी भाजपला याचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार सध्या रिंगणात आहेत. महायुतीच्या विरोधात उभे असलेल्या या बंडखोर उमेदवारांवर भाजपने कारवाई केली आहे. यात नागपूरचे माजी उपमहापौर सतीश होले यांचा समावेश आहे.

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून सतीश होले यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी केली आहे. पक्षविरोधी हालचाली केल्याचा ठपका देऊन त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मतदारसंघातून होले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. होले यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनाही पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनीही बंडखोरी करत अर्ज भरल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काढले आहे. होले, तोडसाम यांच्यासह गोंदियाचे विनोद अग्रवाल, मेळघाटचे अशोक केदार, गडचिरोलीचे गुलाब मडावी, पिंपरी चिंडवडच्या सीमा सावळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या