फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमतदारांनो पुन्हा मिळालेल्या संधीचा घ्या फायदा :बीएलओ येणार पुन्हा घरोघरी

मतदारांनो पुन्हा मिळालेल्या संधीचा घ्या फायदा :बीएलओ येणार पुन्हा घरोघरी

Advertisements

ऑन लाईन मृत मतदारांची नावे,बदललेले पत्ते,गहाळ नावे दुरुस्तीची संधी
निवडणूक आयोगाच्या संक्षिप्तपुनरिक्षण कार्यक्रमास उद्यापासून सुरुवात     
२५  जून ते २४ जुलै या कालावधीत विशेष मोहीम    
२५ जुलै रोजी एकत्रीकृत (Integrated) मतदार यादी होणार प्रसिध्द : मतदारांनी यादीत नाव तपासूण घ्यावे:अति.जिल्हाधिकारी यांचे आवाहन   
२५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती करता येईल          सादर 
२० ऑगस्ट रोजी होणार अंतिम मतदार यादी प्रसिध्द:यानंतर यादीतील मतदाराच विधान सभेत मतदानासाठी ठरणार पात्र     
नागपूर,दि. २४ जून २०२४ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचीत राहू नये याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचासंक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (SSR) घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात नमुना क्र. ६ गोळा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय उद्या २५ जून ते २४ जुलै दरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन मतदार यादीचे सुसूत्रीकरण करणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ठोंबरे यांनी सांगितले की,नागपूर जिल्हयात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत याच वर्षी २७ मार्च रोजी प्रसिध्द मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नाही अशा मतदारांची नोंदणी करुन घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) २५ जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहेत. जे मतदार १८ वर्षाचे झालेले आहे,अशा पात्र मतदारांचे नमूना क्र.६ भरुन घेतील. मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार, वजे मतदार त्यांचे पत्त्यावर आढळत नाही, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करुन मतदार यादीतील तृट्या दूर करतील, असेही ठोंबरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण करावयाचे असून याअंतर्गत आवश्यकतेनुसार मतदारांना मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात, पत्त्यात बदल करुन घेता येईल. सर्व दुरुस्तीसह २५ जुलै रोजी एकत्रीकृत (Integrated) मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल.
याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबीर आयोजित करण्यात येईल. (शिबिराचा दिनांक मुख्य निवडणूक अधिकारी निश्चित करेल) विशेष शिबिराचे दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या जवळील मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुनाक्र. ६, ७ आणि ८ स्वीकारतील व १९ ऑगस्टपर्यत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.नागपूर जिल्हयातील मतदार यादीचे शुध्दीकरणाचे काम आगामी विधानसभा, नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हयातील सर्व मतदारांना तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केले आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नसेल अशा मतदारांनी आपले नाव नियमानुसार आवश्यक कागदपत्रासह नमुनाक्र. ६ भरुन विहीत मुदतीत मतदार यादीत समाविष्ठ करण्याबाबचा अर्ज Online(https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ किवा Voter Helpline App) Offline (मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी इ.) येथे सादर करणेबाबत आवाहन करण्यात आले.
लोकसभा निवडणकीच्या वेळी झालेला मतदार यादीतील अभूतपूर्व गोंधळ बघता बीएलओ यांनी क्रमांक ७ चा फॉर्म भरुन न घेता परस्पर नावे डीलीट केली,एकाच कुटूंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आढळली,मतदार यादीत मृत मतदारांची नावे सर्वाधिक होती तर जिवंत मतदारांना रणरणत्या उन्हात अनेक मतदार केंद्रांवर भटकंती करावी लागली होती.बीएलओ घरी आल्यानंतर मृत मतदारांची नावे डीलीट करण्यास सांगितले असता आम्हाला तो अधिकारच नाही असे सांगून बीएलओ वेळ मारुन नेतात,बीएलओंने सादर केलेल्या यादीतही घोळ करुन डेटा एन्ट्री ऑपरेटर आणखी घोळ करताना आढळले,यावेळी या सर्व समस्यांवर निवडणूक अधिका-यांनी प्रभावी उपाये योजिला आहे का?असे प्रश्‍न केले असता,बीएलओ घरोघरी जाऊन मतदार यादी तपासत असतानाच त्यांच्याकडे फॉर्म असणार आहेत,ते फॉर्म भरुन व मृत्यू प्रमाणपत्र जोडल्यास मृत मतदारांची नावे डेटा ऑपरेट होताना गहाळ केली जातील,बीएलओ त्यांना असा अधिकार नसल्याचे सांगू शकत नाही,असे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,असे ठोंबरे यांनी सांगितिले.
डेटा एन्ट्री करण्यापूर्वी यादीची तपासणी एआर आधी करीत असताे यानंतर पीआरओ त्यावर निर्णय घेत असते.यानंतर ती यादी डेटा ऑपरेटर कडे पाठविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारांना कोणतीही अडचण वा शंका असल्यास त्यांनी घरी बसल्या-बसल्याच ऑन लाईन त्यांनी दिलेली माहिती अपडेट झाली की नाही,याची तपासणी करावी,असे आवाहन त्यांनी केले.
……………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या