
खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवार १२ जानेवारी २०२५ पासून विदर्भस्तरीय कबड्डी, सॉफ्टबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा १२ ते २१ जानेवारी या कालावधीत इनडोअर स्टेडियम मानकापूर येथे होणार आहे. सीनियर पुरुष, महिला तसेच ज्युनियर आणि सबज्युनियर मुले, मुलींच्या गटात ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ लाख ५८ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक डॉ. विवेक अवसरे (9422859805) व समन्वयक श्री. विनोद बघेल (9423405320) यांच्याशी संपर्क साधावा.
सॉफ्टबॉल स्पर्धा १२ ते १७ जानेवारी या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे पार पडेल. २३ वर्षाखालील पुरुष, महिला, १७ वर्षाखालील व १४ वर्षाखालील मुले आणि मुली या गटात ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक श्री. सतीश वडे (9096597000) व समन्वयक श्री. नवनीत श्रीवास्तव (9923444999) यांच्याशी संपर्क साधावा.
१२ ते १७ जानेवारी या कालावधीमध्ये बास्केटबॉल स्पर्धा डीएमके शंकर नगर आणि नासा सुरेंद्र नगर येथे होतील. ज्युनियर मुले, मुली आणि सबज्युनियर मुले, मुली या गटात स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ४ लाख २८ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक श्री. अमित संपत (9881073377) व समन्वयक श्री. अक्षय पाटील (7588888122) आणि श्री. आनंद टोळ (9822204677) यांच्याशी संपर्क साधावा.




आमचे चॅनल subscribe करा
