फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनिवडणूकी दरम्यान जिल्ह्यात ३९ कोटी ६० लाखाचे साहित्य जप्त!

निवडणूकी दरम्यान जिल्ह्यात ३९ कोटी ६० लाखाचे साहित्य जप्त!

Advertisements

विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
दिव्यांगांसाठी सुविधा: प्रत्येक मतदान केंद्र निगराणीखाली

नागपूर, दि. १८ नोव्हेंबर २०२४: आदर्श आचार संहितेअंतर्गत सुरक्षिततेच्या उपाययोजना घेतल्यानुसार  सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. आजवर केलेल्या विविध कारवाईमध्ये जिल्ह्यात निवडणूकी दरम्यान सूमारे ३९ कोटी ६० लाखाचे साहित्य जप्त! कोटी रुपयांचे साहित्य व काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. यात दागिने, रोख रक्कम, मद्य, राशन किट आदींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  साठी अवघे काही तास उरले असून मतदानासाठी  निवडणूक विभाग योग्य त्या सर्व सुरक्षा यंत्रणांसह सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदाराला  निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी नागपुरकरांसह जिल्ह्यातील मतदार न चुकता मतदान करतील, असा विश्वास  यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त ग्रामीण पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने ४ हजार ६३१ मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सूमारे ३ हजार ४६० मतदान केंद्राचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. शहरी भागात २ हजार १६९ म्हणजेच १०० टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होईल. ग्रामीण भागातील ५३ टक्के मतदान केंद्र म्हणजेच १ हजार २९१ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार असल्याची माहिती डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्ह्यात सूमारे १२७ मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्र म्हणून घोषीत करण्यात आले असून या ठिकणी मॉयक्रो ऑर्ब्झव्हर नियुक्त करण्यात आले आहेत. याच बरोबर या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तत्पर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दिव्यांगांसाठी आवश्यक सोईसुविधा –
दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोईसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ज्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मतदान केंद्रावर जाण्यास असमर्थता आहे अशा व्यक्तींसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. यात 83291318088623825845 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
कर्मचाऱ्यांसाठी चक्रीका ॲपचा प्रथमच वापर-
विधानसभा मतदारसंघासाठी यंदा प्रथम चक्रीका या ॲपचा वापर करण्यात येणार आहे. कर्मचारी व अधिकारी यांचा त्यांच्या जीपीएससह समन्वय ठेवता येणे शक्य होणार आहे.
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या