Homeनागपूर मनपावाढदिवसाला मिळालेले प्रेम अन् शुभेच्छांनी भारावलो 

वाढदिवसाला मिळालेले प्रेम अन् शुभेच्छांनी भारावलो 

Advertisements
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली कृतज्ञता 
Advertisements

नागपूर,२७ मे २०२६: वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘वाढदिवसाला मिळालेले प्रेम अन् शुभेच्छांनी भारावलो’, या शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी राधाकृष्णन, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील मान्यवरांनी  गडकरी यांना सोशल मीडिया तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, महापौर नीता ठाकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, उद्योजक अनिल अंबानी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आदींनी  गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच नागपुरातील सर्व आमदार, नगरसेवक, भाजप व इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.  गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेल्या विशेषांकांमध्ये अनेकांनी लेख प्रकाशित करून गडकरी यांच्या व्यक्तिमत्वाचा तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला. या सर्वांबद्दल गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामध्ये राजकीय, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आदी क्षेत्रांमधील मंडळींचा समावेश आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे करण्‍यात आली “वस्त्र तुला”-
देशाच्या विकासाला नवे आयाम देणारे, जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विकासपुरूष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे “वस्त्र तुला” सोहळा आयोजित करून अनोख्‍या पद्धतीने अभिनंदन करण्‍यात आले. हा कार्यक्रम उत्साह, भावना आणि सामाजिक संवेदनांनी भारावलेला ठरला.
एन्रिको हाइट्स येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमासाठी आकर्षक तुला उभारण्यात आली होती. फुलांच्या सजावटीने, वस्त्रांच्या राशींनी, शुभेच्छांच्या वर्षावाने आणि मंगलमय वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि शंखनादाच्या मंगल स्वरांत “वस्त्र तुला” विधीला प्रारंभ झाला. एका पारड्यात नितीनजी गडकरी विराजमान झाले, तर दुसऱ्या पारड्यात त्‍यांच्‍या वजनाइतकी वस्त्रे ठेवण्‍यात आली. “जिवेत् शरदं शतम्”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात करीम आपल्या लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमाला राज्‍याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जुन उपस्‍थ‍िती लावली.
या उपक्रमातून संकलित झालेली सर्व वस्त्रे उन्हातान्हात कष्ट करणारे हॉकर्स, श्रमिक, हातावर पोट भरणारे कामगार तसेच गरजू बांधवांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी दिली. समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत न‍ितीनजी गडकरींचा वाढदिवस साजरा करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर व अशोक मानकर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, खा. मायाताई इवनाते, अविनाश घुशे, रेणुका देशकर, चेतन कायरकर, किशोर पाटील, मनीषा काशीकर, योगेश बन,  प्रमोद पेंडके, विजय फडणवीस, शैलेश ढोबळे, गुड्डू त्रिवेदी, महेंद्र राऊत तसेच समितीचे इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………………

Latest बातम्या