मुख्यमंत्र्यांचा शहरात लृटेरी दूल्हन!गुजराती मुलाची फसवणूक
८० हजार व सोने घेऊन पसार

नागपूर,ता.१२ मार्च २०२६: कोमल बेन नावाची चाळीस वर्षांची एक महिला, गुजरातचा कुरिअर व्यवसायी याला लग्नासाठी मुलगी दाखवते. मात्र,मुलगी ही चक्क वर्दळीच्या रस्त्यावर दाखवली जाते.त्यातही एकच नव्हे तर एका साथ तीन-चार मुली दाखविल्या जातात.त्यातील एकीकडे मूल ही होते. मुली दाखवण्यात आल्या चक्क कमाल चौकात!मुलगा व त्याच्यासोबत आलेले दोन परिचित त्यातील एका मुलीचे घर पाहायचं आहे,तिच्या आई-वडीलांना भेटायचं आहे,असा आग्रह कोमल बेनकडे करतात.ही घटना तीन दिवसांपूर्वीची आहे.
कामठीमध्ये राहणा-या कोण्या उजाला मॅडमने या कोमलसोबत मुलाची ओळख करुन दिली होती.जी स्वत:ला मुलीची मावशी सांगते.मुलगा व त्याचे परिचित हे अहमदाबाद आणि भावनगर राजकोटमधून नागपूरला आले होते.गुजरातमधील जगदीश भाई याने उजाला मॅडमसोबत बोलून यांना नागपूरात पाठवले होते.मुलासोबत आलेल्या निशा बेन यांनी मुलाला आधीच सावध केले होते,जगदीश भाईने सांगितलेले स्थळ हे फ्रॉड असू शकतं.मात्र,मुलाला लगीनघाई नडली.घडलं ही तसंच.
या मुलाचे नाव आहे आकाश पारेख. तो ३५ वर्षांचा असून त्याचा घटस्फोट झाला आहे. तो गुजरातमध्ये एक प्रतिष्ठित कुरिअर व्यवसायी असून नागपूरात पहील्यांदा आले आहे.नागपूरात व्यवसायाच्या संदर्भात अनेकवेळा येणे जाणे करणा-या परिचिताला विजय भाई सोवनीला, जे सूरतमधून आहेत यांना आकाश पारेखच्या वडीलांनी फोन करुन मुलगा नागपूरात मुलगी बघण्यासाठी आला अाहे,नवीन शहर आहे तर तू देखील सोबत रहा म्हणून फोनवरुन सांगितले.त्यांचा नागपूर-अहमदाबाद ट्रेव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यामुळे मुलाच्या वडीलांचे हे परिचित आणि निशा बेन असे तिघे, मुलगी बघण्यासाठी आले.मात्र,निशा बेन महिला असल्याने त्यांना आधीच संशय आल्याने त्यांनी आकाशला सांगितले की जगदीश भाईने स्थळ सांगितले असल्याने धोका देखील होऊ शकतो.त्यांनी मुलीचे घर आणि आई-वडीलांना बघण्याची ईच्छा प्रकट केली.
नम्रता कृष्णा धकाते, राहणार कोराडी महादूला.यांच्या घरी आकाश पारेख आपल्या परिचितांसोबत गेला.त्यावेळी मुलीची आई घरी नव्हती फक्त बाप म्हणून एक माणूस भेटला.या भेटीत त्याने मुलीचे लग्न आर्य समाजमध्ये करण्याची अट घातली. बर्डीतील पकोडेवाली गल्लीतील मंदिरात लग्न होणार असून तिथूनच फ्लाईट पकडून नवदामपत्य हे गुजरातला पतरणार होते. या मंदिरात लग्नाचे प्रमाणपत्र दिल्या जातं.ठरल्याप्रमाणे मुलगा व त्याचे परिचित हे काल दूपारी मंदिरात पोहोचले.मात्र, वारंवार लग्नविधीसाठी मुलीच्या परिचितांनी टाळले.
मुलीची मावशी यायची आहे,वडील यायचे आहेत.अशी बतावणी करीत रहीले.सरतेशेवटी गुंडांची एन्ट्री सिनेमाप्रमाणे झाली व दहा ते पंधरा गुंडांनी या गुजराती व-हाडींना बेदम मारहाण करु मुलीला पळवून नेले….!
कोराडी येथील घरातच आकाश पारेखने मुलीला सोन्याचे मंगळसूत्र,कानातले आणि चांदीचे पैजण मुलीच्या मावशीने सांगितल्यामुळे दिले होते.याशिवाय ८० हजार रुपये तिने नकद ही घेतले.
काल दुपारच्या घटनेनंतर हे गुजराती व-हाड सरळ सीताबर्डी पोलिस ठाण्यात पोहोचले. आज चोवीस तास उलटून गेले तरी त्यांची एफआयआर दाखल झाली नाही. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत पिडीतांनी सांगितले की,येथील पोलिस निरीक्षक राऊत यांनी त्यांना मिडीयासोबत न बोलण्यास सांगितले. तसेच शेजारी बसलेले पोलिस अधिकारी तिवारी यांच्यासोबत बोलण्यास सांगितले!कायदा सांगतो जबरी फसवणूकीचा गुन्हा तातडीने नोंदवावा मात्र,चोवीस तास उलटून गेले तरी,हे गुजराती व-हाड नागपूरच्या पोलिसांच्या कायदेशीर पाहूणचारात अडकलेली आहे.
शहरातील एका मोठ्या आणि महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले गुजराती व-हाड फक्त एका एफआयआरच्या कॉपीसाठी नागपूरात अडकून, हॉटेलच्या बिलाचे भूगतान करीत बसले आहेत.
यातील एक पिडीत सांगतात की सीताबर्डी पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदवले आहे मात्र,आता ते पकोडेवाली गल्ली ही आमच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याचे कारण सांगत आहेत.नागपूरचा ‘न’ही माहिती नसलेली ही गुजराती पाहूणे मंडळी कालपासून सीताबर्डी पोलिस ठाण्यात तळ देऊन बसली आहे.
आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराचा खूप वाईट अनुभव आला असून,त्यांचीच पोलिस आम्हाला आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य करीत नसल्याची खंत पिडीत व्यक्त करतात.मुलगा ३५ वर्षांचा आहे.त्याचा चांगला व्यवसाय आहे,पहीलं लग्न तुटलं पण कोणाचं तरी चांगलं होईल या आशेने आम्ही नागपूरात आलो.नागपूरच्या लोकांवर विश्वास केला पण? पोलिसांनी तातडीने पकोडेवाली गल्लीती मंदिरातील सीसीटीव्ही तपासावे व कोमल,उजाला पासून तर गुजरातमधील जगदीश भाई यांची चौकशी करावी.एक फार मोठे रॅकेट नागपूरात सुरु असल्याचा दावा देखील पिडीत करतात.पाच दिवसांपूर्वीच नागपूरात आणखी एका गुजराती पिडीतेसोबत अगदी अशीच घटना घडल्याचा दावा ते करतात.माध्यमकर्मींनी आम्हाला दाखवलेल्या मुली यांचेही छायाचित्र प्रसिद्ध करावते जेणेकरुन आमच्यासाखी इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये,अशी विनंती ते करतात.
पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांना अनेकदा फोनवर संपर्क केला पण कॉल रिसिव्ह झाला नाही.आता आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे पिडीत सांगतात.
संपर्क क्रमांक – 9825175705
………………………………………………
Advertisements
