फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमदंगलीच्या आरोपीवर आहे लैंगिक शोषणाचाही गुन्हा!

दंगलीच्या आरोपीवर आहे लैंगिक शोषणाचाही गुन्हा!

Advertisements
पोलिस हिंदूंचे:भडकाऊ भाषणाने आगीत ओतले तेल

नागपूर,ता.१९ मार्च २०२५: नागपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी ३८ वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवला आहे. तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.महत्वाचे म्हणजे याच आरोपी लैंगिक शोषणाची गुन्हा दाखल आहे,गुन्हेगार पार्श्वभूमीच्या फहीम खाननेच गणेशपेठ पोलिस ठाण्यात चारशे लोकांचा जमाव चालून आणला होता.फहीम खानविरोधात या पूर्वीच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ मधील असून यात लैंगिक शोषणाचाही गुन्हा समाविष्ट आहे!

औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्यावरून सोमवारी दुपारी १ च्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात विश्‍व हिंदू परिषद व बजरंत दलातर्फे आंदोलन झाले होते. यावेळी औरंगजेबची प्रतिकृती जाळताना त्यावर हिरवी चादर गुंडाळण्यात आल्याने मुस्लिम समाजामध्ये रोष पसरला.समाज माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व रात्री आठ वाजताच्या सुमारास त्याचे रुपांतर दंगलीत झाले. दंगलखोरांनी शिर्के गल्ली,भालदापुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच ७५ हून अधिक वाहनांची तोडफोड करीत पोलिसांवर देखील दगडफेक केली. त्यात ३५ हून अधिक अधिकारी-कर्मचारी जखमी झाले.
दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करीत यासोबतच अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी उशिरा रात्री नियंत्रणात आणली. कोम्बिंग आॅपरेशन राबवित पोलिसांनी ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलिस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. हिंसाराच्या या घटनेत उपायुक्त दर्जाच्या ४ अधिका-यांसह एकूण ३३ पोलिस जखमी झाले होते. पोलिस या घटनेमागे असणा-या व्यक्तीचा कसून शोध घेत होते. हा शोध आता फहीम खानपर्यंत जाऊन पोहोचला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फहीम खान हा ३८ वर्षीय व्यक्ती नागपूरातील हिंसाचाराला कारणीभूत आहे. त्याने लोकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा हिंसाचार घडला. नागपूरच्या गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीमधून त्याचे नाव समोर आले. गणेशपेठ पोलिस ठाण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी त्याने पोलिसांसोबत देखील अरेरावीची भाषा वापरली असल्याचे अनेक व्हिडीयो व्हायरल झाले आहे. फहीम खान हा ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा’ शहराध्यक्ष आहे. त्याच्याच नेतृत्वात पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार,त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. हिंसक जमाव त्याच्याच नेतृत्वात पोलिस ठाण्याला निवेदन देण्यास गेला होता. त्याने सोमवारी सर्वप्रथम लोकांना सोमवारी सकाळी ११ वा. एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी त्याने विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात नारेबाजी केली. त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण, त्यानंतरही फहीम खानने जमाव गोळा करून तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली. फहीम खान जमावाला हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करीत होता. ‘पोलिस हिंदू समाजाचे’ आहेत. ते आपली मदत करणार नाही, असे तो जमावाला उद्देशून म्हणाला होता.
‘एफआयआर’च्या प्रतीनुसार फहीम खान शमीम खानने (३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) याने विहिंप, बजरंग दलाच्या सोमवार सकाळच्या आंदोलनानंतर ५० ते ६० जणांचा बेकायदेशीर जमाव जमविला व गणेशपेठ पोलिस ठाण्यात धडक दिली. त्याच्या तक्रारीवरून आंदोलन करणा-या बजरंग दलाच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता,हे विशेष.
फहीम खान शमीम खान याच्यासोबत सैफ अली खान रौफ खान (२८, वाठोडा), शेख नादीम शेख सलीम (३५, यशोधरानगर), मोहम्मद शाहनवाज रशीद शेख (२५, पारडी), मोहम्मह हरीश ऊर्फ मोहम्मद इस्माईल (३०, गांधीबाग), युसूफ शेख ऊर्फ अब्दुल हफीज (२५, महाल), शेख सादीक शेख नबी (४१, महाल), मो. युसूफ ऊर्फ अब्दुल हफीज शेख (महाल), आसीम शेख समशुज जमा (२४, भालदारपुरा) हेदेखील होते.
पोलिसांनी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर फहीम याला शांतता ठेवण्याबाबत समज ही दिली होती. मात्र, असे केल्यानंतर देखील या दंगलखोरांनी, चार वाजता एका गटातील जमावाला एकत्रित करण्याचे संदेश दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाचशे ते सहाशे लोक एकत्रित आले.

या ठिकाणी त्यांनी भडकाऊ नारेबाजीला सुरवात केली.त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळ्यावरील व परिसरातील विद्युत रोषणाईचे उद् घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार होते मात्र,जमावाने या ठिकाणी पोहोचून प्रक्षोभक नारेबाजी सुरु केली.हा जमाव बेकायदेशीर असून सर्वांना तत्काळ घरी जावे, अशी सूचना पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिली होती. फहीम खानच्या उपस्थितीतील जमावातील लोकांनी भडकाऊ घोषणा देण्यास सुरुवात केली व तेथून वातावरण बिघडले.
दंगलीनंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून फहीम याच्यासोबत फहीम खान व त्याच्या काही सहका-यांनाही ताब्यात घेतले आहे. त्याला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
याबाबत पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, आम्ही मास्टरमाइंडचा शोध घेत आहोत़. जे लोक गणेशपेठेतील बेकायदेशीर जमावात सहभागी झाले होते त्यांनी कुणाला फोन केले, याचा सीडीआर काढण्यात येत आहे. तसेच याअगोदर कुठल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते का, व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल माध्यमांवर त्यांनी काही पोस्ट केली होती का याचा तपास सुरू आहे. यासाठी इतर एजन्सीजचीदेखील मदत घेण्यात येत आहे. फहीम खान यशोधरानगरातून गणेशपेठेत पोहोचला कसा, याचा तपासदेखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाचे म्हणजे मागील वर्षी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फहीमने भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती,त्याला  १ हजार ७३ मते मिळाली होती.
महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न!
भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणा-या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिस कर्मचा-याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना देखील या हिंसेत घडली.या ही प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी रात्री दंगल उसळ्यानंतर दंगलीत लोकांच्या घरांवर तूफान दगडफेक सुरु होती व लोकांच्या गाड्या जाळल्या जात होत्या.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस उपायुक्त निकेतन कदम,पोलिस उपायुक्त शशिकांत सातव आणि पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यासह पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित,नितीन राजकुमार,पोलिस उपनिरीक्षक,पाच कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील महिला पोलिस भालदारपुरात गेले असता,जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली.त्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करीत पोलिसांवरच हल्ला चढवला.एका जमावाने महिला पोलिसाला पकडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला व अश्‍लील स्पर्श केले.मात्र,दंगल नियंत्रण पथकातील विशेष ट्रेनिंगप्राप्त ती महिला पोलिस हुशारीने जमावाच्या तावडीतून निसटली,यानंतर जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.
आज विधान सभेत मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या घटनेची माहिती सदनात देत,मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची गांर्भीयाने दखल घेत दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली.
 ————
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या