Homeनागपूर मनपाउद्या स्थायी समितीचे बजेट की कोरमनंतर सभा स्थगित?

उद्या स्थायी समितीचे बजेट की कोरमनंतर सभा स्थगित?

राज्यात विधान परिषदेच्या घोषणेनंतर आचार संहिता लागू

निवडणूक आयोगाच्या परवानगीकडे मनपा सत्ताधा-यांचे लक्ष
नागपूर,ता.१८ मे २०२६:महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणूकांची घोषणा करण्यात आली असून १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या सर्व १६ जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून, या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची घोषणा झाली असता,आचार संहिता लागल्याने उद्या दि.१९ मे २०२६ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडून सादर होणा-या अर्थसंकल्पावर देखील प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
१६ जागांवरील या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे.तर अर्जाची छानणी २ जून रोजी होणार असून या निवडणूकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या तब्बल चार वर्षे लांबल्याने विधान परिषदेच्या निवडणूकाही लांबल्या होत्या.
मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवरी महिन्यात पार पडल्यानंतर विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग ही मोकळा झाला आहे.याशिवाय नागपूरातून भाजपचे नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याने,आचार संहितेच्या सावटाखाली स्थायी समितीकडून जनतेला प्रलोभित करणा-या लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता असल्यानेच,उद्या भट सभागृहात सादर होणारा स्थायी समितीच्या अर्थसंकल्पावर अनिश्‍चितेचे सावट पडले आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याविषयी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून उशिरा रात्रीपर्यंत उत्तर मिळण्याची शक्यता होती.
परिणामी,आचार संहितेमुळे उद्याची सभा फक्त कोरम पूर्ण झाल्यानंतर बजेट सादर न करताच स्थगित करण्याची वेळ स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी-वखरे यांच्यावर येऊ शकेल,अशी चर्चा सुरु आहे.
…………………………………….
Advertisements

Latest बातम्या