Advertisements

पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक आणि विविध समाजघटकांशी साधला संवाद
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकरराव कोहळे यांच्या प्रचाराने नागपूर शहरात वेग घेतला असून, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक आणि विविध समाजघटकांशी संवाद साधत त्यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. दक्षिण नागपूरमधील जानकी मंडळातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची भेट, बंजारा समाज पदवीधर मेळावा, सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापकांशी संवाद, हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक व शिवसेनेच्या पदवीधर पदाधिकाऱ्यांशी चर्चा तसेच प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्थेतील शिक्षक-प्राध्यापकांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोहळे यांनी पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण नागपूरमधील जानकी मंडळातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा तसेच शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, नगरसेवक संजय ठाकरे, धंतोली झोन सभापती भारती बुंदे, नगरसेवक अनिकेत चौधरी, नगरसेविका मनिषा नगरधनकर, जानकी मंडळ अध्यक्ष शशांक खेकरे, प्रभाग ३४ (ड) संयोजक चंदू मोरे, राहुल यावलकर, नानाभाऊ आदेवार, आशिष काळे, वॉर्ड अध्यक्ष लक्ष्मीकांत दडवे, संयोजक काशिनाथ इटनकर आणि वॉर्ड अध्यक्ष राकेश डोर्लीकर उपस्थित होते.

नागपूर येथे आयोजित बंजारा समाज पदवीधर मेळाव्यातही सुधाकर कोहळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजातील सुशिक्षित तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजपा-महायुतीच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल त्यांनी बंजारा समाजातील मान्यवरांचे आभार मानले. यावेळी डी. बी. चव्हाण, अमोल पुसदकर आणि आत्माराम राठोड उपस्थित होते.सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित संवाद कार्यक्रमात प्राध्यापकांशी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, प्राध्यापकांच्या अपेक्षा आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक दीपक चाफले, सचिव रणजीत चाफले आणि प्राचार्य. विठ्ठल अराजपुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
हिराबाई गायकवाड शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक तसेच शिवसेनेच्या पदवीधर पदाधिकाऱ्यांशी झालेल्या संवादात शिक्षण क्षेत्रातील अपेक्षा आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, शिवसेना नागपूर शहर प्रमुख बंडूभाऊ तळवेकर, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक योगराज ढेंगे, शिवसेना पदवीधर पूर्व विदर्भ प्रमुख निशांत चरडे,तुषार येसकर आणि शिवसेना कायदा विभागाचे पूर्व अध्यक्ष बुरहान शेख उपस्थित होते.
तसेच प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्थेतील शिक्षक, शिक्षिका आणि प्राध्यापकांशी संवाद साधत शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांच्या अपेक्षा आणि पदवीधरांच्या हक्कांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अर्चनाताई फुले, सचिव रमेश फुले, उत्तर नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषार फुले, व्यवस्थापकीय संचालक मोहित फुले तसेच संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.या सर्व संवाद कार्यक्रमांदरम्यान सुधाकर कोहळे यांनी पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागपूर विभागातील पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
थोडक्यात,विविध समाजघटक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी सुरू असलेल्या या व्यापक संपर्कामुळे नागपूर शहरातील पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराला अधिक गती मिळाली.
………………………………………..